सम्राट राजा अशोक प्रमाणे आता प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील मुलांना धम्म आणि समता सैनिक दल मध्ये सहभागी करावे

_ॲड एस के भंडारे
सांची (मध्यप्रदेश)_ चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांनी आपली मुले राजकुमार महामहेंद्र आणि राजकुमारी संघमित्रा यांना धम्म प्रचारासाठी मध्यप्रदेश सांची येथून रस्त्याने आणि नाला सोपारा (मुंबई) येथून जहाजातून श्रीलंकेला पाठविले त्याप्रमाणे आता प्रत्येक बौद्धांने आपल्या मुलांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मातृसंस्था दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व समता सैनिक दल मध्ये सहभागी करावे असे आवाहन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी/राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर ॲड एस के भंडारे यांनी सांची स्तूप येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया/समता सैनिक दल च्या वतीने मानवंदना दिल्यानंतर केलेल्या प्रमुखमार्गदर्शनात केले.
सांची येथे भगवान बुद्धाचे शिष्य सारिपुत्त व महामोघलयन यांच्या अस्थी (स्तुप )आहेत त्याला नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म संमेलन आयोजित करण्यात येते, त्याचे अवचित्य साधून दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया मध्यप्रदेश उत्तर राज्यच्यावतीने संबोधी लॉन , सांची येथे समता सैनिक दलाचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर व शिवपुरी जिल्हा शाखेच्यावतीने शिवपुरी ते सांची अशी शिवपुरी , गुना,
अशोकनगर, विदिशा, रायसेन या पाच जिल्ह्यातून धम्म संदेश यात्रा दिनांक 23/11/2025 पासून काढण्यात आली , धम्म रथाचे नेतृत्व आर सी बौद्ध यांनी केले व सारथ्य दिनेश शाक्य यांनी केले व सांची येथे संबोधी लॉन ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते सांची स्तूप अशी धम्म रथ सह समता सैनिक दल आणि कार्यकर्त्यांची भव्य रॅली दिनांक 30/11/2025 रोजी सकाळी 9 वाजता काढण्यात आली. सांची येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर , भंते सारिपुत्त व भंते महा मोग्गलायन यांच्या अस्थी स्तूपाला आणि त्यानंतर सांची स्तूपाला समता सैनिक दलाने मानवंदना दिली. ॲड एस के भंडारे यांनी पुढे असे सांगितले की, मध्यप्रदेश हा भगवान बुद्ध, सम्राट अशोक व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरासत असलेला देशातील महत्वाचा प्रदेश आहे . उज्जयनचे बुद्धकालीन विद्वान भंते महाकात्यायन व सुकेशनी(गोपालमाता),
उज्जयन येथे महामहेंद्र व संघमित्रा यांचा अस्थी स्तूप, तसेच सांची स्तूप, सतधारा स्तूप,डॉ बाबासाहेब यांचे जन्म स्थळ महू इत्यादी विरासतीचे ठिकाणे आहेत.पुढील वर्षी राज्याच्या प्रत्येक जिल्हा शाखेने धम्म रथ काढून समारोप सांची येथे करावा असे सूचित केल्यावर सर्व राज्याच्या प्रतिनिधींनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला व तसे आयोजन करण्याचे मध्यप्रदेश उत्तर चे अध्यक्ष आर सी बौद्ध व मध्यप्रदेश दक्षिणचे अध्यक्ष चरणदास ढेंगरे यांनी ठरविले.
यावेळी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव व मध्यप्रदेशचे प्रभारी बी एच गायकवाड गुरुजी यांनीही सांची आंतरराष्ट्रीय बौद्ध संमेलन निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी महू स्मारक भंते प्रज्ञाशील ,
मध्यप्रदेश दक्षिणचे महामंत्री लेफ्टनंट कर्नल उत्तम प्रधान, उत्तर राज्य कोषाध्यक्ष लखन सिंह दहिलवाल इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. ॲड भंडारे आणि गायकवाड हे सैनिक अनिल अवथरे व मनोज निकोसे यांच्या सह गाडीने भोपाळ ते सांची रोड ने जाताना त्यांनी भोपाळ पासून 27 किमी व सांची पासून 19 किमी असलेल्या नरखेडा गावातील कर्क रेषा ला व सांचीच्या जवळ असलेल्या बौद्ध विद्यापीठ व तेथील श्रीलंका (अनुराधापूर ) येथून आणलेल्या ऐतिहासिक बोधी वृक्ष भेट दिली.
विदिशा जिल्हा शाखेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे जनतेसाठी भोजन दान स्टॉल लावण्यात आला होता. त्याला ॲड एस के भंडारे, बी एच गायकवाड इत्यादींनी भेट देऊन जनतेला खीर दान केले. याचे आयोजन जिल्हा अध्यक्ष जितेंद्र अहिरवार आणि टीम ने केले होते.समता सैनिक दलाचे प्रशिक्षण लेफ्टनंट कर्नल उत्तम प्रधान (इंदौर)व सिनियर डिव्हिजन ऑफिसर रमेश खिल्लारे (बुलढाणा) यांनी दिले.
या सांची महोत्सव कार्यक्रमास भोपाळ, विदिशा,
इंदोर,बालाघाट ,बैतूल,दमोह , अशोकनगर, छतरपुर , चिंदवडा, खंडवा, बुराहनपूर नृसिंहपुर, राजगड, पन्ना,गुना , रायसेन , मुरेना, मंडीदीप, होशिंगाबाद इत्यादी जिल्ह्यातून कार्यकर्ते, समता सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



