देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

मनावर ताबा म्हणजेच, अत्त दीप भव्!

प्रा.मुकुंद दखणे.


मनावरील औषध मनच आहे.
आणि म्हणूनच सर्व प्रथम स्वतःच्या मनाला जपलं पाहिजे. स्वतःच्या मनाला जपत जपत दुसर्यांच्या मनाचा काणोसा घेत राहिले पाहिजे. आपल्या मनाला जपत असतांना, आपल्या मनात जे असंख्य विचार, क्षणोक्षणी प्रगटत राहत असतात, त्या विचारांचे प्रामुख्याने दोन भागात, त्याच क्षणी विभाजन आपण स्वतः केले पाहिजे (1)चांगले, मानवीय आणि (2)वाईट
अमानवीय असे.
जे जे चांगले मानवीय आहे, हे ठरवितांना, तथागत बुद्धाने दिलेले पंचशील आपल्या डोळ्यासमोर ठेवून, त्यास अनुकुल विचारांचा मार्ग
चोखंदळत राहत असतांना त्यास अडथळा आणणारे वाईट विचार, जे पंचशीलाच्या विपरित आहे त्याचे त्याच क्षणी आपण मनातुन उच्चाटन करीत राहीले पाहिजे. जे जे अमानवीय, असंस्कृत, वाईट आहे, असे सामाजिक दृष्ट्या वाटत आहे, त्यावर मनाने, मनावर विजय मिळवित राहीले, पाहिजे व ते मनातुन वाहुन टाकले पाहिजे आणि ज्या क्षणी तुम्ही मनात उत्पन्न होत असणारे वाईट विचार संपुष्टात आणाल किंवा वाहुन बाहेर टाकाल, त्याच क्षणी पुन्हा, पुन्हा ते विचार तुमच्यावर हल्ला करीत असले तरी, मनाला असे खंबीर केले पाहिजे कि, त्या वाईट विचाराला क्षणोक्षणी खदखदून टाकत राहिले पाहिजे, आणि असे तुम्ही नित्यनियमित ध्यान करीत राहीले, तर तुम्हच्या मनात येणारे वाईट विचार ज्या क्षणी थांबेल त्याचं क्षणी तुमच्या मनात, वाईट विचारां ऐवजी चांगले, मानविय, सुसंस्कृत विचार प्रगटत राहील, आणि अशा चांगल्या विचारांची माळ तुमच्या मनात निर्माण झाली की, तुम्हास मंदीरात जाण्याची, देव दर्शनाची, गंगेत न्हाहण्याची आवश्यकता राहणार नाही कारण तुमच्या मनात उत्पन्न भीती ही चांगल्या विचार संग्रहाने आपोआप च गायब होईल. कारण
सापेक्षता वादाचा सिद्धांत किंवा कार्यकारणभावाचा सिद्धांत. कोणतीही घटना घडण्याचे कारण असते आणि एक कारण लुप्त झाले तर दुसरे कारण उत्पन्न होत राहत असते आणि म्हणूनच बुद्धाने आपल्या मनावर, आपल्याच मनाने ताबा ठेवण्यासाठी, श्वासावर नियंत्रणाची कला शिकविली, ती जर तुम्हास साध्य झाली तर तुम्हास तुमच्या मनावर, मनाने ताबा मिळविण्यास अगदी सोपे जाईल. हा झाला बुद्ध कालीन उपाय, कारण त्या काळी, पुस्तके, ग्रंथ उपलब्ध नव्हती, पाठांतर हा एकमेव उपाय उपलब्ध तेव्हा होता, आज मात्र, असंख्य उपाय उपलब्ध आहेत. त्यापैकी आजचा सर्वोत्तम उपाय म्हणजे, “रीडिंग हॅबीज” होय. जो वाचन छंद जोपासतो, तो चिंतामुक्त होत जातो. पण वाचतांना आपण काय वाचतो? यावर सुद्धा बरेच काही अवलंबून आहे म्हणूनच ज्ञानवर्धक, विज्ञानवर्धक आणि मनोरंजन वर्धक असेच पुस्तक वाचण्याचा छंद जोपासला पाहिजे, यातुन तुमचा वेळ वाया जाणार नाही, तुमचे ज्ञान प्रगल्भ होवून, विवेक बुद्धी जागृत होऊन, तुम्हास या विश्वाचे सत्य कळण्यास मदत होत राहील. आणि जस जसे तुम्ही सत्याच्या अनुभवशिलतेचा प्रामाणिक भाग व्हाल, तुमची नैतिक शीलगुण क्षमता तुमच्या मनात उत्पन्न राहील तेव्हा तुमचे मन धार्मिक बनेल, तर तुम्हाला कोणत्याही मंदीरात, देवालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही, उलट देव तुमच्या मनात साक्षात उभा असलेला दिसेल, कमरेवर हात, विटेवर स्थीर उभा
पांडुरंग म्हणजे, साक्षात बुद्ध तुमच्या
मनात उत्पन्न होईल, तो धर्म किंवा धम्म म्हणजेच,सातवे इंद्रीय तुमच्या मनात उत्पन्न राहील, तो क्षण म्हणजेच जीवनाचा अतिशय सुंदर आणि आनंदमय, मंगलमय क्षण होय. अशा आंनदीमन मनात, आत्महत्या करण्याचा विचार डोकावणार सुद्धा नाही उलट, खुप खुप जगावेसे वाटत राहील.

            लक्षात घ्या कि, मनुष्य जन्मताच, मनुष्या जवळ, मृतू तसेच 

शारीरिक भूक,आणि मानसिक भूक ही नैसर्गिक उत्पन्न असते. आणि आयुष्यभर या तिन्हीवर मात करीत राहावे लागते. जो या तिन्ही नैसर्गिक स्वभावावर मात करण्यात सक्षम बनतो तोच जीवन सुखी व आनंदी बनुन जीवन जगू शकतो. मृतूची भीती संपली की तुम्ही धैर्यवान बनता आणि धैर्यवान बनले तर आत्मविश्वास प्रगल्भ बनतो आणि आत्मविश्वास वाढला, प्रगल्भ झाला, तर तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी व्हायला, संकटावर मात करायला सज्ज व्हाल आणि ज्या क्षणी संकटावर मात करायला तुम्ही सज्ज असाल, त्या क्षणी मार, वाईट विचार संपुष्टात येईल व तुम्ही तुमच्या जीवनात आनंदी, यशस्वी बनाल.
भूक ही फार मोठी समस्या होय. शारीरिक भुक ही अन्नाची परिपुर्ती करून भागविता येते, परंतू अन्न सहज उपलब्ध होत नाही, ते कमवावे लागते, आणि कमवण्यासाठी शारीरिक, मानसिक परिश्रमाची आवश्यकता असते, कोणत्याही प्रकारची लाज लज्जा न बाळगता, कोणतेही काम हे लहान मोठे न मानता आप आपल्या क्षमतेप्रमाणे प्रामाणिकपणे करीत राहीले तर त्यातुन उत्पन्नातुन आपणास सहज आपली भूक भागविणे शक्य होते, मात्र लोभ,लालसा केली, तर अप्रामाणिकता वाढीस लागून मनावरील ताबा सुटण्याची शक्यता लक्षात घेऊन, दुखद घटना, आत्महत्या, हत्याचे प्रसंग उद्भवू शकते, म्हणूनच प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुणधर्म आहे. हे नुसते शिक्षण घेऊन काही ऐक फायदा नाही तर बुद्धाच्या मते ज्ञान त्यास मनतात, ज्यास अनुभूतीची कास असते. आणि त्या अनुभूतीतुन आर्थिक संपन्न ते कडे होणारी वाटचाल ही शारीरिक भूक, अन्नाने भूक क्षमविण्यास सक्षम ठरते.हे करीत असतांना मनावरचा ताबा सुटणार नाही, याची काळजी घेत राहावे लागते. सेक्स ही मानसिक वजा शारीरिक भुक आहे, त्याच्या आहारी गेले तर कित्येक लोक बरबाद होतांना आपण ऐकतो,आत्महत्येची वेळ येवू शकते. म्हणुनच, ईच्छेवर म्हणजेच मनावर अंकुश ठेवणे आवश्यक असते. भडकावल्याशिवाय आग आटोक्यात आणण्यात च मजा असते, त्या प्रमाणेच ईच्छेवर ताबा मिळवून जो जगतो तो, यशवंत होत जातो.
मानसिक भुकेतील सर्वात महत्वाची भूक म्हणजेच, अभ्यासाची, वाचण्याची भुक होय. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रमाणे आयुष्यभर वाचनाची गोडी निर्माण करुन, जो वाचत राहतो, तो सदाकाळ वाचतच राहतो, तो अधिक चिंतामुक्त, बनुन पुस्तकाचा मित्र बनतो. आणि ज्याच्या जीवनात पुस्तका समान मित्र असतो, तो आनंदी आनंद निर्माण होईल असे वर्तन करीत राहतो. आणि जीवनात सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे व्यावहारिक वर्तन होय. ज्याचा मनावर ताबा असतो, त्याचे वर्तन सुशिक्षित, सुसांस्कृतिक बनते तर ज्याचा मनावर ताबा नसतो त्याचे वर्तन हे असंस्कृत, अशिक्षित, वेडगळ बनते.
असे वेडगळ वर्तन मुक्तीचा मार्ग म्हणजेच स्वतःच्या “मनावर ताबा मिळविणे”, म्हणजेच ,
“अत्त दीप भव् ” मार्ग होय.
🪷
प्रा.मुकुंद दखणे.
यवतमाळ 9373011954.
जयभीम 🙏🏾जयभारत

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!