नळदुर्ग येथे बालाघाट शिक्षण संस्थेतील प्राध्यापकांचे विद्यार्थ्यां समोर गैरवर्तन

दोन प्राध्यापकावर निलंबनाची कुऱ्हाड नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केली कारवाई
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात दि. 29 ऑगस्ट रोजी पतसंस्थेच्या कारणावरून दोन प्राध्यापकांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करत एकमेकांची गचांडी धरत विद्यार्थी विद्यार्थिनी समोर खुप मोठा राडा घातला होता
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग येथील प्राध्यापक मत्स्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ समीर भिमराव पाटील व जिवशास्त्र विभागाचे सह शिक्षक सचिन रावसाहेब नरवडे या दोन प्राध्यापकांनी एकमेकांच्या भेदभावा मुळे हा तमाशा विद्यार्थ्यां समोरच सुरु ठेवल्याने विद्यार्थामध्ये
संभ्रम निर्माण झाला या दोघांच्या गैर वर्तनामुळे बालाघाट शिक्षण संस्थेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय हे बदनाम होत असल्याचे दिसून येत आहे आपणाला संबंधीत झालेल्या तक्रारीला अनुसरून प्राचार्य सुभाष राठोड यांनी पत्र क्रं ३१३ दि ३०/८ / २०२५ दोन दिवसांत खुलासा करण्या संदर्भात नोटीस बजावली होती परंतू त्या दोन्ही प्राध्यापकानी विद्यालयात खुलासा सादर केला नाही म्हणून आपले गैरवर्तन समाधान कारक व सत्यता पुर्ण खुलासा न केल्याने संस्थेची बदनामी झाली आहे यामध्ये संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकररावजी चव्हाण यांच्या विचारांना बाधा आणण्याचे काम प्राध्यापका कडून केले जात आहे या अशोभनिय कृत करणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई करावी अशी मागणी पालक वर्गातून होत होती त्यानुसार प्रा डॉ समीर पाटील व प्रा सचिन नरवडे या दोघांना ३ ( तिन ) महिन्यासाठी निलंबित करण्यात येत आहे .
महाविद्यालयाच्या नावलौकिकास नाहक बदनाम होत चालले आहे
याच महाविद्यालयात नळदुर्ग शहर व ग्रामिण भागातील विद्यार्थी खुप मोठया प्रमाणात शिक्षण घेत आसतात बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, कै. शिवाजीराव पाटील बाभळगावकर, कै. सि ना आलुरे गुरुजी व कै. नरेंद्र बोरगावकर या चार नेत्यांनी या कॉलेजची धुरा खुप मोठ्या प्रमाणात सांभाळली होती. या चारही नेत्यांनी विद्यार्थ्यांचे हीत लक्षात घेऊन काम केले आहे सदरील घटनेची चौकशी समिती यांच्याकडून चौकाशी समितीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत महविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड यांनी अशोभनिय गैरवर्तन करणाऱ्या दोन्ही प्राध्यापकावर निलंबनाची कुऱ्हाड घातली आहे . त्यांची ३ महिन्यासाठी निलंबन करण्यात आले आहे . निलंबन काळात दररोज यशवंतराव चव्हाण महविद्यालय तुळजापूर येथे मुख्यालयी उपस्थित राहातील आशा प्रकारची निलंबीत केलेल पत्र प्राप्त झाले आहे .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत