धाराशिव येथे स्वच्छता ही सेवा अभियान

धाराशिव प्रतिनिधी ( संतोष खुने ) राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने बस स्थानक, धाराशिव व सरकारी जिल्हा स्त्री रुग्णालय, धाराशिव येथे स्वच्छता ही सेवा या अभियाना अंतर्गत स्वच्छता करण्यात आली. बस स्थानक, धाराशिव येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला पोलिस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, धाराशिव व राष्ट्रीय सेवा योजना राज्य संपर्क प्रमुख डॉ. रामेश्वर कोठावळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर, धाराशिव चे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. बालाजी मैण्द, डॉ. मकरंद चौधरी, बसस्थानक आगारप्रमुख श्री. रवींद्र कोष्टी, गुप्तवार्ता विभाग रवींद्र कराड, धाराशिव येथील विविध माहाविद्यालयातील कार्यक्रम अधिकारी डॉ. राहुल खोब्रागडे, डॉ. मेघश्याम पाटील, डॉ. माधव उगीले, प्रा. अतुलकुमार अलकुंटे, प्रा. गणेश शेटे, प्रा. जितेंद्र कुलकर्णी, प्रा. वरुण कळसे, डॉ. शिवरत्न खरे, डॉ. दिनकर रावसे, डॉ. राणी बारकुल, पूर्णिमा गुंड व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक मोठया संख्येने उपस्थित होते. सर्वांनी स्वच्छता अभियान मध्ये सहभाग नोंदविला व एसटी बस स्टॉप व वर्कशॉप येथे स्वच्छता करण्यात आली. तसेच, डॉ. रामेश्वर कोठावळे यांच्या हस्ते पोलिस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे स्वागत करण्यात आले, तर डॉ. प्रशांत दीक्षित यांनी डॉ. रामेश्वर कोठावळे यांचे स्वागत केले. प्रसंगी डॉ. रामेश्वर कोठावळे व श्री. अतुल कुलकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. कोठावळे यांनी राष्ट्रीय सेवा योजना मध्ये घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली, तसेच स्वच्छतेचे महत्व विशद केले. श्री. अतुल कुलकर्णी यांनी आपल्या मार्गदर्शनात स्वच्छता, वृक्षारोपण व शाहिदांचा सन्मान या या अनुषंगाने मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला वृक्षारोपण करावे असे आव्हान केले व सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
सरकारी जिल्हा स्त्री रुग्णालय येथील कार्यक्रमामध्ये स्वच्छता करण्यात आली. तसेच, डॉ. श्री. रामेश्वर कोठावळे यांनी उपस्थितांना स्वच्छतेचि शपथ दिली. तसेच, डॉ. कोठावळे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचा कसा फायदा होतो व विद्यार्थ्यांनि उपक्रमामध्ये सहभाग नोंदवायला हवा असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी जिल्ह्या स्त्री रुग्णालयातील डॉ. पारिसे मॅडम व डॉ. माने मॅडम यांचे सहकार्य लाभले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत