दिन विशेषदेशमराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

विहार हे मन मनगट मेंदू मजबूत करण्याचे केंद्र असते प्राध्यापक डॉक्टर भीमराव पाटील


लातूर दिनांक 13 जुलै 2025
समाजातलं अज्ञान अंधश्रद्धा खुळ्या समजुती घालवणे महत्त्वाचे आहे ज्ञानाचा क्रांतीच प्रगतीच उन्नतीचे केंद्र असते विहार हे सदाचार विवेक नीती मूल्यांच्या शिक्षणाचे, व्यसन मुक्तीचे केंद्र असते .असे विचार राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर पाली भाषेचे प्राध्यापक माननीय भीमराव पाटील यांनी व्यक्त केले .
ते वैशाली बुद्ध विहार बौद्ध नगर लातूर येथे बुद्ध धम्म वर्षावास पुणे सुसंस्कार पर्व या रविवारच्या बुद्ध वंदना प्रसंगी बोलत होते. पुढे म्हणाले बुद्ध विहार हे राष्ट्र निर्मितीचे केंद्र असते, तसेच माणसाचे मन मनगट व मेंदू मजबूत करण्याचे केंद्र असते. शाळा महाविद्यालयामध्ये सोयीनुसार आज शिक्षण दिल्या जात आहे सक्षम शिक्षण मिळणे अवघड झाले आहे म्हणून विहारात एकत्र येऊन आम्हाला विज्ञानवादी विवेक वादी पिढी घडवायचे आहे म्हणून आपण विहारात एकत्र येऊन आपली मुलं दैववादी प्रारब्धवादी न बनवता प्रयत्नवादी बनवले पाहिजेत यासाठी विहारात येऊन दर्शनापेक्षा आचरण महत्त्वाचे आहे वाद नको संवाद महत्त्वाचा आहे सुसंवाद घडावा तर्कशुद्ध विज्ञानवादी समाज घडवण्याचे केंद्र म्हणजे विहार आहे .
भगवान बुद्धाचा जन्म वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती वृक्षाखाली व बुद्धाचे परिनिर्वाण वृक्षाखाली म्हणून बुद्ध हे वृक्षप्रेमी होते म्हणून प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावा असे आव्हान केले कपिल वस्तूच्या संथागारामधून हा लोकशाहीचा पहिला प्रारंभ आहे म्हणून भगवान बुद्ध लोकशाहीचे महानायक आहेत लोकशाहीचा विचार मजबूत करण्यासाठी विहारात येणे गरजेच आहे बुद्धाने जग जिंकण्याचा नव्हे तर स्वतःला जिंकण्याचा विचार दिला असे विचार मांडले
प्रारंभी भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प पुष्प माला अर्पण करण्यात येऊन बुद्ध वंदना घेण्यात आली यावेळी डॉक्टर सुनील होळीकर हे एमपीएससी परीक्षेत मागासवर्गीयात प्रथम आल्याबद्दल सत्कार करण्यात आला डॉक्टर अजनीकर ,डॉक्टर कारेपूरकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गौतम चिकाटे यांनी भोजनदान तर केशरबाई सोनवणे आणि खीरदान केले .सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी संघटना भिमाई ग्रुपचे सर्व सदस्य पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजू कांबळे ,सूर्यभान लातूरकर, उत्तम गायकवाड, जगन्नाथ सुरवसे व महिला मंडळाने कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले केशव कांबळे यांनी सूत्रसंचालन केले
प्रसिद्धी केशव कांबळे .
सचिव वैशाली सार्वजनिक बुद्ध विहार लातूर.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!