आपल्या दुःखाचे कारण आपणच शोधले तर दुःख मुक्ती होईल

-अँड एस के भंडारे
मुंबई – तथागत भगवान बुद्ध हे दुःख, दुःखाचे कारण, दुःख नष्ट करण्याचा मार्ग, मानवता, समानता सांगणारे एक मेव जगत गुरु असून गुरु शिष्य परंपरा त्यांच्यापासून सुरू झाली आहे आणि आपल्या दुःखाचे कारण आपणच शोधले तर म्हणजे मला का दुःख झाले याला कारण काय आहे याचा विचार केला तर दुःख का झाले हे कळले की, दुःख मुक्ती होईल असे प्रतिपादन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी/राष्ट्रीय उपाध्यक्ष अँड एस के भंडारे यांनी चेंबूर येथील महात्मा फुले नगर 1 या शाखेच्या वतीने नुकतेच आयोजित केलेल्या वर्षावास प्रवचन मालिकेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक व गुरू पौर्णिमा आणि वर्षावासाचे महत्व याविषयी बोलताना केले. अध्यक्षस्थानी शाखेच्या अध्यक्षा उषाताई गायकवाड होत्या. ॲड एस के भंडारे पुढे असे म्हणाले की, भगवान बुद्ध यांच्या काळात वर्षावासमध्ये पातीमोक्खः म्हणजे वरिष्ठ भिख्खू समोर चुकीची कबुली देण्याची प्रक्रिया होत असते त्याप्रमाणे आपणही चुकीची कबुली देऊन किंवा विरोधकांना धन्यवाद इत्यादी करून आपण दुःखातून मुक्त होऊ शकतो. या प्रसंगी मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा चंदाताई कासले, कोषाध्यक्ष सारिका झिमुर, सचिव (संस्कार) दिलीप लिहिणार व सुनिल बनसोडे, समता सैनिक दलाचे मेजर जनरल बाबू सावंत, मुंबई झोन पाच चे अध्यक्ष अनंत जाधव इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखेच्या सरचिटणीस मनिषा गवळी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुद्धमाला सकपाळ, छाया गवळी, कमल कांबळे, शशिकला राऊत, रेखा खंडागळे, शोभा मगरे, ज्योती मगरे, अर्चना सुरडकर इत्यादींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी बाजूच्या शाखेचे व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित झाले होते. यावेळी शाखेच्या वतीने ॲड एस के भंडारे यांच्या सन्मानार्थ फटाके वाजविणे व पायावर फुले टाकण्याचा कार्यक्रम भंडारे यांनी सविनय नकार देऊन त्यांनी हे केवळ बाबासाहेब यांच्या परिवारासाठी करावे आम्हा कार्यकर्ते/पदाधिकारी यांसाठी करू नयेत. शेवटी भंडारे यांनी सूचित केल्यानुसार केवळ वर्षावास उद्घाटन म्हणून फटाके वाजविण्यात आले. हा कार्यक्रम मनिषा साळवे, ज्योती मगरे आणि भिका गवळी यांच्या धम्म दानातून संपन्न करण्यात आला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत