डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणूक

आज दिनांक 29 रोजी संध्याकाळी पाच वाजता दहिफळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव दहिफळ येथील भीम नगर मधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती ची भव्य मिरवणूक ठीक साडेपाच वाजता सुरू होणार आहे या भव्य मिरवणुकीला प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक म्हणून धाराशिव जिल्ह्याचे सुप्रसिद्ध विचारवंत महाराष्ट्र शासनाचे समाज भूषण पुरस्कार प्राप्त विजय दादा गायकवाड हे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीनिमित्त उद्घाटक म्हणून विचार व्यक्त करणार आहेत त्यानंतर भव्य अशी मिरवणूक सुरू होणार आहे तरी दहिफळ येथे होणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीत गावातील सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जयंती उत्सव समिती तर्फे करण्यात आले आहे कमिटीचे अध्यक्ष संजय कांबळे उपाध्यक्ष जयंत भाऊ अंगरखे सचिव विनोद कांबळे महादेव कांबळे सर एडवोकेट अजित कांबळे आनंद कांबळे भुजंग कांबळे अभिजीत अंगरखे अमोल अंगरखे बाळू अंगरखे रोहित कांबळे पत्रकार संतोष खुणे, सुरज अंगरखे वसंत अंगरखे वसंत कांबळे जयंती उत्सव कमिटीचे सदस्य दत्ता खंडागळे व भीम नगर मधील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या मिरवणुकीला सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत