महाराष्ट्रमुख्यपानराजकीय
राज्यसभेच्या ६ जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी राज्यातल्या ६ जागांसाठी दाखल झालेल्या ७ अर्जांपैकी एक अर्ज बाद झाला. पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते विश्वास जगताप यांनी अपक्ष म्हणून भरलेला अर्ज आज पडताळणीअंती बाद ठरल्यानं ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकीसाठी भाजपाकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांनी अर्ज भरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल, काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि शिवसेनेकडून मिलिंद देवरा हे उमेदवार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत