बदल जाणवला, ओबीसी जागा होतोय….!!

मुठभर विषमतावाद्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने औरंगजेबाच्या कबरी चा मुद्दा आणि नागपूर येथील दंगल घडविली आणि समाज मनाचा अदमास घेतला. मणिपूर सारखा महाराष्ट्र पेटविता येतो का.???
उद्देश साफ होता. ओबीसी आणि मुस्लिमांना आपसात भिडवून हिंदुत्व, हिंदुत्व करीत मुठभर सवर्णांच्या हिताचं राज्य येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीत बिहार आणि इतर राज्यात प्रस्थापित करायचं….!!
दररोज नव्या नव्या शकली लढवून धार्मिक दंगली पेटविण्याचा हा मनुवादी कपटी डाव बहूतेक ओबीसी बहुजनांच्या लक्षात आला असावा. म्हणून तर औरंगजेबाची कबर खोदायला जाणार कोण.??? या प्रश्नावर घोडं अडलं आणि मुठभर सवर्ण पेचात अडकल्याचे दिसले….!!
त्याचे असे झाले की,राज ठाकरे आणि हिंदुत्ववादी संघटनांनी महाराष्ट्रात जेव्हा भोंगे लावून हनुमान चालीसा म्हणण्याची योजना हातात घेतली होती तेव्हा वंचित बहूजन आघाडीचे युवा नेते सुजात दादा आंबेडकरांनी प्रश्न उपस्थित केला होता की, भोंगे लावायला आणि हनुमान चालीसा म्हणणायला रस्त्यावर कोण उतरणार.? नेत्यांची मुलं पुढाकार घेणार असतील तर आमची हरकत नाही मात्र बहुजनांच्या मुलांना अडकवू नका.? सुजात दादा आंबेडकरांची तर्कशुद्ध मांडणी आणि बहूजन हिताय बहूजन सुखाय तत्वज्ञान ओबीसी समुहाच्या चांगलेच लक्षात आले आहे हे आता जाणवू लागले....!!
ऊबाठा सेनेचे खासदार संजय राऊत औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यांवर बोलतांना संसदेत सुजात दादा आंबेडकर यांचीच भाषा बोलले. औरंगजेबाची कबर खोदायला कुदळ,फावळे घेऊन कुणाची मुलं जाणार.?? नेत्यांच्या मुलांनी हातात कुदळ, फावळे घेऊन औरंगजेबाची कबर खोदायला आमचा विरोध नाही….!!
याचा सरळ अर्थ आहे मुठभर सवर्ण ओबीसी बहुजनांच्या मुलांना वापरुन घेतात हे आता सर्वांनाच पटायला लागले आहे. आंबेडकरी चळवळीतील शिकवणीची भाषा आता ऊबाठा सेनेचे नेते त्यांच्या तोंडून संसदे सारख्या सर्वोच्च सभागृहात बोलू लागले आहेत. ही जागृतीची निशानी आहे….!!
नागपूरची दंगल झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी ओबीसी समुहातील दोन पदाधिका-यांची एक अॉडिओ क्लिप सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली…!!
त्या अॉडिओ क्लिप मध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे महत्त्वाचे आणि मोठे दोन पदाधिकारी आपसात एकमेकांना सांगतं आहेत. आपल्या ओबीसींच्या ११ मुलांना दंगलीचे गुन्हे लावून जेलमध्ये डांबले. हा आपल्याच संघटनेतील सवर्णांचा कपटी डाव आहे.त्यांची मुलं पुढे आलीच नाहीत आपल्या ओबीसी मुलांचं भवितव्य बर्बाद करण्याची ही खेळी होती…..!!
दुसरा म्हणतोय तुम्ही तुमच्या मोहल्ल्यातील ओबीसी मुलांना हे पटवून का सांगतं नाही. तेव्हा तो दुसरा पदाधिकारी स्पष्ट करीत म्हणाला मी अनेकदा आपल्या ओबीसींच्या मुलांना कल्पना दिली आहे, यांच्या षढयंत्राची जाणिव करुन देतं असतोच….!!
या अॉडिओ क्लिप मधून असे लक्षात येते की, मुठभर सवर्णांच्या संघटनेतील ओबीसी पदाधिकारी जागृत झाले आहेत. ते आपल्या ओबीसी तरुणांच्या भवितव्या बद्दल जागरुक असल्याचेही जाणवू लागले आहे. त्यांना मुठभर सवर्णांच्या कपटी षढयंत्राची कल्पना आली आहे....!!
तिसरा मुद्दा नागपुरच्या द़गली मधील मुस्लिम समाजाच्या एका गॅरेज मधील नुकसानीचा व्हिडिओ टी. वी. वाल्यांनी दाखविला. त्यामध्ये २५ वर्षापासुन मित्र असलेले एक हिंदू आणि एक मुस्लिम मॅक्नीक संवाद करतांना दिसले. त्यांनी दंगली मध्ये एकमेकांना मदत केल्याची माहिती दिली. आणि आवर्जून सांगितले ही दंगल असामाजिक तत्वाच्या काही बिनडोक लोकांनी नियोजनबद्ध पद्धतीने घडविली आहे. त्यांनी कुठल्याही धर्माचे नांव घेतले नाही….!!
सवर्ण संघटनेतील ओबीसी पदाधिकारी जागृत झाल्याचे लक्षण म्हणजे आता ओबीसी तरुणांची माथी भडकणार नाहीत, जर तसा कुणी प्रयत्न केलाच तर तो यशस्वी होणार नाही म्हणून बदल जाणवला, ही अतिशय सकारात्मक बाब आहे….!!
सर्वसाधारण श्रेणीतील मेकॅनिकल आणि दुकानदार असणारे आम नागरिक यांना समजून चुकले आहे की, ही दंगल असामाजिक तत्वाच्या काही लोकांनी घडवून आणली आहे. त्यामुळे दंगली मधून जनसामान्यांच्या मेंदूत धर्म द्वेष पेरण्याची मनुवादी कपटी चाल त्यांच्या मेंदूत धर्म द्वेष पेरु शकली नाही हे वास्तव सुद्धा ऊघडं झाले आहे….!!
तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे समतावादी, बहूजन हिताय बहूजन सुखाय दृष्टिकोन असलेले आंबेडकरी तत्वज्ञान ऊबाठा सेनेचे नेते जे स्वतः ला कट्टर हिंदूत्ववादी म्हणून घेत राजकारण करीत होते, त्यांच्या तोंडून संसदेच्या सभागृहात मांडू लागले आहेत हा आंबेडकरी विचारांचा विजय आहे….!!
आणि म्हणून मी तर्क मांडलाय बदल जाणवला, ओबीसी जागा होतोय. ओबीसी जागा झाला तर मुठभर पाताळयंत्री लोकांना महाराष्ट्र पेटवता येणार नाही. महाराष्ट्राचा मणिपुर करता येणार नाही….!!
बहुजनांनो लक्षात घ्या बहूजन होता म्हणून खोक्याला दोन दिवसात उत्तर प्रदेशातून बेड्या टाकून महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली. कारण नसतांना बुलडोझर लावून त्याचे घर उध्वस्त केले….!!
परंतु सवर्ण असलेल्या प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला तरीही त्याच्या घरासमोर महाराष्ट्र पोलिसांनी संरक्षण दिले. त्याला फरार व्हायला संधी दिली, पुरावे नष्ट करायला संधी दिली आणि एक महिना महाराष्ट्र पोलिसांना तो दिसला नाही की, जाणिवपूर्वक पकडला नाही.?? विचार केला पाहिजे. राज्य कुणाचे.??
हा महाराष्ट्र कुणाचा.?? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा की, मुठभर सवर्णांचा.???
जयभीम.
@.. भास्कर भोजने.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत