राजकारणाचा धर्म की धर्माचे,अधर्म राजकारण?

राष्ट्रप्रेम तेच जे राष्ट्र हिताचे, राष्ट्र धर्माचे पालन करणारे राजकारण होय. आणि खरे राजकारणी तेच जे राजकारणाचा धर्म पाळतात.
धर्म म्हणजे नेमके काय? धर्माचा उद्देश काय? आणि धर्माचे महत्त्व काय? हे नीट न कळल्या कारणास्तव , आज देशात असहिष्णुत वातावरण निर्माण होत आहे.
वास्तविकतः धर्माचे महत्त्व स्पष्ट आहे की, मानवा मानवा मध्ये सहिष्णुता निर्माण करणे, म्हणजेच,मानवाने मानवाप्रती, असा व्यवहार करणे की, कोणत्याही प्रकारचे समाजात, राष्ट्रात असहिष्णुत वातावरण निर्माण होणार नाही. पण असे निदर्शनास येते की, धर्म च असहिष्णुत वातावरण निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहे. तर अशा धर्माला धर्म म्हणता येईल का?की जे धर्म असहिष्णुत वातावरण निर्माण होण्यास कारणीभूत ठरणारे आहे. जीवाच्या जीवनाचा उद्देश हा “जगा आणि जगू द्या!” असा आहे, तर धर्माचा उद्देश हा सुसंस्कृत मानवांची निर्मीती करणे असा असतांना जे धर्म सुसंस्कृत वर्तन करण्याचे शिकविण्या ऐवजी, असंविधानात्म वर्तन करण्याचे शिकवितो त्यास धर्म कसे म्हणता येईल? हा खरा नैतिक प्रश्न उपस्थित
होतो. आणि धर्म च जर नैतिक काय? आणि अनैतिक काय? यातील फरक करण्यास सक्षम ठरत नसेल ,तर अशा धर्मास धर्म कसे म्हणणार? धर्म म्हटला की, मानवीय नैतिक वर्तन आणि मानवीय नैतिक वर्तन म्हटले की, धर्म असा साधा आणि सोपा धर्माचा अर्थ असतांना धर्माचा पायाच अनैतिक संबंधावर भर देणारा असेल तर अशा धर्मास, धर्म कसे म्हणणार? आणि म्हणूनच की काय? काही महापंडित हिंदुस धर्म ठरविण्यासाठी सुप्रीम कोर्टात पोहचले. पण सुप्रीम कोर्टाने हिंदुस जरी अधर्म असे म्हटले नाही, तरी धर्म म्हणण्यास स्पष्ट नाकारले, आणि हिंदु ही एक जीवन पद्धती म्हटले. आणि ज्या अर्थी सुप्रीम कोर्टाने हिंदु धर्म
असल्याचे नाकारले, त्या अर्थी हिंदुधर्माचा पाया हा असहिष्णुत, असंस्कृत आहे असा त्याचा अर्थ स्पष्ट आहे. असे असतांना हिंदुधर्माचे
ठेकेदार हिंदुधर्मातील अधर्म कृत्य,अधर्म प्रवृत्ती आणि अधर्म तत्वज्ञातुन बाहेर पडुन सुसंस्कृत वर्तनाशी धर्म जोडण्याचा प्रयत्न करण्या ऐवजी, तो धर्माच्या मुळ उद्देशापासुन आणखी दुर करण्याचा जो हट्टाहाच चालु आहे तो धर्माला तर लाजिरवाणा आहेच सोबतच राष्ट्राला ही लाजिरवाणा असाच आहे.
भारतीय संविधानाचा सखोल अभ्यास केला, तर भारतीय संविधानाचा मुळ उद्देश हा सुसंस्कृतीची निर्मिती करणे आणि सुसांस्कृतिक राष्ट्र निर्माण करणे असा आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचा पाया हा बुद्ध तत्वज्ञानावर आधारीत रचलेला आहे. कारण कोणतेही राष्ट्र सुसांस्कृतिक आणि सहिष्णुत जीवनाचे निर्माण करायचे असेल तर
समाजातील विषमतेचे समुळ उच्चाटन करणे आणि समतामुलक वातावरण समाजात पेरणे, आवश्यक आहे. भारतीय संविधानाने अनुच्छेद 13 च्या आधारे
भारतीयातील जे असहिष्णुत वातावरण निर्माण करू ईश्चीणारे विषमता कायदेशीर संपवीलेली आहे. पण ती जमिनीवर विषमता आजही बर्याच प्रमाणात कायम असण्याचे कारण आहे, धर्माचे राजकारण.आणि ते अव्याहतपणे स्वातंत्र्याच्या सुवर्ण वर्षात ही आजही कायम आहे. आणि राजकारणीयांचा तो निर्लज्जपणा ढोबळ पणे वावरत आहे. हे जेवढे धर्माचे दुर्दैव आहे त्यापेक्षा अधिक राष्ट्राचे दुर्दैव आहे. यांचं मुख्य कारण
राजकारणीय ठेकेदारांना ना धर्माचे देणे घेणे आहे, ना राष्ट्राचे.? ते फक्त सत्तेसाठी, सत्तेच्या लोभापोटी सत्ताकारण करीत आहे.
आणि जो पर्यंत जमीनीवरील विषमतेचे समुळ उच्चाटन होत नाही तोपर्यंत भारतीय संविधानातील अनुच्छेद 14 प्रभावीपणे कार्यशील होणे असंभव आहे यांची स्पष्ट जाणीव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना असल्या कारणास्तव त्यांनी आरक्षणाची व्यवस्थापन भारतीय संविधानात केलेले आहे,पण त्यांच्या दूरदृष्टीकोणाकडे सपशेल दुर्लक्ष करुन, राजकारणीयांनी आरक्षणाचेच राजकारण करून, संविधानाच्या अनुच्छेद 14 जमिनीवर समता म्हणजे धर्मातील समता प्रस्थापित करणेच्या मुळ उद्देशालाच काळीमा फासण्याचा उपद्व्याप सुरु ठेवलेला आहे आणि म्हणूनच, देशात सर्वदूर असहिष्णुत वातावरण आणि भ्रष्ट आचारांचा, भ्रष्टाचाराचा महापूर येत आहे. अर्थात धर्माचे राजकारण ऐकमेकांच्या छाताडावर बसून चालू आहे.
वास्तविकतः धर्माचे राजकारण करण्यापेक्षा राजकारणाचा धर्म ,भारतीय संविधानाप्रमाणे वर्तन करणे अव्याहतपणे सुरू राहण्याची काळाची गरज आहे. पण राजकिय पुढार्यांना त्याचे देणेघेणे नाही. हेच आजच्या सुरू असलेल्या तोडफोडीच्या राजकारणातुन स्पष्ट होते.
तथागत बुद्ध यांनी जगाला सर्वप्रथम राजाचा, राजकारणीयांचा धर्म सांगितला की राजाने सर्वप्रथम समाजातील सामाजिक विषमतेची दरी दूर करून
समाजात समतेची पेरणी करणे.व्यक्ती, समाज व राष्ट्राची आर्थिक सक्षमता निर्माण होण्यातील
सर्वात मोठा अडथळा कोणता असेल तर तो आहे, समाजातील विषमता आणि जमिनीवरील समतेचा अभाव. आणि धर्म च जर तो अडथळा निर्माण करू इच्छित असेल तर त्यास धर्म कसे म्हणता येईल म्हणूनच भगवान बुद्धाच्या धर्माचा पाया, उद्देश हा समता या तत्वावर रचलेला आहे तो जर कां राजकारणींयांचा किंवा राजाचा असेल ?तरच देशातील असहिष्णुत वातावरण संपुष्टात येऊन आनंदीदायक आणि भरभराटीची जीवन पद्धती, सुसांस्कृतिक राष्ट्राची निर्मिती शक्य आहे या उद्देशाने तथागत बुद्धाने राजाचा धर्म सांगितलेला आहे. तो आज बुद्धाचा धर्म बौद्ध धम्म म्हणून प्रसिद्ध आहे आणि भारतीय संविधान ही बौद्ध धम्माचे प्रतीलिपी स्वरूप आहे. म्हणूनच, भारतीय संविधान हे धर्मनिरपेक्ष नसून, अधर्मनिरपेक्ष तर
धर्मसापेक्ष आहे. पण अधर्मकृत्याला धर्म मानत राहण्याच्या सवयप्रत्यया कारणास्तव भारतीय संविधानाला धर्म सापेक्ष भारतीय संविधान म्हणण्यांच्या ऐवजी धर्म निरपेक्ष म्हण्यांची वेळ भारतीय संविधानावर आलेली आहे,ते राष्ट्राचेच नव्हे तर धर्माचे, त्यांच्या उद्देशाचे दुर्दैव होय.
जो पर्यंत अज्ञानाला ज्ञान, आणि अधर्माला किंवा अधर्म कृत्याला धर्म मानुन आपण चालत राहणार तो पर्यंत असंविधानात्म सामाजिकता कारणास्तव सर्व विकासाला खिळ बसत राहणार आहे. आणि यांचे मुख्य कारण भारतातील राजकारणाच्या धर्मापेक्षा, धर्माचे जे अधर्म राजकारण चालू आहे ते होय.
आणि त्यांचे मुख्य कारण भारतातील शिक्षण प्रणाली राबविणारे विद्यापीठ होय.
शिक्षणाच्या असांस्कृत दर्जा कारणास्तव आणि अशिक्षित,अवैज्ञानिक राजकीयांकारणास्तव अर्थात सुसंस्कृत आणि सुशिक्षित राजकारणीय व नागरिकांच्या अभावा कारणास्तव आज देशात
राष्ट्राच्या ऐवजी चिंध्यांचोरांचे राजकारण चालू आहे जे राष्ट्र विरूद्ध
आणि भारतीय संविधानाला काळीमा फासणारे, तर धर्म संकल्पणेला मुठमाती देणारे ठरणारे आहे.
म्हणूनच ,धर्म नावे अधर्माचे राजकारण थांबवून ,राजकारणाचा धर्म पाळण्याची गरज निर्माण झालेली आहे नाहीतर, पुन्हा
राजकिय गुलामगिरी खुप दूर नाही. हे निश्चित!
थोडक्यात;
ज्याला आपण धर्म संबोधतो ते धर्म नाही.अधर्म आहेत.
ज्याला आपण राजकारणीय संबोधतो ते खरे राजकारणीय नाही
स्वार्थाने बरबटलेले राजकारणी होय.आणि
भारतीय संविधानाला आपण जे धर्मनिरपेक्ष संबोधतो ते भारतीय संविधान
धर्म/धम्म सापेक्ष भारतीय संविधान होय.
🌸
प्रा.मुकुंद दखणे.
यवतमाळ 9373011954.
जयभीम ,🙏🏾जयभारत
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत