हिंदू राष्ट्रवाद मान्य आहे तर नेपाळला जा.

नागपूर : गेल्या काही वर्षात भारतीय नागरिकांच्या मानसिकतेवर धर्मांधतेचा प्रयोग सुरू आहे. आधी ‘हिंदू खतरे मे है’, नंतर सांगितले, ‘मंदिर वही बनायेंगे’ आणि आता ‘हिंदू राष्ट्रवाद’ ही मादक गोळी दिली जात आहे. संविधानाने सर्व धर्म समभावाची भावना जनमानसात रुजली असताना हिंदूत्वाचे खुळ डोक्यात घुसविले जात आहे. तुम्हाला हिंदू राष्ट्रवाद मान्य आहे तर नेपाळला जा ना, कारण तेच एकमेव हिंदूराष्ट्र आहे, अशी परखड टीका महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केली आहे.
‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाळ युग-सहमतीची हुकूमशाही’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी धनवटे नॅशनल कॉलेजच्या विमलाबाई देशमुख सभागृहात झाले. याप्रसंगी लोकवाड्मय गृह प्रकाशनचे संचालक डॉ. भालचंद्र कानगो, ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत रणजित मेश्राम, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, उन्नती फाउंडेशनचे अतुल कोटेचा प्रामुख्याने उपस्थित होते.तुषार गांधी म्हणाले, मी महात्मा यांचा नव्हे तर असामान्य काम करणाया सामान्य व्यक्ती मोहनदास व कस्तुरबा संबोधन त्यांचे ईश्वरीकरण करायचे नाही. गांधीजींनी कधी पुष्पगुच्छ स्वीकारणे आवडत नव्हते. मात्र नुकत्याच झालेल्या जी-20 च्या नावावर गांधीजींच्या स्मारकावर भपकेबाज इव्हेंट साजरा करण्यात आला. त्यांना बापू समजले असते तर साधेपणाने अभिवादन झाले असते. माध्यमांनीही हा भपकेबाजपणा चढवून दाखविला. लोकांनीही जनावराप्रमाणे तर्कशक्ती गहान ठेवून हुकूमशाहीला सहमती दर्शविली आहे. आणीबाणीनंतर भारतीयांनी त्यावेळी मजबूत असलेल्या कॉंग्रेस पक्षाला पराभूत करून इंदिरा गांधी यांना जागा दाखविली. त्यावेळी लोक जागृत होते पण आज जिवंत शव झाले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत