पुण्यात मोबाईल टॉवर मुद्रांक बुडवल्याप्रकरणी कंपन्यांना दंड.

पुणे: इमारतीच्या टेरेसवर कोणत्याही कंपन्यांना मोबाईल टॉवर उभारण्यासाठी जागा देताना शहरात सुमारे शंभराहून अधिक कंपन्यांनी मुद्रांक शुल्क बुडविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या मोबाईल कंपन्यांच्या कराराची पडताळणी केल्यानंतर सुमारे सव्वाकोटीच्या दंडासह ८० लाखांचा दंड अशी दोन कोटी रुपयांची वसुल करण्याची नोटीस देऊन नोंदणी मुंद्राक शुल्क विभागाने दणका दिला आहे. या संदर्भात महापालिकेलाही पत्र पाठवून नव्याने होणाऱ्या करारावेळी मुद्रांक शुल्क भरून दस्त नोंदणी केल्याशिवाय परवानगी देऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे. शहरामध्ये विविध ठिकाणच्या इमारतींच्या टेरेसवर मोबाईल कंपन्यांकडून नेटवर्क’साठी टॉवर उभारण्यासाठी जागा मालकासोबत करार केला जातो. टॉवरसाठी सुमारे ३०० ते ५०० चौरस मीटर एवढी जागा लागते. त्यासाठी करार करताना सुमारे पाचशे रुपयांच्या मुद्रांकावर (स्टॅम्प पेपर) करार करतात. जागा मालक आणि मोबाईल कंपन्यांमधील करारपत्र पाहून महापालिका कंपन्यांना टॉवर उभारणीसाठी परवानगी देते. परंतु, अनेक मोबाईल कंपन्या करारानुसार मुद्रांक शुल्क न आकारता राज्य सरकारचा फसवणूक करीत असल्याचे नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाच्या तपासणीत उघडकीस आले.
शहरात उभारण्यात येणारे मोबाईल टॉवर हे साधारण पाच ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी उभारण्यात येतात. पाच वर्षांच्या करार करताना जागेच्या बाजार मूल्याच्या १० टक्के रकमेवर पाच टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाते. सात ते दहा वर्षासाठी करार असल्यास बाजार मूल्याच्या २५ टक्के रकमेवर पाच टक्के तसेच १० ते २९ वर्षाच्या करार असल्यास बाजार मूल्यांच्या ५० टक्के रकमेवर पाच टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाते. बहुतांश कंपन्या दहा वर्षांसाठी करार करून मुद्रांक शुल्क भरण्यापासून पळवाट शोधतात, असे निरीक्षण अधिकाऱ्यांनी नोंदविले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत