अदिती अशोक गोल्फमध्ये पदक जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला

२५ वर्षीय आदिती अशोक आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३मध्ये गोल्फमध्ये रौप्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.
भारताची स्टार महिला गोल्फपटू अदिती अशोकने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला. रविवारी (१ ऑक्टोबर) तिने ऐतिहासिक कामगिरी करत रौप्यपदकावर नाव कोरले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात कोणतेही पदक जिंकणारी आदिती ही पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. या स्पर्धेच्या या आवृत्तीत गोल्फमध्ये भारताचे हे पदक आहे. सुवर्णपदक जिंकण्यापासून ती नक्कीच हुकली, पण तिने एक मोठी कामगिरी करत आपल्या नावावर ऐतिहासिक नोंद केली.
अदितीला रविवारी महिला गोल्फ स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आपली लय राखता आली नाही. तिने अप्रतिम फटका मारला मात्र, तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अदितीने तिसऱ्या फेरीनंतर गुणतालिकेत अव्वल स्थानावर सात शॉट्सची मोठी आघाडी घेतली होती. एका बर्डीविरुद्ध चार बोगी आणि एक दुहेरी बोगी करून तिने ही आघाडी गमावली आणि दुसऱ्या स्थानावर घसरली. अदिती सुवर्णपदकापासून वंचित राहिली पण दोन वेळच्या ऑलिम्पियन खेळाडूने अदितीला हरवले. टोकियो ऑलिम्पिकमध्येही ती थोड्या फरकाने मागे राहून चौथ्या स्थानावर राहिली होती.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत