राज्यात आणखी २० हजार शिक्षकांची भरती डीएड-बीएड धारकांना सुवर्णसंधी! लवकरच राबवणार प्रक्रिया

परत एकदा शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याचे आढळून आले आहे.शिक्षण खात्याने आणखी २० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच शिक्षक भरतीसाठी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात १३,५०० शिक्षकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत अनेक शिक्षकांना नियुक्तीपत्र दिले आहे. त्यानुसार विविध शाळांमध्ये शिक्षक दाखल होत आहेत, तरीही सरकारी शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने पुन्हा शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत