पूरग्रस्तांसाठी क्रांतिकारी शिक्षक संघटनेचा हात पुढे

बीड जिल्ह्यातील बिंदुसुरा नदीकाठी वसलेल्या वस्त्या अलीकडील पुरामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या. अनेक कुटुंबे उघड्यावर आली, आयुष्यभराची संपत्ती वाहून गेली. या कठीण प्रसंगी क्रांतिकारी शिक्षक संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्त बांधवांना किराणा किटचे वितरण करून माणुसकीचा हात पुढे केला.
क्रांतिकारी शिक्षक संघटना ही केवळ शिक्षकांच्या हक्कासाठी लढणारी नाही, तर समाजातील प्रत्येक संकटसमयी मदतीसाठी तत्पर असणारी संघटना आहे. अनाथ मुलांना आर्थिक मदत, रुग्णांना उपचार सहाय्य, तसेच आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत — अशा अनेक सामाजिक उपक्रमांतून संघटनेने “शिक्षक म्हणजे समाजाचे आधारस्तंभ” हे सिद्ध केले आहे.
या मदतकार्याचे मार्गदर्शन संघटनेचे सचिव श्री. शाहीद कादरी यांनी केले.
या वेळी आ. सतीश पवार, असरार सर, राजू सर, प्रा. डॉ. शशिकांत गायकवाड सगिर सर मुबिन सर तसेच संघटनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जमीयतचे मराठवाडा उपाध्यक्ष मौलाना झाकीर साहेब,मौलाना बाखि साहेब,मोईन मास्तर साहेब,एम.आय.चे नेते शफिक भाऊ,खुर्शीद आलम,ज्येष्ठ शिक्षक शफिक हाश्मी साहेब दिव्य वार्ताचे संपादक अबुबकर चाऊस साहेब नेते फारुख पटेल साहेब, इतर मान्यवर उपस्थित होते.
क्रांतिकारी शिक्षक संघटनेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, “शिक्षक केवळ वर्गातच नाही समाजातही प्रकाश पसरवतात” हा संदेश या कार्यातून अधोरेखित झाला आहे.या मदतीस संघटनेचे फिरदोस मॅडम, नवीद सर,समियोद्दीन सर,परवेज सर,नकीब जहा मॅडम,फारहाना मॅडम,नादेरा मॅडम,नाईला मॅडम,हुमेरा मॅडम,आदि पुठे आले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत