आरोग्यविषयकदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात– डॉ तेजस्विनी गोसावी

बदलती जीवनशैली व युरिया – सुफला अशा प्रकारच्या कृत्रिम खतांपासून उगवलेल्या भाज्या व फळांचे सेवन करणे ह्या गोष्टी आपल्याला नकळत आपण करीत असतो. तसेच लोकसंख्या वाढत असल्यामुळे शेत जमिनी वर सुद्धा घरे बांधणे आपल्याला आढळून येते. सुपीक शेत जमीन कमी असल्यामुळे त्याच त्या जमिनीमध्ये तीन ते चार वेळा पिकाचं उत्पन्न घेणे तेही कृत्रिम खते वापरून शेतकऱ्याला घ्यावे लागते. यामुळे नैसर्गिक रित्या त्या जमिनीचा कस कमी झालेला असतो. अशा शेत जमिनीमधनं जे काही अन्न उगवलं जातं त्या अन्नामध्ये पोषक तत्वांची कमतरता असते. आणि हेच पोषक तत्वांचा अभाव असलेलं जेवण आपण दैनंदिन घेत असतो. त्यामुळे आपण जे अन्न घेतो ते अगदी सात्विक घरचा असतं असे असे गृहीत धरून आपल्या आहारामध्ये जी पोषक तत्वांची कमतरता आढळून येते ती आपल्या लक्षात येत नाही . मात्र कृत्रिम खतांच्या माध्यमातून उत्पन्न होणाऱ्या भाज्या व फळे जे आपण सेवन करतो ते आपल्या शरीरामध्ये जाऊन हळू-हळू साचत असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये केमिकल्स चे प्रमाण वाढत असते. त्यामुळेच आज आपण बघतोय जीवनशैली बदलल्यामुळे आधीच्या आपल्या पूर्वजांच्या तुलनेत म्हणजेच ते खूप कष्ट करायचे आणि फक्त तीनदा जेवायचे, सकाळची न्याहरी, दुपारचे भाजी भाकरी चे जेवण व रात्री पण भाजी भाकरी खाऊन लवकर झोपायचे ही जीवनशैली पूर्ण पणे बदललेली आज दिसून येते. त्यामुळेच जीवनशैलीशी निगडित आजार जसे की मधुमेह सध्या भारतात एक नंबर वर आलेला आहे तसेच थायरॉईड, पीसीओडी, संधिवात, हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक किडनी फेल्युअर लठ्ठपणा इत्यादी… आजारपण बऱ्याच प्रमाणात दिसून येतात.तसेच हृदय विकार, मधुमेह तर आपल्याला एक घर सोडले की दुसऱ्या घरामध्ये दिसून येतात. निवृत्तीनंतर तर आपण ब्लड प्रेशर, मधुमेहासारखे आजार घेऊनच निव्रुक्त होतो. तेव्हा बदलत्या वातावरणा सोबतच आपली जीवनशैली पण चांगल्या प्रकारे ठेवण्याविषयी चे थोडक्यात मार्गदर्शन करते आहे.
आपण दैनंदिन जीवनामध्ये जे काही अन्न घेतो त्यामधल फक्त शरीराला कार्बोदके, प्रथिने, ओमेगा थ्री फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन्स, खनिज, फायबर आणि पाणी एवढेच आवश्यक असते आपण मात्र खूप सारे कर्बोदके म्हणजेच चपात्या भात वगैरे घेत असतो. मात्र त्या तुलनेमध्ये विटामिन्स,खनिज तसेच प्रथिने जे लागतात आपल्या शरीराला ती खूपच अल्प प्रमाणात असतात. त्यामुळेच आपण जर दहा लोक पाहिलेत तर त्यामध्ये नऊ लोकांना प्रथिनांची कमतरता दिसून येते आणि आपल्या शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी प्रथिनांची खूप गरज असते पण आपल्यामध्ये तीच कमतरता दिसून येते. त्याचप्रमाणे आपण जी काही कर्बोदके घेतो शरीरामध्ये त्यामधला अगदी अल्प प्रमाणामध्ये शरीराला जेवढं लागतं तेवढेच शरीर शोषून घेत. इतर सर्व वेस्ट मटेरियल मळाच्या मार्फत बाहेर निघत. पण आपल्याला खूप खायची सवय झालेली असते जोपर्यंत पोट पूर्ण भरत नाही तोपर्यंत आपण खातच असतो.मग हे जे एक्स्ट्रा कार्बोधक असतात ती शरीर चरबीच्या रूपामध्ये जमा करते. हळूहळू रोज ही कार्बोदके चरबीच्या रूपात जमा होऊन आपल्याला लठ्ठपणा हा आपल्यामध्ये दिसून येतो आणि त्यानंतर ही सगळी नमूद केलेली आजार आपल्याला एक एक करून व्हायला सुरुवात होतात. आजच्या युगात कॅन्सर हा आजार तर नागाचा फणा जसा वर काढतो त्याप्रमाणे दिवसेंदिवस वाढतच आहे. आणि हे फक्त आपल्या जीवनशैलीमध्ये बदल झाल्यामुळे तसेच आपल्या शरीरामध्ये साचत गेलेल्या केमिकल्स मुळे. आधी मी कधीतरी कुठल्यातरी गावामध्ये कोण्या तरी व्यक्तीला कॅन्सर झाला आहे असे ऐकायचे. परंतु आता तर कॅन्सरचे रुग्ण खूपच जास्त वाढल्याचे दिसून येतात.
तेव्हा आपण सर्वांनी संतुलित आणि शरीराला आवश्यक आहे तेवढाच आहार घेतला तर आपण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करून या सर्व आजारांपासून मुक्तता मिळवू शकतो तसेच डॉक्टरांचा अनावश्यक खर्च सुद्धा आपण कमी करू शकतो.

डॉक्टर तेजस्विनी गोसावी.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!