आटपाडीत जागतिक महिला दिनानिमित्त होम मिनिस्टर व नृत्य स्पर्धा संपन्न

जागतिक महिला दिनानिमित्त आटपाडी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा सौ सुष्मिता सुरेश मोटे व फुले शाहू आंबेडकर विचार मंच आटपाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जवळे हाॅल येथे नुकताच होम मिनिस्टर व नृत्य स्पर्धा संपन्न झाल्या.
यावेळी कर्तुत्वान महिला नवकवीयित्री, उद्योजिका, बचत गटाला प्रोत्साहन देणाऱ्या सी.आर.पी कराटे, चॅम्पियन अशा विविध क्षेत्रातील महिलांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव व सन्मान करण्यात आला .
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून मा सोनिया सुहास बाबर (मॅडम) या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ मनीषा तानाजीराव पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्या) मा. मनिषा बागल ( माजी सभापती, खानापूर) मा वृषाली धनंजय पाटील (माजी सरपंच, ) मा. अश्विनी सुनील तोरणे( आर. पी. आय. जिल्हा उपाध्यक्षा) मा. निकिता तुषार लोंढे ( खानापूर अध्यक्षा आरपीआय, महिला आघाडी)
मा. पुष्पा लोंढे, सुवर्णा गायकवाड,मा. राजेंद्र खरात (जिल्हा अध्यक्ष, आर. पी. आय.) मा. नवनीथ लोंढे साहेब (खानापूर तालुका अध्यक्ष.) , मा तुषार लोंढे ( वकिल संघटना जिल्हा अध्यक्ष) मा. विशाल काटे( आय. टी. सेल, जिल्हा प्रमुख) सौ कविता राजेंद्र खरात ( कार्याध्यक्ष, महिला आघाडी, आटपाडी)
मा.उज्वला ऐवळे (मुढेवाडी सरपंच)
मा.रूपाली कारंडे ( सरपंच, कामथ) उपसरपंच स्वाती ऐवळे, सौ. ऋतुजा अक्षय बनसोडे (पोलीस पाटील पुजारीवाडी, दिघंची) मा, स्वाती सदाशिव सरक( पोलीस पाटील कामथ)या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक विजेत्यांचा, विविध क्षेत्रात काम केलेल्या मान्यवरांचा सन्मान ,सत्कार महिला दिनानिमित्त करण्यात आला.
या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरलेले सिने अभिनेता अभिजीत पाटील यांनी सांगली यांनी होम मिनिस्टर व नृत्य स्पर्धेचे सुत्रसंचलन करीत अॅकर तथा भाऊजी ची भूमिका उत्कृष्ट रित्या संयोजन करून पार पाडली.
तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. जनार्दन मोटे सर, पूजा जनादन मोटे( मॅडम,) सौ ऋतुजा अक्षय बनसोडे, मनिषा पवार तसेच सोनाली चव्हाण, निता शिंपी, लता वाघमारे यांनी कार्यक्रमाचे संयोजन आणि नियोजन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.
महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेमध्ये होम मिनिस्टर चा मान मिळवला प्रथम क्रमांक सौ. शीतल प्रताप यांनी पटकवला. तसेच इतर स्पर्धांमध्ये द्वितीय सौ सुप्रिया गायकवाड तृतीय सौ. वर्षी रविंद्र जाधव ,सौ प्राची विभुते, सौ, सुषमा क्षिरसागर, सौ निलम कांबळे यांनी या स्पर्धेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल पारितोषिक पटकावत सन्मान मिळवला .
.तसेच दिल्ली येथे संपन्न झालेल्या कराटे स्पर्धेमध्ये कु श्रेया महादेव खरात व कु तनिष्का संतोष मोटे तसेच कवयित्री तथा “आठवणींचा हिदोळा “च्या लेखिका सौ. अरुणा शरद चव्हाण ., पाककलेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सौ करिष्मा सचिन वाघमारे, नव उधोजिका सौ धनश्री प्रकाश साबळे, तसेच तालुक्यातील बहुसंख्य सी.आर.पी.महिला बचत गट यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी सोनिया बाबर यांनी उपस्थित महिलांना अनमोल असे सल्लादिला की “आई-वडील तसेच सासू-सासरे यांची काळजी घ्यावी”
कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका सुष्मिता सुरेश मोटे यांनी स्वागताध्यक्ष पदावरून बोलताना म्हणाल्या “आपण येथे सक्षमपणे उभा आहोत ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ,माता रमाई, माता भिमाई ,माता अहिल्या मा जिजाऊ व प्रज्ञासुर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागामुळे आज इथं जमलेलो आहोत. त्यांच्या त्यागाची सतत आठवण ठेवायला हवी”
या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले जेवळे ज्वेलर्स अँड सन्स, मंगलम कलेक्शन, दौंडे कलेक्शन ,सखी साडी सेंटर,नदाफ स्टील सेंटर, सहेलीलेडीज शॉपी अँड जनरल स्टोअर्स, संतोष, ऑप्टिकल्स, कुलदीप मशिनरी अँड हार्डवेअर ,हॅपी बेकर्स शेवंती बाजार, सदाबहार डेकोरेशन, शिवम डेकोरेशन, प्रणव अक्वा ,मा.जनार्दन मोटे सर ,मा.सुरेश मोटे सर यांनी या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्विकारले होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत