“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्देश दिल्यानंतर अखेर सुनावणीस सुरुवात झाली आहे. पण विधानसभा अध्यक्ष अपात्रतेवरील सुनावणीस मुद्दाम विलंब करत आहेत, असा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. तसेच सत्ताधारी पक्षाच्या बाजुने ते निर्णय घेतील, असा दावाही ठाकरे गटाकडून केला जात आहे.
त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय घेतला तर काय होईल? याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणावर आता कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी मोठं भाष्य केलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल चुकीचा निर्णय घेतला, तर सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करून ताशेरे ओढू शकतं किंवा आदेशही देऊ शकतं, असं मोठं वक्तव्य असीम सरोदे यांनी केलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत