काँग्रेस महिला नेत्याच्या हत्येचा लागला निकाल:कल्पना गिरी हत्याकांडाप्रकरणी दोघांना जन्मठेप, चौघांना 3 वर्षांची सक्तमजुरी

लातूर येथील महिला काँग्रेसच्या पदाधिकारी कल्पना गिरी यांच्या हत्याकांडाचा अखेर सोमवारी निकाल लागला. न्यायालयाने या हत्याकांडाप्रकरणी 2 मुख्य आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर इतर 4 जणांना 3 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सलग साडे 9 वर्षे चाललेल्या या खटल्यात एकूण 126 साक्षीदार तपासण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हत्याकांडाचा उल्लेख ‘तंदूर ते लातूर’ असा केल्यामुळे हे प्रकरण अवघ्या देशात गाजले होते.
कल्पना गिरी यांचा 21 मार्च 2014 रोजी खून झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली होती. यापैकी 1 आरोपी गत 9 वर्षांपासून तुरुंगात होता. तर इतर 6 जण जामिनावर होते. स्थानिक पोलिस ते सीबीआय अशा 5 तपास यंत्रणांनी या प्रकरणी तपास केला होता. त्यानंतर जवळपास 1 हजार पाणांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
कल्पना गिरी काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या पदावर होत्या. युवक कॉंग्रेसमध्ये आल्यानंतर अल्पावधीतच त्याची लातूर शहर विधानसभा युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाली होती. त्यांचे LLB झाले होते. त्या लवकरच वकिलीची प्रॅक्टीसही सुरू करणार होत्या. त्या MPSC सारख्या स्पर्धा परिक्षांचीही तयारी करत होत्या. पण त्यांना पक्षांतर्गत विरोध वाढला होता. त्यातूनच त्यांची हत्या झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता.
महेंद्रसिंह चौहान हा युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष होता. तर समीर किल्लारीकर सदस्य होता. किल्लारीकर याने त्या दिवशी महेंद्रसिंह व कल्पना गिरी यांच्यात वाद झाल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्याच्या मते, महेंद्रसिंह चौहान यांचे फटकून वागणे कल्पना यांना आवडले नव्हते. कल्पना यांनी युवक काँग्रेसची निवडणूक लढवू नये असा चौहानचा आग्रह होता. पण त्यानंतरही त्यांनी निवडणुकीत सहभाग घेतल्यामुळे ते त्यांचा संधी मिळेल तेव्हा अवमान करत होते. यातूनच त्यांनी तुळजापूर लगतच्या एका तलावात ढकलून कल्पना गिरी यांची हत्या केली
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत