आज आदित्य ठाकरे यांचा नाशिक दौरा.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे दोन दिवशीय दुष्काळी दौऱ्यावर आहेत. कालच त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुष्काळी दौरा करत शेतकऱ्यांशी संवाद साधला तर आज नाशिक जिल्ह्याच्या दुष्काळी भागात जाऊन ते पाहणी करणार आहेत. यात निफाडसह सिन्नर, इगतपुरी तालुक्यात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
एकीकडे यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मागील आठवड्यात झालेल्या पावसांनंतर पुन्हा पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे हाती येणारी पिकेही जळू लागली आहेत. अनेक भागातील पिकांना मोठा फटका बसला असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशातच अहमदनगर जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर उद्धव ठाकरे येऊन गेले. त्यांनी देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जात पावसाअभावी नुकसान होत असलेल्या पिकांची पाहणी केली त्यानंतर लागलीच युवा सेनेचे आदित्य ठाकरे हे देखील मैदानात उतरले असून दोन दिवसांच्या दुष्काळी दौऱ्यात त्यांनी काल दिवसभर संभाजीनगर जिल्ह्यात पाहणी केली. त्यानंतर आज ते नाशिक जिल्ह्यातील सिन्नर निफाड, इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



