” भाषेचा वाद, आवश्यकता की अन्य काहीतरी?”

काय रे दादा, भाषा म्हणजे काय ?
भाव भावनांचे,
आदान प्रदान करण्याचे,
असे ते साधन,
त्याला मिळाले, अक्षरांचे बंधन,
अक्षरांना मिळाले, शब्दांचे इंधन,
शब्दा शब्दांना झाले जोडून,
व्याकरणीय भाषेचे इंजिन.!
असे अवाढव्य देश,
दूरवर पसरलेला,
हरएक प्रांताच्या,
विविधतेने नटलेला,
संस्कृती जपलेला,
विविध बोलिंनी, ढंगाने नटलेला,
उच्चारात अनेकानेक, रंग असलेला,
स्वभाषेचा, अभिमान बाळगलेला.!
काळात स्वातंत्र्योत्तर,
प्रगती, सोयी, सुविधेसाठी अन नियोजनानुसार,
केली प्रांत रचना, भाषावार,
प्रत्येक भाषेचा ठेवला आदर,
घेऊनी लक्षात,
निष्ठा, प्रतिष्ठा भाषेची निरंतर.!
नाही उडाला कधीच,
खटका भाषेचा,
नाही केली ढवळा ढवळ, मायबोलीत, कोणत्याही, कुणीही,
नाही उफाळला वाद,कधी ही,
स्थानिक भाषेवर,
कुरघोडी करण्याचा .!
इंग्रजी असे भाषा,
आंतर्राष्ट्रीय व्यवहाराची ,
देवाण घेवाणीची, संपर्काची,
अन विचारांच्या अदान, प्रदानाची,
अनेकांगांनी गरजेची.!
अचानक काय घडले कारण ?
पहिलीपासून हिंदी आग्रहाचे,
आईपेक्षा मावशी प्रेम दाखवण्याचे,
स्वताच्या अडचणींनी,
मेटाकुटीला आलेल्या लोकांत
फाटाफुटीचे विष पेरण्याचे,
मनं कलुषित करण्याचे.!
करणार्यांना करू देत राजकारण,
पण अंतर्मुख होऊन विचार करा, h
भविष्यातील परिणामांचा,
चिंता वाटते, भविष्य काळात,
होईल प्रयत्न, भाषा कुरघोडीचा,
राज्या राज्यांमध्ये धरला जाईल,
आग्रह परराज्य भाषेचा.!
भांडताहेत सर्वच,
पोटतिडकीने मराठी प्रेमाने,
प्रश्न विचारा स्वतःला,
भांडणार्यांची मुलं, शिकताहेत का
मराठी शाळेत ?
गळती लागलीय, मराठी शाळांना,
चिंता आहे का कुणाला?
का महापालिका शाळांचे खाजगीकरण होत आहे?
नका करू कल्ला,
एकमेकांच्या भाषेवर हल्ला,
घ्या मराठी बुद्धिवंतांचा सल्ला,
भरून काढता येईल,
मराठीचा खिळखिळीत,
झालेला किल्ला,
घ्या हातात हात सगळ्यांनी,
निष्ठेने भाषा संवर्धनासाठी,
तरच झेंडा मराठीचा अभिमानाने, मिरवता येईल गल्लोगल्ली.!
तरच झेंडा मराठीचा अभिमानाने,
मिरवता येईल गल्लोगल्ली.!!
तरच झेंडा मराठीचा अभिमानाने,
मिरवता येईल गल्लोगल्ली.!!!
अरुण निकम,
9323249487.
मुंबई.
दिनांक. 30/06/2025.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत