महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची पुढील दिशा –

अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
आज महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संपूर्ण देशात नव्हे विदेशात सुद्धा पोहोचले आहे,ही आनंदाची व समर्थनीय बाब असले तरी अशा प्रकारच्या आंदोलनाने हे आंदोलन यशस्वी होणार नाही, असे आमचे वैयक्तिक मत आहे.
सद्या जे आंदोलन जागोजागी चालू आहे त्यामुळे या विहाराचा इतिहास सर्वसामान्य लोकांना माहिती होतं आहे, त्यामुळे सर्वसामान्य लोक सुद्धा सहभागी होत आहेत, १९४९ च्या कायद्याची माहिती मिळत आहे, अनुच्छेद १३,१४, २५,२६ चा अपमान होत आहे, त्यामुळे सर्वसामान्य लोक जास्तीत जास्त संख्येने गाव, जिल्हा, राज्य, देश विदेशातील अनेक उपासक, उपासिका मोठ्या संख्येने जागोजागी निर्देशने, आंदोलन, मोर्चे काढत आहेत.
या सर्वांमुळे या विहाराविषयी जनजागृती होत असली तरी महाबोधी महाविहार मुक्त होऊ शकणार नाही असे आमचे ठाम मत आहे, यासाठी आपल्याला महाबोधी महाविहारात जमून आंदोलन केले पाहिजे, बिहार विधानसभेवर लाखोंच्या संख्येने मोर्चे, सत्याग्रह केले पाहिजे.
यासाठी देश पातळीवर एक सर्वसमावेशक समिती तयार होऊन सर्वानुमते एक तारीख निश्चित केले पाहिजे,त्या तारखेला लाखो नव्हे करोडोंच्या संख्येने सहभागी होऊन तेथील सरकार दबाव आणला पाहिजे, यासाठी विदेशातील बौद्ध राष्ट्रांची मदत घेतली पाहिजे, स्थानिक सरकार नमत नसेल तर हा प्रश्न युनो मध्ये नेऊन भारत सरकार व स्थानिक सरकार, प्रशासन यावर दबाव आणला पाहिजे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनंतर जागोजागी आंदोलन करण्यापेक्षा हे बुद्ध गया व तेथील विधानसभेत झाले पाहिजे, आता नाही तर कधीच नाही या धोरणाला अनुसरून मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत तेथे सत्याग्रह, निर्देशने, उपोषण झाले पाहिजे यासाठी सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून या आंदोलनात सहभागी झाले पाहिजे वेळ पडली तर आमदारकी, खासदारकी, मंत्रीपदाचा राजीनामा देऊन या आंदोलनात सहभागी झाले पाहिजे.
हा कायदा कसा निर्थक आहे तसेच संविधानाचे उल्लंघन करणारा आहे यासाठी बहुजनातील हुशार वकीलांनी ही केस कौशल्याने कोर्टात लढवली पाहिजे, यासाठी आर्थिक मदत असणं आवश्यक आहे , यावर्षीच्या जयंतीचा पैशातून ५० टक्के रक्कम या आंदोलनाला दिली पाहिजे,या आंदोलनाची राष्ट्रीय कोषागार समिती निर्माण करुन सढळ हाताने मदत करावी.
सहजासहजी स्थानिक सरकार हा ताबा आपल्याला देणार नाही,कारण दिवसाला लाखो कोटी रुपये दान या विहाराला येतात तेव्हा महाविहार समिती व स्थानिक सरकार सहजपणे नमणार नाही , यासाठी अंतर्गत व बाह्य देशातील दबाव आणला पाहिजे, मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन चालू राहिले तरच आपण यशस्वी होवू शकतो, असे माझे वैयक्तिक मत असून या विषयावर जास्तीत जास्त संख्येने आपण प्रतिक्रिया नोंदवा, मार्गदर्शन करावे.
अशोक तुळशीराम भवरे
संविधान प्रचारक/प्रसारक सिडको नांदेड.
दिनांक – १६ मार्च २०२५.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत