जातीवर आधारलेली वर्णव्यवस्था

** जातीवर आधारलेली वर्णव्यवस्था ही ईश्वरनिर्मित आहे, असे गोडवलकर गुरुजी यांनी 1जानेवारी 1969 ला नवाकाळ या मुंबईच्या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.
** जाती या देवाने निर्माण केल्या नसून पंडिताने निर्माण केलेल्या आहे असे मोहन भागवत यांनी 5 फेब्रुवारी 2023 रोजी म्हटलेले आहे.
आरएसएस चे पहिले सरसंघचालक गोळवलकर गुरुजी खोटे बोलले होते की आजचे सरसंघचालक मोहन भागवतजी खोटे बोलत आहे.?
‘स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव’ या ग्रंथामध्ये चंद्रकांत झटाले पृ.क्र.64,65 वर म्हणतात -“संघाचा उद्देश भारतामध्ये पुन्हा वर्णव्यवस्था स्थापन करणे आहे.
गोडवलकरांनी 1 जानेवारी 1969 ला नवाकाळ या मुंबईच्या दैनिकाला जी मुलाखत दिली होती त्यात वर्णव्यवस्थेचा अत्यंत हिनपने पुरस्कार केला. म्हणजे संघाचा उद्देश इथे पुन्हा वर्णव्यवस्था स्थापन करणे हा आहे. त्याकूप्रसिद्ध मुलाखतीमधील काही अंश पुढील प्रमाणे-
प्रश्न : तथापि, वर्ण जन्माने प्राप्त होत असल्याने ही व्यवस्था गैर ठरत नाही का ?
गोळवलकर गुरुजी :
जन्माने प्राप्त होणाऱ्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेत गैर काही नाही. मात्र त्यात लवचिकपणा ठेवायला हवा व तसा तो होताही. पण लवचिकपणा ठेवून जन्मावर आधारलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था उचितच आहे. समाजाच्या स्थैर्यासाठी व उत्कर्षासाठी ही व्यवस्था आहे व कर्मफलाची आशा न धरणारे हिंदू धर्माचे मूलतत्त्वच असल्याने ती व्यवस्था स्वीकारताना कुणालाही अडचण नाही. अनुशासनबद्ध अशा समाज रचनेसाठी कर्मफल त्यागावर आधारलेली वर्ण व्यवस्था आवश्यकच आहे. आजही शिल्पशास्त्र हे सांगते की, दगडात देखील चार वर्ण आहेत. या चार वर्णाचे दगड जर एकत्र बसविले, तर बांधकाम अतिशय मजबूत होते.
प्रश्न : पण चातुर्वर्ण्य ही रुढीवादी आहे की धर्म आहे ?
गोळवलकर गुरुजी :
ती रुढी नसून तो धर्माचा आहे. श्रुती-स्मृती(मनुस्मृति) ईश्वरनिर्मित आहे व त्यात सांगितलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था ही देखील ईश्वर निर्मित आहे. किंबहुना ईश्वर निर्मित असल्यामुळेच त्याची जरी मोडतोड झाली असली तरी आम्ही काळजी करीत नाही. कारण मानवाने मोडतोड आज केली तरी ती ईश्वरीय योजना आहे ती पुन्हा प्रस्थापित होणारच आहे.”
म्हणजे गोळवलकर गुरुजी 1 जानेवारी 1969 रोजी जाहीरपणे म्हणतात की वर्ण व्यवस्था ही ईश्वराने निर्माण केलेली आहे. जातीव्यवस्था म्हणजेच वर्णव्यवस्था होय भारतामध्ये ज्या असंख्य जाती आहे. असंख्य जातींना चार वर्णांमध्ये विभक्त केल्या गेले म्हणून त्याला चातुर्वण्य व्यवस्था म्हणतात. जातीव्यवस्था अर्थातच वर्णव्यवस्था ही ईश्वराने निर्माण केली आहे असे गोळवलकर गुरुजीचे स्पष्ट मत आहे.
**. आता 5 फेब्रुवारी 2023 रोजी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात,’जाती ईश्वराने बनविलेल्या नसून पंडिताने बनविलेले आहे.’
आता सांगा या दोन्ही सर संघ चालकाच्या विधानामध्ये एवढी तफावत का? दोघांचीही विधाने एकमेकांच्या परस्पर विरोधी आहे. या दोघांपैकी नेमके खोटे कोण बोलत आहे ?
माझ्या मते दोघेही सरसंघचालक भारतीय समाजाला मूर्ख बनवत आहे. गोळवलकर गुरुजी म्हणतात जातीवर आधारलेली वर्णव्यवस्था ही ईश्वर निर्मित आहे. वर्ण व्यवस्था ही ईश्वराने निर्माण केली ते केवळ एवढ्यासाठी म्हणतात की भारतातील बहुजन समाजाचे मनोबल खच्चीकरण करण्यासाठी. आता देवानेच ही वर्ण व्यवस्था तयार केली आहे म्हटल्यावर आपण त्याच्या विरोधात कितीही लढलो तरी ती वर्णव्यवस्था स्थापन होणारच आहे अशी लोकांची मनाची तयारी व्हावी म्हणून गोळवलकर गुरुजींनी वर्ण व्यवस्था ईश्वरनिर्मित आहे असे विधान केलेले आहे. वास्तविक पाहता वर्णव्यवस्था ही ईश्वराने निर्माण केलेली नसून ब्राह्मणानेच म्हणजेच पंडितानेच निर्माण केली आहे आणि ब्राह्मणांनी निर्माण केलेली वर्ण व्यवस्था ही आपल्याला मोडीत काढता येते,उध्वस्तही करता येते.
दुसऱ्या बाजूला मोहन भागवत जे म्हणतात की जाती या देवाने निर्माण केलेल्या नसून पंडिताने निर्माण केलेले आहे. म्हणजेच ब्राह्मणांनी निर्माण केलेले आहे. राजू भैय्या हे एक संघचालक जर सोडले तर बाकी सर्व संघाचे सरसंघचालक हे ब्राह्मणच बनलेले आहे.
आज जे संघ कार्य करत आहे त्यामध्ये जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था आचरणात आणून ती जोपासण्याचे काम आर एस एस आणि त्याच्या सर्व संघटना सतत करीत आहे. म्हणून दोघांचीही विधाने ही ओबीसी,एसटी,एससी समाजाला मूर्ख बनविण्यासाठी जाणून बुजून करण्यात आलेली आहे. जेणेकरून हा समाज कायम गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये राहावा.
मानसिकतेने गोंधळलेल्या समाजाचा वापर जातीवर आधारलेली वर्ण व्यवस्था स्थापन करण्यासाठी संघाला सहज करता येतो. म्हणून ती अशी परस्पर विरोधी विधाने करीत आहे.
यांनी काहीही विधाने केली तरी त्यांना जाती व्यवस्थेवर आधारलेली वर्णव्यवस्था या समाजामध्ये प्रस्थापित करून ओबीसी,एसटी,एससी यांना गुलाम बनवायचेच आहे. ओबीसी एसटी एसटी समाजाने जागरूक राहून यांचे षडयंत्र ओळखून यांच्या विरोधात छातीठोकपणे उभे राहिले तर यांना कधीही या देशांमध्ये पुन्हा वर्ण व्यवस्था स्थापन करता येणे शक्य नाही.
गंगाधर नाखले
02/09/2025,7972722081
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत