दिन विशेषदेशप.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

ऐतिहासिक माणगाव परिषदेचा 105 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

महापुरुषांच्या विचाराचे वारस व्हा !
– डॉ भीमराव य आंबेडकर

कोल्हापूर(संघसेन यांचेकडून)- डॉ बाबासाहेब आंबेडकरयांनी कधीही कायदे भंग केला नाही त्यांची ही खासियत आहे. चवदार तळे, काळाराम मंदिर सत्याग्रह यातून समाजाला अधिकार माहीत नव्हते ते माहीत करून दिले. डॉ बाबासाहेबांनी राजर्षी शाहू महाराजांची वाणी खरी करून दाखविली, एक महापुरुष दुसऱ्या महापुरुषाला ओळखतो . डॉ बाबासाहेबांना अनेक चटके बसले, बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी
काय काय केले ते सांगायला पाहिजे देशाचे संविधान लिहिले, महिला समानता, राजर्षी शाहू महाराजांचे रिझर्वेशन , महात्मा फुले यांची शिक्षण पॉलिसी, बाबासाहेब मुळे महार बटालियन 1941मध्ये स्थापना केली इत्यादी सांगून महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली, बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना गुरु मानून त्यांचे कार्य पुढे नेले. त्याप्रमाणे आपण महापुरुषांच्या विचाराचे वारसदार व्हावे असे प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातूडॉ भीमराव य आंबेडकर (ट्रस्टी/राष्ट्रीय कार्याध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष, समता सैनिक दल) यांनी राजर्षी शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक माणगाव ता. हातकणंगले येथे 105 व्या वर्धापनानिमित्त दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कोल्हापूर उत्तर जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या दि. 22/3/2025 रोजी माणगाव स्मृती परिषदेमध्ये केले. त्या काळी या ऐतिहासिक परिषदेसाठी ब्राम्हण समाजाचा विरोध असतानाही जैन समाजाचे आप्पासाहेब पाटील यांनी आपली जमीन दिली होती त्याचे पणतू अँड विनीत पाटील हे प्रमुख उपस्थित होते. यावेळी संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अँड एस के भंडारे यांचे मार्गदर्शन झाले त्यात त्यांनी, त्याकाळी आपल्या पूर्वजांना गुलामीतून बाहेर काढण्यासाठी डॉ बाबासाहेब होते व त्यांनी संविधानाच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय, धार्मिक स्वातंत्र्य इत्यादी अधिकार दिले आता ते अधिकार संविधानाचे विरोधक, मनु स्मृतीचे, चतुर्वनाचे आणि विषमतेचे समर्थक असलेले आता सत्तेत आहेत त्यामुळे संविधानिक अधिकार टिकविण्यासाठी पुन्हा विषमतेची गुलामी येऊ नये म्हणजे गळ्यात मडक आणि पाठीला खराटा येऊ नये म्हणून आता सुद्धा डॉ भीमराव आंबेडकरच लढत आहेत त्या लढ्यात संविधान समर्थक जोडो अभियानमध्ये सर्वांनी एकजूट दाखवावी असे आवाहन केले.
या प्रसंगी भिकाजी कांबळे(राष्ट्रीय सचिव), यू जी बोराडे(अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य), एस व्ही ऐनिकर(अध्यक्ष , कोल्हापूर पश्चिम जिल्हा), रेखाताई बनगे (अध्यक्ष, कोल्हापूर उत्तर जिल्हा महिला शाखा) यांनी शुभेच्छा दिल्या. या परिषदेच्या अध्यक्ष स्थानी राजेंद्र भोसले होते. या परिषदेस रुपेश तामगावकर(राज्य संघटक व सांगली पूर्व जिल्हा), वंदना दीक्षित (अध्यक्ष, कोल्हापूर पश्चिम महिला शाखा) ,योगेश कांबळे, नितिन कांबळे, संघमित्रा माणगावकर, संध्याराणी जाधव, स्वप्नीला माने इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी समता सैनिक दलाच्या शिरोळ तालुक्याच्या
वतीने लाठी काठी, तलवार , दांडपट्टा इत्यादीचे मुली,महिला व पुरुष सैनिकांकडून प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. व मेजर एस पी दीक्षित व मेजर तुकाराम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली डॉ भीमराव आंबेडकर आणि इतर सर्व मान्यवरांनी तथागत बुद्ध, शाहू महाराज व आप्पासाहेब पाटील यांना सामूहिक मानवंदना दिली.बौद्ध महासभा भिक्खु संघाचे चैत्यभूमी येथील भंते धम्मप्रिय यांनी त्रिशरण पंचशील, आशीर्वाद दिले. सूत्रसंचालन संतोष भुयेकर यांनी केले व आभार प्रदर्शन सतीश माणगावकर यांनी केले. या स्मृती परिषदेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात श्रामनेर शिबिर ,उपासिका, समता सैनिक दल शिबिर कोल्हापूर व त्या सर्व तालुके, सांगली जिल्ह्यातील संस्थेचे कार्यकर्ते, समाज बांधव व उपासिका यांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!