इन्साफका तराजू!

शिवराम पाटील
कांग्रेस ने भ्रष्टाचार केला म्हणून मंत्र्यांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक बनले होते.पर्याय काय? पोलिस आणि न्यायाधीश बरबटले होते.ते फक सामान्य माणसांनांच कायदा शिकवत असत.मंत्र्यांना नाही.म्हणून लोकपाल नियुक्ती ची गरज वाटू लागली.जो प्रधानमंत्री, राष्ट्रपती, मुख्यमंत्री यांचीही चौकशी करू शकतो.
पण कांग्रेस ने आण्णा हजारेंचे मानले नाही. भ्रष्टाचार चालावा, असेच त्यांचे धोरण होते.कांग्रेस मंत्र्यांची आणि आमदार खासदार,छूटपुट नेत्यांची माली हालत पाहुन हे खरे वाटते.सिंधीया,होळकर, गायकवाड यांच्या बरोबरीने धनवान झालेत.
लोकपाल विधेयक पारीत करावे.लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्ती करावी यासाठी आण्णा हजारे आग्रही होते.पण ते कांग्रेस ला आवडले नाही.का आवडले नाही?म्हणे, हे कोण भ्रष्टाचारावर लगाम लावणारे? आम्ही मालक.मालकाचा कोणी मालक असतो का? कांग्रेस मधे दोन चार पाच नेते जरी प्रामाणिक असते तर त्यांनी मनमोहनसिंग आणि सोनिया गांधी यांना सांगितले असते.काय हरकत आहे लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्ती द्यायला ? आपण मरेपर्यंत सत्तेवर राहाणारच नाहीत.आपला घडा कधी न कधी भरेलच.मग आपल्या हातून हे चांगले काम करायला काय हरकत आहे?पण इतके शहाणपण आणि प्रामाणिकपणा कांग्रेस नेत्यांकडे आढळला नाही.म्हणून आण्णांनी आंदोलन सुरू केले.त्यातून अनपेक्षित राक्षसाचा उदय झाला.आंदोलन उभारले अरविंद केजरीवाल यांनी.आणि त्याचा लाभ उचलला भाजपाने.दिल्लीत भाजपच्या सत्तेचा अनुभव होता म्हणून लोकांनी कांग्रेस नाकारली पण भाजपला स्विकारले नाही.कारण भाजपवाले सुद्धा भ्रष्टाचार करतात असा अनुभव दिल्लीच्या नागरिकांना होता.म्हणून आम आदमी पार्टी हा नविन पर्याय स्विकारला.कांग्रेसला लोकपाल नको.भाजपला सुद्धा नको.म्हणून नवीन पक्षाला दिल्लीत सत्ता सोपवली.इतर राज्यात आणि केंद्रात मात्र भाजपचा अनुभव नसल्याने भाजप हाच कांग्रेस ला पर्याय समजण्यात आला.हा नाही तर तो.पण भाजप ने आता भ्रष्टाचारात उच्चांक गाठला आहे.निवडणुक यंत्र (इव्हीएम)आणि यंत्रणा(नोकर वर्ग)वर कब्जा केला आहे.पुन्हा पुन्हा निवडणुक नकोच.अशीच खलबते चालू आहेत.त्या दिशेने गलबते जात आहेत.म्हणून आधी माध्यमे,नंतर राष्ट्रपती ,नंतर निवडणूक आयुक्त,नंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश.असे साडेतीन खांब आपल्या ताब्यात घेतलेले आहेत.माध्यमे विकत घेतली.राष्ट्रपती हरसेल्फ किप मम.नो क्वेश्चन.नो इंटरफरन्स.निवडणुक आयुक्त मर्जीतील.सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांना ऑफर. टिल द डेथ ऑन पॉवर.ही एकपक्षिय हुकुमशाहीकडे वाटचाल आहे.शेजारी देशात आहे.चीन, रशिया,उत्तर कोरिया वगैरे.
मोदी आणि शहा हे एक दिवस आरएसएसला पिंजऱ्यात कोंडतील.त्यांनी तयार केलेला वाघ त्यांनाच खाणार.म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी आता पुन्हा सत्तापालट हवी आहे.पण समोर कोणीही पर्याय देऊ शकत नाही.स्वच्छ प्रशासन आणि भ्रष्टाचाराला विरोध करणारा आज तरी कोणताही पक्ष भारतात नाही.एक म्हणतो,माझा बाप पळवला.दुसरा म्हणतो,माझा पुतण्या पळवला.
एकमेकांना विरोध करणारे खूप आहेत.फक्त दुसऱ्याच्या भ्रष्टाचाराला विरोध. हेच सर्व पक्षांचे धोरण आज आहे.विधानसभा उमेदवाराने चाळीस कोटी खर्च केले .बाप रे!ही काय लोकशाही झाली का?नाही !ही तर मत खरेदी विक्री बाजार समीती झाली आहे.ही बदमाषी सर्वच पक्ष करीत आहेत.
परवाच अंजली दमानिया यांनी विचारले .ठाकरेंचा चुला कशावर चालतो? ठाकरेंनी शिवसेना उमेदवारांना किती पैसे दिले होते? किंवा उमेदवारांकडून किती घेतले होते?असा प्रश्न केल्यावर शिवसेनेच्या सुषमा अंधारे धीटपणे म्हणाल्या.आत्मविश्वास दिसत होता .”तुम्ही कोण हा प्रश्न विचारणारे?ईडी कि कॅग?असल्या फडतूस प्रश्नांना उत्तरे देण्यास आम्ही बांधील नाही.”
दोघांचे प्रश्न आणि उत्तरे अर्थपुर्ण आहेत.योग्य आहेत.सरकारी तिजोरी लुटणे.सरकारी नोकरांकडून हप्ते घेणे. हाच राजकारणाचा मुख्य अजेंडा आहे .त्यावर चर्चा नको.तो आमचा घटनादत्त अधिकार आहे.
राजकीय नेत्यांची इतकी हिंमत झाली असेल,ते इतके नेभळट आणि निबर झाले असतील तर पुन्हा विचार करण्याची वेळ आलेली आहे.कारण तिजोरीत जमा होणारा पैसा हा नागरिकांच्या करातून जमा झालेला आहे.तर कोणताही करदाता हा फडणवीस, शिंदे,पवार, ठाकरे,मोदी,शहा यांचा कान धरून विचारून हिशोब घेऊ शकतो.हा विचार करदाता नागरिकांनी केलाच पाहिजे.म्हणून जन जागृती करणे आवश्यक आहे.
शरीर भग्न झाले कि आत्मा शरीर बदलतो.जसे माणूस फाटके वस्र बदलतो.तसे पक्ष बदलण्याची ,नवीन पक्ष निर्माण करण्याची गरज आहे.अशी गरज ४८ वर्षापुर्वी १९७७ मधे पडली होती.जनता पक्ष निर्माण झाला होता.भ्रष्टाचार आणि हुकुमशाहीला कंटाळलेल्या नागरिकांनी असंघटित जनता पक्षाला समर्थन दिले होते.जरी तो पक्ष टिकला नाही पण सत्तेला शहाणपण शिकवून गेला.१२ वर्षांपूर्वी अशीच गरज पडली होती.२०१४ मधे.लोकपालसाठी उपोषण करणाऱ्या आण्णा हजारेंना अटक करण्याची दुर्बुद्धी कांग्रेसला झाली होती.तोच आत्मविश्वास,तिच घमंड,तिच दर्पोक्ती आज भाजप करीत आहे.म्हणून दर पांच वर्षांनी सत्तांतर घडवून आणणे आवश्यक आहे.दहा वर्षात सत्तांतर घडवता येत नसेल तर ते लोकांचे अपयश आहे.लोकशाही विचारांचे पतन आहे.
सत्तांतराची गरज आज नव्हे पुढेही पडत राहिल. नागरिक हा राजकीय जागृत असलाच पाहिजे.भ्रष्ट झाले असेल,नको असेल तर त्यागले पाहिजे.हाच एक चांगला उपाय लोकशाही टिकवण्यासाठी उपलब्ध आहे.बारा वर्षे सत्ता नसलेल्या कांग्रेस नेत्यांची तिजोरी बरीच रिकामी झाली आहे.आता ते जमीनीवर उतरले आहेत.विदेशी ऐवजी देशीवर आले आहेत.पण भ्रष्टाचाराची सवय मात्र गेलेली दिसत नाही.सत्ता मिळाली कि पुन्हा करणारच.आधी उमेदवारांना निवडणुकीत पैसा पुरवत असत.आता २०२४ मधे उमेदवारांना लुटले.अमळनेर विधानसभा उमेदवाराला जिल्हा अध्यक्षाने २ लाखात लुटले आणि निरीक्षकाने ५ लाखात.
काल हवालदार.आज ठाणेदार.असा आलटून पालटून बलात्कार केला तर तक्रार करावी कोणाकडे? पोलिस आणि न्यायाधीश यांना लोकशाहीशी काहीच सोयरसुतक नाही.पर्याय काय?इन्साफका तराजू.”जस्टीस साहब ,मेरे पिस्तूल में सातवी गोली होती तो,आपके सिनेमे उतार देती.मै इतनी चिल्लाई,दलिले की,फिरभी आपके दिमागमे मेरा दर्द उतरा नहीं.आपके हाथ टेबल के निचे थे.इसलिये इन्साफका तराजू मैने मेरे हाथ ले लिया.”
छत्रपती संभाजी महाराज नगर चे मा.शेषराव चव्हाण साहेब,सिंधूदुर्गचे मा .शाम सावंत साहेब , अहिल्यादेवी नगरचे एड शिवाजीराव ढमाले साहेबांचा आग्रह आहे कि, लोकशाही प्रणाली टिकवणे,चालवणे यासाठी बुद्धिजिवी लोकांनी एकत्र येऊन निर्बुद्ध आणि बेशिस्त नेत्यांवर अंकुश ठेवला पाहिजे.मी बुद्धिमान आहे, उच्चशिक्षित आहे, प्रामाणिक आहे म्हणून मला कोणीही राजकारणात घेत नाही.ही खंत असलेल्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे.कारण आता राज धर्माला ग्लानी आलेली आहे.राज धर्म भ्रष्ट होऊन ईश्वरी धर्माच्या आड लपत आहे. सत्ता,संपत्ती मिळवण्यासाठी आणि बदला घेण्यासाठी ईश्वरी धर्म वापरला जात आहे.आधी साधू,संत , महंत धर्माचे ठेकेदार होते.नंतर राजकीय नेते ठेकेदार बनले.आता तर अतिरेकी धर्माचे ठेकेदार बनलेले आहेत.”बोलो,तुम्हारा धरम कौनसा है?”
… शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत