संविधान सुरक्षेचा रस्ता मतपेटीतून जातो- प्रा. विक्रम कांबळे

संविधान संरक्षण समिती धाराशिवच्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय संविधानासमोरील वर्तमानातील आव्हाने या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी गायकवाड, प्रमुख पाहूणे व्याख्याते प्रा. विक्रम कांबळे यांच्या हस्ते यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे पुष्पहार घालून पुजन करण्यात आले. यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी गायकवाड यांचे स्वागत राम चंदनशिवे यांनी हार, पुष्पगुच्छ व शाल देवून केले. व्याख्याते प्रा. विक्रम कांबळे यांचे स्वागत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष प्रा. रवि सुरवसे यांनी हार, पुष्पगुच्छ व शाल देवून केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संविधान संरक्षण समितीचे प्रा. दिनकर झेंडे यांनी केले. मार्गदर्शन करताना प्रा. विक्रम कांबळे म्हणाले की, संविधान देशातील सर्व जनतेसाठी आहे. तरी संविधान रक्षणासाठी ठराविक वर्गच का पुढे येतो आहे ? प्रत्येक भारतीयाने या लढयात उतरले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 ला मनुस्मृतीचे दहन केले व 26 जानेवारी 1950 ला भारताला भारतीय संविधान दिले. या ऐतिकासिक घटना आहेत. संविधान रक्षणाचा रस्ता हा मतदानाच्या पेटीतून जातो हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे लागेल. संविधान रक्षणसाठी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक सर्वच आघाडयावर सनदशीर मार्गाने लढा द्यावा लागेल.
अध्यक्षीय समारोप करताना प्रा. डॉ. शिवाजी गायकवाड यांनी संविधान निर्मितीची प्रक्रिया सविस्तर सांगितली. ते म्हणाले की, संविधान लागू झाल्यापासूनच काही विचारधारा संविधान विरोधी मत व्यक्त करत आहे. आजही संविधानासमोर समाजातील विषमता नष्ट करणे, समाजातील आर्थिक विषमता नष्ट करणे, धर्म निरपेक्षता टिकवणे, प्रत्येक व्यक्ती सामाजिक न्यायापासून वंचित राहू नये. यासाठी प्रयत्न करणे. इत्यादी व सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक आव्हाने संविधानासमोर आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे यांना चहाचे हॉटेल टाकून देणे हा प्रयत्न सामाजिक न्यायाचा होता. आज स्वातंत्र्य, समता, बंधूता, न्याय व भारताची एकता रक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजे. मी प्रथमत: भारतीय आहे व शेवटीही भारतीय आहे. ही भूमिका प्रत्येकाने बाळगली पाहिजे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण प्राप्त विजय गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे आभार ॲङ अजित कांबळे यांनी मांडले. यावेळी रमाई फाऊंडेशनचे पृथ्वीराज चिलवंत, हरीभाऊ बनसोडे, दादासाहेब जेटीथोर, प्रा. महिंद्र चंदनशिवे, प्रा. अंबादास कलासरे, सुनिल बनसोडे, राहूल राऊत, प्रभाकर बनसोडे, राजेंद्र अंगरखे, सुदेश माळाळे, नितीन माने, भारती बौध्द महासभेचे सचिव विजय बनसोडे, दिलीप वाघमारे, किरण कांबळे, विनोद कांबळे, ॲङ के.टी. गायकवाड, मारुती पवार, ॲङ इंद्रजित शिंदे, नागनाथ गोरसे, बापु धावारे, एस.एन. मदने, उमेश कांबळे, राकेश साबळे, प्रा. गोरोबा झेंडे, संतोष झेंडे, ॲङ झीनत प्रधान, सुरेखा जगदाळे, आशादेवी लष्करे, श्रावस्ती माने, छाया माळाळे, सुनिता कांबळे, निकीता कांबळे, ॲङ कोमल कांबळे व शहरातील आंबेडकर प्रेमी, जनता, महिला मोठया संख्येने उपस्थित होते.
आपला,
रेवते सुधाकर
प्रति,
मा. संपादक / जिल्हाप्रतिनिधी,
धाराशिव
वरील बातमी व छायाचित्र आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिध्द करुन सहकार्य करावे, ही विनंती.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत