महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

काँग्रेस कार्यकारिणीची आज हैदराबाद मध्ये बैठक.

दि.१६सप्टेंबर : ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रसचे अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच त्यांच्या अध्यक्षतेखाली आज हैदराबाद मध्ये कॉंग्रेस कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक होणार आहे. या बैठकीत तेलंगणासह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर चर्चा होणार असून, त्यासाठी रणनीतीही आखली जाणार आहे. त्यासाठी देशभरातील काँग्रेस नेते आज हैदराबादमध्ये एकत्र येणार आहेत.

आजपासून दोन दिवस देशताली काँग्रेसचे नेते हैदराबादमध्ये असणार आहेत. कॉंग्रेस कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक हैदराबादमध्ये पार पडणार आहे.
उद्या रविवारी (17 सप्टेंबर) काँग्रेस पक्षाची हैदराबादमध्ये विजयी रॅली निघणार आहे. तर तेलंगणा राज्यासाठी काही घोषणाही जाहीर करण्यात येणार आहेत. मल्लिकार्जुन खर्रे यांनी गेल्या महिन्यातच काँग्रेस कार्यकारिणीच्या नव्या टीमची घोषणा केली होती. त्यानंतर प्रथमच काँग्रेस कार्यकारिणीची आज बैठक होत आहे.

आज होणाऱ्या या बैठकीला पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह माजी अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर दोन दिवस चालणाऱ्या या सभेसाठी देशभरातील काँग्रेसचे छोटे-मोठे नेते हैदराबादमध्य जमायला सुरुवात झाली आहे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!