
काही स्वयंघोषित अभ्यासक, समाजवादी, मार्क्सवादी त्यांचा भाषण व लिखाणातून सतत टीका करतात की आंबेडकरी अनुयायानी बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामध्ये बंदिस्त केले, फक्त 14 एप्रिल या दिवशी त्यांना बाबासाहेबांची आठवण येते, जयंती नाचून नाहीतर वाचून साजरी करा…..हे सर्व टीकाकार त्यांचा विशिष्ट हेतू नजरेसमोर ठेवून हे आरोप करतात…
या बाबासाहेबांच्या पुतळ्यांचे (बराच वेळ असे पुतळे ओबडधोबड साधे तर काही ठिकाणी अतिशय सुंदर असतात ) आणि जयंतीच्या मिरवणुका यांचे कोणीच ऐतिहासिक सामाजिक विश्लेषण करण्याच्या फंदात पडलेले दिसत नाही…. याच पुतळ्यांनी पूर्ण भारतामध्ये ज्या ज्या खेड्यामध्ये अजून रस्ते आणि शाळा देखील पोहोचले नाहीत त्या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार आणि संहिता अदृश्य पद्धतीने प्रक्षेपित केल्यात, भलेही त्या ग्रामीण भागातील लोकांनी बाबासाहेबांचे साहित्य वाचलेले नसू द्या परंतु त्यांना या मिरवणुका आणि पुतळ्यांच्या मार्फत आंबेडकरी आचारसंहिता समजल्या.. घरातील छोटासा मुलगा तीन-चार वर्षाचा व्हायला लागल्यानंतर त्याला ‘बाळा काकांना जय भीम कर’ असे वाक्य शिकवले जाते आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे बोट दाखवून ‘ बाळा हात जोड आणि हे कोण आहेत सांग बरं ‘ …या पध्दतीने कळत नकळत प्रशिक्षित केले जाते…
ज्यावेळेस आंबेडकरी चळवळ नेतृत्वहीन होते त्या वेळेस आंबेडकरी तत्त्वज्ञान अबाधित ठेवण्याचे काम हे जयंती मिरवणूक आणि पुतळे करतात … याच जयंती मिरवणूक आणि पुतळ्यांमुळे मार्क्सवादी, समाजवादी आणि इतर सर्व यांना आंबेडकरी चळवळ गिळंकृत करता आली नाही ..,..
ज्या ठिकाणी आंबेडकरी विचारांचा झेंडा घेऊन , आंबेडकरी विचारांचे ग्रंथ घेऊन कोणी पोहोचत नाही त्या ठिकाणी आंबेडकरी तत्त्वज्ञान आचार विचार सहिता ही मिरवणुका आणि पुतळ्यामार्फत पोहोचते ..
१९८० मध्ये प्रसिद्ध पत्रकार प्रभाकर पाध्ये म्हणाले आंबेडकर जयंती आणि पुतळ्यांचे महत्त्व समजण्यासाठी आणि त्यांचा पडलेला प्रभाव अभ्यासण्यासाठी व्यक्तीकडे तेवढी बौद्धिक कुवत आणि प्रमाणिकपणा पाहिजे…
याच पुतळे आणि जयंतीच्या मिरवणुकामुळे आंबेडकरवाद ना कोणाला assimilate करता आला ना appropriate करता आला..
आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे 1935 पासून सर्वांनी इतर सर्व सांस्कृतिक सणांना तिलांजली देऊन फक्त आणि फक्त 14 एप्रिल हाच आपला सर्वोच्च सण/त्योहार म्हणून सर्वमान्य पद्धतीने स्वीकारला आहे..
Prakash Tupe
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत