महापुरुषांच्या विचारांचे वारसदार की पराभव करणारे नतद्रष्ठ

लेखन :- अशोक नागकीर्ति
दिनांक :- ३१/८/२०२५
मोबाईल :- 7039120462
भाग — ३३
समता ; स्वातंत्र्य ; बंधुत्व व न्याय
बौद्ध धम्माने जगाला समतेचे तत्व दिले आहे.बौद्ध धम्म हा माणसाला व त्याच्या मनाला महत्व देत असतो.मानवी समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी समस्त मानव जाती बद्धल बंधुभाव असने व त्या व्यक्तीचे स्वातंत्र्य स्वीकारणे महत्वाचे आहे.
समता ही आपल्या घरापासून सूरू झाली पाहिजे.घरामध्ये आपण कोणताही भेदभाव न करता एकमेकांबरोबर जगले पाहिजे.घरामध्ये आपण मुलांच्या समोर इतर जाती;धर्माबद्दल तुच्छतेने बोलत असु तर मुले व घरातील माणसे सुद्धा त्या गोष्टी लक्षात ठेवून ते सुद्धा तसे वागू शकतात.जर असा प्रकार बऱ्याच घरांमध्ये जाती द्वेष व धर्म द्वेष याबाबत होत असेल तर राष्ट्रामध्ये जाती द्वेषाचे व धर्म द्वेषाचे विष पसरून राष्ट्र लयास जाण्याचा धोका जास्त असतो.म्हणजे आपण घरात दुसऱ्यांना नावे ठेवण्याचे बंद केले तर मुले व घरातील माणसे समाजात किंवा त्याच्या शाळेत ; कार्यालयात मित्रांबरोबर चांगले वागू शकतील.याचा अर्थ मुलांना किंवा घरातील सदस्यांना आपल्या घरातून माणुसकीचे ; समतेचे धडे मिळाले तर देशात समता प्रस्थापित व्हायला वेळ लागणार नाही.
आपण निसर्गाकडे पाहिले तर असे दिसेल की; निसर्गात कोणा बद्धल भेदभाव केला जात नाही हे दिसेल.सुर्य सर्वांवर प्रकाश सारख्याच प्रमाणात पाडतो.हवा सर्विकडे सारख्याच प्रमाणात वहाते.पाणि काही कोणाची जात; धर्म पहात नाही.ते सर्वांना सारख्याच प्रमाणात मिळते.जमिनीवर सर्व पशू; पक्षी; प्राणी; मानव मुक्तपणे संचार करतात.
तेव्हा निसर्गातल्या या समतेचा लोभी;स्वार्थी; जातीयवादी लोकांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. आपल्या लोभी;स्वार्थी; जातीयवादी वागण्यामुळे समाजात भेद निर्माण होऊन ते कलहाचे कारण होते.या अशा वागण्यामुळे आपण इतरांना दुःख देतो.त्यांची मानहानी करतो.किंवा इतरांच्या हक्क;अधिकार;स्वातंत्र्यावर गदा आणतो. हे मानवतेच्या विरूद्ध आचरण आहे.
आपण समतेच्या दृष्टीने आपल्याकडे पाहिले तर हे लक्षात येईल की; आपले मन सुद्धा विषमतेने ग्रासलेले असते.आपल्या मनात लोभ; द्वेष; मोह; स्वार्थ;मीपणा;अहंकार यामुळे आपण विषमतेच्या मनाने जगत असतो.त्यामुळे कुटुंबात; समाजात; संस्था; संघटना; पक्ष यामध्ये दुस्वास; भेदभाव करण्याच्या प्रवृत्तीमुळे समतेला तडा जातो.अनेक कुटुंबांना तडे गेलेले आपण पहात असतो.जोपर्यंत आपल्या मनातील लोभी प्रवृत्ती; द्वेषाची प्रवृत्ती; स्वार्थी प्रवृत्ती ; अहंकारी प्रवृत्ती नष्ट होत नाहीत तोपर्यंत आपण समतेचे आचरण करु शकत नाही. सर्व मानव जातीकडे आपण समतेच्या भावनेने पाहु शकत नाही. आपल्या मनाला अकुशल विकारांतून मुक्त करून मनाचा समतोल साधला पाहिजे.आपल्या मनात कुशल विचारांचे निर्माण होणे म्हणजे मनाची समता भावना होय. तेव्हा सर्व मानवजातीला सुखाने;आनंदाने; शांततेने जगायचे असेल तर समतेचे आचरण करणे आवश्यक आहे.आपण आपल्या जीवनात जर मैत्रीचे आचरण केले तर आपल्या मनात असलेले भेद; भेदभाव; दुस्वास; दुष्टपणा नष्ट होतात व आपण मानव जाती बरोबर समतेच्या भावनेने वागू शकतो.
समतेचे मन सर्वांना सामावून घेते.सर्वांना सहकार्य करण्याची भावना असते.सर्वांवर विश्वास ठेवते.सर्वांना कोणताही भेदभाव न करता मदत करते.सर्वांवर जबाबदारी देण्याची मानसिकता असते.कोणाबद्धल दुस्वास नसतो. दुसरा माणूस आपल्या पेक्षा चांगले काम करत असेल तर त्या व्यक्तीबद्दल भय नसते. जळण्याची वृत्ती तयार होत नाही.दुसऱ्याबद्धल असुया निर्माण होत नाही.समतेचे मन हे दुसऱ्यांच्या चांगुलपणाचे भरभरून कौतुक करते. लोकांचे दोष फक्त पहात नाही.समतेच्या मनाला हे माहीत असते की; जगात कोणी परिपूर्ण नाही.फक्त दोष पहात राहिलो तर समाजात समता प्रस्थापित होऊ शकत नाही. कारण दोष पहाणे म्हणजे माणसांपासून दूर जाणे आहे.दुसऱ्याच्या वाईट गोष्टींमुळे लोक एकमेकांपासून दूर जातात.हे अवघड व कठीण आहे की; वाईट माणसाला सुद्धा आपल्यात सामावून घेणे.ज्याचे समतेचे मन असते ते परिपूर्ण मैत्रीने भरलेले असते.त्याच्यात करूणा भावना निर्माण होऊन चुकलेल्यांना क्षमा करून चांगल्या मार्गावर आणण्यासाठी मदत करत असतो.यालाच बौद्ध भाषेत कल्याणमीत्र म्हटले जाते.
उर्वरित भाग पुढे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत