क्रोध द्वेष,ईर्षा,मत्सर, कृपंणता, लालचीपणा, ढोंग लबाडी, उद्धटपणा,मोह,प्रमाद हे सर्व दुष्ट विकार आहेत.

🌞 बुध्द धम्म तत्त्वज्ञान🌞
1)चंदन,धूप,कमळ,मधुमालती यांच्या सुगांधापेक्षाही शीलाचा/ सदाचाराचा सुगंध अधिक असतो.
2)अस्थिर जीवन हे वाळवंटातील वृक्षाप्रमाने असते. हे ओळखून प्रज्ञावान मनुष्य अस्थिर मनाच्या आपल्या मित्राला सुधारण्याचा आणि अपवित्रतेतून सद्गुणाकडे त्याला वळविण्याचा प्रयत्न करीत असतो.
3) पुण्य लाभावे म्हणून भुताखेतांना जो बळी देतो किँवा परलोकी सुखाच्या फळाची अपेक्षा करतो त्याला मिळणारे सूख हे सत्पुरूषाचा आदर करणाऱ्या माणसाच्या सुखाच्या एक चतुर्थांशही नसते.
4)जो सदाचाराविषयी तत्पर असतो आणि इतरांचा योग्य तो मान राखतो व वयोवृद्धlविषयी नेहमी आदर बाळगतो,त्याला सौंदर्य,सामर्थ्य,आयुष्य आणि शांती या चार सुखाची प्राप्ती होते.
5) क्रोध द्वेष,ईर्षा,मत्सर, कृपंणता, लालचीपणा, ढोंग लबाडी, उद्धटपणा,मोह,प्रमाद हे सर्व दुष्ट विकार आहेत.
6)कुशल कर्मापासून होणारा लाभ प्रत्तेक कुशल कर्म करणाऱ्याला मिळतो आणि अकुशल कर्माचा दुष्परिणाम कुणालाही टाळता येत नाही.
7) मनुष्य कितीही विद्वान असला तरी तो जर इतरांचा तिरस्कार करण्याइतका स्वतःला मोठा मानू लागला तर तो हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या माणसा सारखा आहे.स्वतः आंधळा आणि इतरांना तो काय प्रकाश दाखविणार?
8) जर मनुष्य दुष्टपणे बोलू लागला किँवा वागू लागला तर ज्याप्रमाणे गाडीच्या बैलाच्या खुरामागुन गाडीचे चाक धावत असते त्याप्रमाणेच अशा माणसाच्या मागून दुःख धावत राहते.
9) पापकर्म करनाऱ्याला सुद्धा जोपर्यंत त्याची पापे पक्व झाली नाहीत तोपर्यंत सुख दिसत राहते. परंतु ज्यावेळी त्याची पापे परिपक्व होतात त्यावेळी त्याला दुःखा शिवाय काहीच दिसत नाही.
10) ज्याप्रमाणे वृक्षाला वेढनारी लता वृक्षाला खाली ओढते, त्याप्रमाणेच ज्याच्या अंगी अतिशय दुष्टपणा असतो तो त्याच्या शत्रुलाही आनंद वाटावा अशा अधोगतीला स्वतःला नेऊन पोहचवतो.
11)कामुकतेने दुःख निपजते. कामुकतेने भय निपजते.जो कामुकतेपासुन मुक्त होतो,तो दुःख आणि भय यापासून विमुक्त होतो.
12) कुशल कर्म करीत जा. अकुशल कर्म करु नका.कुशल कर्म करणारे इहलोकी धन्यता पावतात.
13)आसक्तीमुळे दुःख आणि भय ही उत्पन्न होतात.जो आसक्तीच्या बंधनातून मुक्त आहे, त्याला दुःख नाही,भय नाही.
14) जर माणसाने निरुपद्रवी शुद्धाचरणी आणि निष्पाप मनुष्याला उपद्रव केला तर ज्याप्रमाणे वाऱ्यावर फेकलेली धूळ फेकणाऱ्यावरच येऊन पडते त्याप्रमाणेच त्या माणसाला उपद्रवाचा दुष्परिणाम भोगावाच लागतो.
15)लोखंडापासून निघणारा गंज हा ज्याप्रमाणे लोखंडापासून जन्माला येऊन लोखंडाचाच नाश करतो त्याप्रमाणेच पापी माणसाचे कर्म त्याला दुर्गतीकडे नेत असते.
विश्वातील सर्व मानवांना सर्व काळात उपयुक्त असे तथागत भ.बुद्धाचे धम्म तत्त्वज्ञान.
🙏जयभीम जयबुध्द🙏
एस बी सिंगारे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत