महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

16 ते 17 ऑक्टोबरदरम्यान मंत्रिमंडळ विस्तार- सूत्र

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी वर्षा बंगला येथे पोहोचले होते. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे आणि फडणवीस यांच्या या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारच्या तारखेवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. 16 किंवा 18 ऑक्टोबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतं, असं सूत्रांचं म्हणणं आहे.

आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही नेत्यांना मंत्रीमंडळ विस्तारात संधी मिळू शकते. यातच एकनाथ शिंदे गटातील वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदारांना यात संधी मिळणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.
यापूर्वी काही नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर दिल्लीतील भाजपचे वरिष्ठ नेते नाराज झाले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मंत्रिपदासाठी निवड करताना या सर्व गोष्टी लक्षात ठेवून देणार संधी देण्यात आहेत. मागच्या विस्तार मधील बऱ्याच मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. यामुळे यावेळी संपूर्ण विचार करूनच संधी दिली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!