आज सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन – प्रा.डी.डी.मस्के

सावित्रीमाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका,पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून उल्लेख करावा लागतो. त्यावेळी त्या केवळ अठरा वर्षाच्या होत्या.
त्याकाळात लवकर विवाह केले जायचे.जोतीराव-सावित्रीमाई विवाहावेळी १३ व १० वर्षांचे होते.
फुले दांपत्यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पहिली शाळा पुण्यात भिडे वाड्यात काढली. त्यावेळी महात्मा फुले यांचे वय २१ वर्षे तर सावित्रीमाईंचे वय १८ वर्षे होतं. इतक्या तरुण वयात हे दांपत्य किती क्रांतीकारक विचार करत होते हे आजच्या पिढीने लक्षात घ्यायला हरकत नसावी.
१ जानेवारी १८४८ या पहिल्या दिवशी सहा मुलींचा प्रवेश झाला.
१) अन्नपूर्णा जोशी
२) सुमती मोकाशी
३) दुर्गा देशमुख
४) माधवी थत्ते
५) सोनु पवार
६) जानी करडीले
यापैकी ४ ब्राह्मण, १ मराठा व १ धनगर होत्या.
या घटनेचे वर्णन मामा परमानंद यांनी पुढील शब्दांत केले आहे. “पुण्यात मुलींची शाळा काढणे सिंहाच्या गुहेत घुसून त्याची आयाळ पकडण्यासारखे आहे.”
तर सनातनी म्हणू लागले, की
कलियुग आले, केली मातला, धर्म बुडाला
” चूल अन मूल ” हे सावित्रीमाईनी पसंत केले असते तर?
परंतु
जोतिबांच्या अर्धांगी तशा त्या क्रांतीकार्याच्याही अर्धांगी होत्या. जोतिबा प्रमाणेच जिद्दी, करारी आणि दृष्ट्या होत्या. जोतिबा प्रमाणेच त्यांच्याकडे अलौकिक गुण होते म्हणून, स्वतःचा संसार, मुलेबाळे, घरदार या ऐहिक सुखाला ठोकरून आपल्या आदर्श पती सोबत “जगाचा संसार पत्करला”
शाळेची परीक्षा
१२ फेब्रुवारी १८५२ रोजी पुना कॉलेजच्या चौकात परिक्षा घेतली ही परीक्षा पाहण्यासाठी २००० पेक्षा अधिक लोक या चौकात जमले होते. ही परीक्षा पाहण्यासाठी त्यावेळचे कलेक्टर व इतर मान्यवर उपस्थित होते.एखादा सामना पहावा तसे परीक्षा पाहण्यासाठी गर्दी झालेली होती. ही उल्लेखनीय बाब लक्षात घेतली पाहिजे.
कवयित्री सावित्रीमाई
सावित्रीमाई या कवयित्री होत्या.त्यांच्या कवितेत वैविधता दिसून येते.
१८५४ मध्ये त्यांचा “काव्यफूले” हा कविता संग्रह प्रसिध्द झाला. त्यावेळी सावित्रीमाईंचे वय अवघे २३ वर्षांचे होते.आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून ज्यांचा उल्लेख आपण करतो ते कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत ह्यांचा जन्म सावित्रीमाईंचा “काव्यफूले” प्रकाशित झाल्यानंतर १२ वर्षांनी जन्मले.
१८९२ ला म्हणजे जोतीरावांचे निर्वाण झाल्यानंतर त्यांचा दुसरा काव्यसंग्रह ” बावनकशी सुबोध रत्नाकर” हा प्रकाशित झाला.
झाशीची राणी लक्ष्मीबाई व सावित्रीमाई फुले
झाशीची राणी लक्ष्मीबाई ही आपल्या दत्तक मुलाला पाठीवर घेऊन आपल्या गादीसाठी लढत होती. तर सावित्रीमाई फुले एका अस्पृष्याच्या मुलाला पाठीवर घेऊन प्लेग वर उपचारासाठी घेऊन गेली अन् त्यातच १० मार्च १८९७ त्यांचे निर्वाण समाजसेवा करता करताच झाले. स्वत:च्या गादीसाठी लढणारी झाशीची राणी आम्हाला सांगितली. पण समाजसेवा करताना शहिद झालेली सावित्रीमाई आम्हाला सांगितली नाही.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत