
आरबीआयनं बजाज फायनान्स लिमिटेड पुणे (महाराष्ट्र) वर ८.५० लाख रुपये, युनियन बँकेवर १ कोटी रुपये आणि RBL बँक लिमिटेडवर ६४ लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बजाज फायनान्सवर मोठी कारवाई करत आर्थिक दंड ठोठावला आहे. बजाज फायनान्स लिमिटेड पुणे (महाराष्ट्र) वर ८.५० लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. आपल्या अधिकारांचा वापर करून RBI ने बजाज फायनान्स लिमिटेडवर रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल हा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा १९३४ अंतर्गत कलम ५८ जीच्या उपकलम १ च्या कलम (ब) अंतर्गत आरबीआयला आर्थिक दंड आकारण्याचा अधिकार आहे. आरबीआयनं बजाज फायनान्स लिमिटेड पुणे (महाराष्ट्र) वर ८.५० लाख रुपये, युनियन बँकेवर १ कोटी रुपये आणि RBL बँक लिमिटेडवर ६४ लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे.
खरं तर आर्थिक नियामक अनुपालनातील त्रुटींमुळे हा दंड लादण्यात आला आहे. तसेच कंपनीने ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहारावर किंवा करारावर याचा परिणाम होणार नाही. हा आदेश १३ ऑक्टोबर २०२३ रोजीचा असून, निर्बंध लावण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्ज आणि इतर निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी युनियन बँकेवर १ कोटींचा दंड ठोठावला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत