राजू परुळेकर यांचे व्यख्यान (2025)

नथुराम गोडसे नावाच्या पहिल्या अतिरेक्यानंतर ब्राह्मणांनी धडा घेतला की स्वतः पिस्तूल घेऊन पुढे नाही जायचं. बहुजनांना फितवून परस्पर काटा काढायचा ही त्यांची नीती राहिली आहे. पिस्तूल बहुजनाच्या हातात द्यायचं आणि बहुजनवादाचा मुडदा पाडायचा.
( नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे,कलबुर्गी,गौरी लंकेश यांचा काटा असाच काढण्यात आला. कारण ते ब्राह्मणवादाविरुद्ध बोलत होते.)
गांधी हात्येला ब्राह्मणवाद वध म्हणतो. शिवराय , फुले, शाहू, आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या वरच्यावर हत्या होतायेत. याच्या विरोधात एक बहुजन उभा राहून बोलत नाही कारण तो ब्राह्मणवादाचा मांडलिक झाला आहे.
धारकरी म्हणजे ब्राह्मणवाद
सावरकरांनी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाला काकतलीय योग म्हंटल आहे. छत्रपती शिवराय हे कुळवाडी भूषण होते हे नाकारायचं म्हणून त्यांना देवत्व बहाल करण्याचा ब्राह्मणवादी कावा आहे. यासाठी सावरकरांनी शिवरायांची आरती लिहिली, नमो वैगेरे करून शिवरायांना देव केलंय. त्या आरतीत असं दोनदा म्हटलंय की
” रामदासांनी तुला असा कोणता मंत्र दिला होता की ज्या मंत्रामुळे तू हे सर्व करू शकला, हे राजा तो रामदासांचा मंत्र तुला पुन्हा पुन्हा मिळू दे “
सावरकरानी लिहिलेल्या या आरतीत असं सुचित करतायेत की शिवरायांनी जो काही पराक्रम केला तो रामदासांनी दिलेल्या मंत्रामुळे केला, थोडक्यात छत्रपती शिवरायांचे महत्त्व कमी करून रामदासला पुढं करणे ही नीच अपप्रवृत्ती आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर ही अतिरेकी संघटना आहे असं म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी बंदी घातली होती ती उठवण्यात यावी असा त्यांचा विचार नव्हता, पण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या लोकशाही मूल्यांना / आग्रहाला होकार देऊन पटेल यांनी बंदी उठवली.
आज जे काही घडतंय त्याला नेहरू जबाबदार आहे कारण तेव्हा पटेल यांचच ऐकायला हवं होतं.
आपली प्रतीकं, आपली भाषा,आपलं राजकारण, आपल्या संस्था,आपले लोक….
बहुजन म्हणजे कोण? बहुजन म्हणजे ब्राह्मण सोडून सर्व
वेदोक्त मंत्र हे फक्त ब्राह्मणांसाठी राखीव आहेत असं म्हणून राजश्री शाहू महाराज यांचा हक्क नाकारला होता. या संदर्भात भटमान्य टिळकांनी अग्रलेख लिहून असं म्हटलं होतं की ” आम्ही शिवाजी महाराजांचा अपवाद केला असेल, पण म्हणून प्रत्येकाचा अपवाद नाही करणार.”
याचा अर्थ ब्राह्मण सोडले तर क्षत्रिय सुद्धा यांच्या दृष्टीने शूद्रच आहेत.
बहुजनांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही, आणि सनातन नावाचा ही कोणता धर्म नाही.
माणसाचे विचार मारता येत नाहीत,माणसाला मारता येतं हे खोटं वाक्य आहे. आरएसएस आणि त्यांच्या कंपू ने, ऑक्टोपस ने हे सिद्ध केलं आहे की माणूस मेला की त्यांचे अनुयायी त्यांचा विचार जायबंदी करून टाकतात.
दाभोळकरांच्या मृत्यूनंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काय झालंय? त्यामुळे माणसालाच मारले पाहिजे हा विचार ब्राह्मणवादी विचार आहे.
महात्मा गांधी अहिंसेचे पुजारी होते, निशस्त्र होते, वयोवृद्ध होते, आणि कोणत्याही प्रकारच संरक्षण न घेता ते प्रार्थनेला उभे होते त्यांना गोळ्या घातल्या. त्या गोळ्या घालणाऱ्या गोडसेला आज पूजनीय म्हणतात आणि त्याला यशस्वी भव म्हणणाऱ्या सावरकरांना वीर म्हणतात याला एकमेव कारण म्हणजे जात / ब्राह्मणवाद.
सावरकरांचा आडनाव जर देशमुख असतं, भोसले असतं तर एवढा उदो उदो झाला नसता.
( क्रांतिसिंह नाना पाटील यांची आठवण आली.)
शत्रूच्या स्त्रीला सन्मानाने परत पाठवलं ही छत्रपती शिवरायांची विकृती आहे असं सावरकर म्हणतात.
महाराष्ट्रातले बहुसंख्य बहुजन नेते सावरकर जयंती साजरी करतात. सावरकरांना दोन संस्थानिक राजा विषयी आदर होता कारण त्यांच्या राज्यात अंध अपंग लुळे पांगळे यांना जीवे मारले जायचे.(संदर्भ – अरुण शौरी लिखित New icon पुस्तक )
नारायण नागबळी करायला आता मराठे ओबीसी जास्त पुढे आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सत्यनारायणाच्या पूजा घातल्या तुम्ही त्याच दिवशी सत्यमेव जयते हे संपलं.
या देशात स्वातंत्र्य समता बंधुता आणि सायंटिफिक टेम्परमेन्ट यासाठी आपण संविधानाचा स्वीकार केला. याच प्रकारच्या प्रजासत्ताकाचे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं होतं.
सरकारी शाळा दवाखाने यांची वाताहत होणे हे ब्राह्मणी करणाची निशाणी आहे.
कुठल्याही ब्राह्मणवादाला पैशासाठी बनियावाद जवळ करावासा वाटतो.
दुसरा कोणत्या धर्माचा मनुष्य हिंदू धर्मात घ्यायचा झाला तर त्याला कोणत्या जातीत टाकणार हे तुम्ही मला सांगा. हिंदू धर्म आहे तर धर्मात घ्या ना. म्हणून मी म्हणतो हिंदू आणि सनातन हा कोणताही धर्म नाही आहेत त्या जाती आहेत.
धर्म एकच ब्राह्मण धर्म तो यजुर्वेदात लिहिलेला आहे. म्हणून वेदोक्त.
रामाचा उल्लेख वेदांमध्ये नाहीये, दहा उपनिषदांमध्ये नाहीये. तो पुराणांमध्ये आहे. म्हणून शूद्रना वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही तर पुराणोक्त मंत्राचा अधिकार आहे असं म्हणून राजश्री शाहू महाराज यांचा अधिकार नाकारला होता.
संघाला एवढंच जर हिंदूंचे एकीकरण करायचा आहे तर सर्वांचीच / सर्व जातीची मुंज का नाही करत? तसंही याला काय अर्थ नाही.
बहुजनांच्या स्त्रिया सावित्रीबाईंच्या शाळेकडे पाठ करून अथर्वशीर्ष म्हणायला लागल्या तेव्हा बहुजनवाद बुडला. सावित्रीबाई फुले याच सरस्वती आहेत त्यांचेच वंदन केलं पाहिजे आपण.
खरा विद्येचा स्त्रोत बहुजनांसाठी खुला केला तो महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांनी.
परधर्माबद्दल द्वेष पसरवल्याशिवाय ब्राह्मणवादाला बहुजनांवर राज्यच करता येत नाही. उजव्या विचारसरणीच्या लोकांमध्ये कवी निर्माण होऊ शकत नाही कारण सृजनच नाही.
तुकारामांना न्यायला पुष्पक विमान येत आणि बाजीरावला न्यायला नाही येत ही काही गंमत आहे?
महात्मा फुले हे देशाचे शत्रू होते असा म्हणणारा मनोहर कुलकर्णी बहुजणांच्या पोरांना नासवतोय. भिडें बरोबर एकही ब्राह्मण जात नाही सगळे ब्राह्मण अमेरिकेला जातात असं का? त्यांच्याबरोबर किल्ले चढायला मराठे आणि ओबीसी जातात, कारण हे भिकेचे डोहाळे ब्राह्मणांना लागूच शकत नाहीत ते हुशार आहेत.
फुले शाहू आंबेडकर यांचे लिखाण जरी प्रत्येक बहुजनाने घरात वाचायला लावले असते ना तर बऱ्याच गोष्टी बदलल्या असत्या. स्त्रियांनी बौद्धिक मानसिक गुलामगिरी जुगारून द्यायला हवी.
इस्लामचा भारतात प्रसार तलवारीच्या जोरावर थोडाफार झाला, सर्वात जास्त प्रसार आपल्यातील जातीव्यवस्थेमुळे झाला. असं स्वामी विवेकानंद स्वतः म्हणतात.
गोळवळकर ने 3 शत्रू लिहून ठेवले आहेत.
इस्लाम ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट, हे तिघेही जातीव्यवस्था नाकारतात तर गोळवलकर आणि संघ जातीव्यवस्थेचा पुरस्कार करतात.
ब्रिटिशांनी जर जीआर काढला असता सर्व ब्राह्मण ख्रिश्चन झाल्याशिवाय त्यांना सरकारी नोकरीत घेता येणार नाही तर दुसऱ्या दिवशी सर्व भारत ख्रिश्चन झाला असता. ब्रिटिश आले पहिले ब्राह्मणच इंग्रजी शिकले आणि वाघिणीचे दूध असं म्हणायला लागले.
तुमचा दुश्मन अब्दुल आणि स्टीफन नाही आहे, तुमचे दुश्मन तुम्ही आहात. तुमच्या बहुजन असण्याचा महत्त्व तुम्हाला कळलं नाही, तुमच्या माणूस असण्याच महत्त्व तुम्हाला कळलं नाही. तुमच्या अंगी असलेल्या सामर्थ्याची तुम्हाला कल्पना आलेली नाही.
छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज,गाडगे महाराज,महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दाखवलं की आम्ही या कुळात जन्माला आलो आणि मोठे झालो. हा वारसा पुढे जाऊ नये यासाठी ब्राह्मणवाद या महापुरुषांना देवत्व बहाल करतो.
छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी मातेने तलवार दिली असे दाखवतात, हा ही ब्राह्मणवादाचा कुटील डावच आहे.
महापुरुषांची आरती नसते करायची, महापुरुषांचे वाचन करायचे असते.
गावोगावी शिवव्याख्याते झाले आहेत ना त्यांना पहिल आवरा, ते पूर्वीच्या कीर्तनकारांपेक्षा वाईट आहेत. ते शिवाजी राजांना राम बनवतील. त्यांचं मंदिर बांधण्याकरता विटा घेऊन निघतील मुलं, असं नका करू.
सामर्थ्य आल्यावरही करुणा आणि लोकशाही आपल्या अंगातून गेली नाही पाहिजे हे आपण शिवरायांकडून शिकले पाहिजे.
सावित्रीबाई फुले प्लेग रुग्णांची सेवा करताना स्वतः प्लेग होऊन वारल्या. उंदरांमुळे प्लेग पसरायचा त्याला आटोक्यात आणण्यासाठी रँड या ब्रिटिश अधिकाऱ्याने विलगीकरणावर भर दिला.( आता कोविड काळात आपणही तेच केले.) तेव्हा घरा घरात देवासमोर गूळ खोबरं ठेवलं जायचं, ते गुळ खोबरे खायला उंदीर यायचे. त्यामुळे रँड ने कठोरपणे कायदा अमलात आणला आणि देवघरात पाहायला सुरुवात केली.
चाफेकर यांनी स्वतः लिहून ठेवलंय की रँड हा चांगला माणूस होता पण धर्मामध्ये व्यत्यय आणल्यामुळे त्याला मारण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. हे कोणतं क्रांतीकारकत्व?
म्हणजे प्लेगणी माणसं मेली तरी चालेल पण धर्म वाचला पाहिजे धर्म म्हणजे कोणता तर ब्राह्मण धर्म.
लोकमान्य टिळक धर्माच्या बाहेर काम करतात म्हणून त्यांनाही मारायचं ठरवलं होतं चाफेकर बंधूंनी.. हे त्यांनी स्वतः लिहून ठेवलं आहे.
सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिकवण्या करता सनातनी ब्राह्मणांचे शेणाचे गोळे खाल्ले.
आज आपण जे आठ तासाची ड्युटी करतो ना ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे.( नारायण मूर्ती सारखा हलकट माणूस असता तर पंधरा पंधरा तास राबवून घेतील.)
या सगळ्याचा बहुजनांना विसर पडला आहे.
सगळे बहुजन वाईट नाहीत आणि सगळे ब्राह्मण ही वाईट नाहीत. मुद्दा हा आहे की दोष द्यायचा झाला तर मी तो बहुजनांना देतो. बहुसंख्य मराठ्यांनी ओबीसींनी शूद्र अति शूद्र यांनी फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवराय या महापुरुषांशी गद्दारी केली आहे. आणि या गद्दारीची फलश्रुती म्हणून ब्राह्मणवादाच्या गुलामगिरीत आपण खीतपत पडलो आहोत.
अथर्वशीर्ष म्हणणाऱ्या महिलांपुढे आपण सांगितलं पाहिजे ” बाई ग सरस्वती आली नव्हती तुला शिकवायला, सवित्री आली होती.”
आज ब्राह्मणवादाचा इतक स्तोम माजला आहे की मुलांची अंडीच बंद केलीत.( शाळा मध्यान्न भोजन योजना.)
मुकेश अंबानी प्रोटीन म्हणून सिंथेटिक प्रोटीन इटलीहून मागवून,आणून खाऊ शकतो. हे जे आज सत्तेत आहेत त्यांची सगळ्यांची मुले अशा प्रकारचे प्रोटीन मागवून आणून खाऊ शकतात. गरिबांच्या मुलाला प्रोटीन मिळण्याचं आपल्याकडे दुसरं साधन काय आहे? घरी गेल्यावर आई त्याला मुगाच्या डाळीचा डबा भरून वरण प्यायला देणार आहे का? दोन अंडी भरपूर प्रथिने देतात. आणि कर्बोदकांमुळे वजन वाढतं पण बळ येत नाही. बहुजनांच्या मुलाला बळ येऊ नये ही ब्राह्मणवादाची मूळ अनुस्युत संकल्पना आहे. श्रीमंतांनी संपत्ती आणि साधन संपत्तीचे एकत्रकरण केलेल आहे. त्यांच्याकडे प्रोटीन आणि प्रथिने मिळवण्याची अनेक साधनं आहेत. सामान्य दर्जाच्या बहुजन कुटुंबातून आलेल्या मुलांना प्रोटीन फक्त अंड्यातून मिळू शकतं किंवा नॉनव्हेजिटेरियन आहारातून मिळू शकतं. ते मिळवण्याचा त्यांचा हक्क राज्यघटनेने त्यांना दिलेला आहे. आणि शाकाहाराच्या उदो उदो करून तो काढून घेतला जात आहे हा ब्राह्मणवाद नाही तर दुसरं काय आहे? आणि याच्या विरुद्ध उठाव होत नाही, लाज वाटली पाहिजे तुम्हाला?
लाज वाटून आपण काय करतो हा खरा मुद्दा आहे… मी बोलतो, लिहितो. मला भीती वाटत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. मला भयंकर प्रचंड भीती वाटते.
मी जे वाचलेलं आहे ते ग्रंथ डोक्याला लावून बहुजन फिरतात, तेव्हा यांच्या डोक्यात काय शिरतय अशी मला भीती वाटते. कारण त्या ग्रंथामध्ये काही नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र साहित्य वाचलेले फार थोडे बहुजन आता भेटतील.
या चार महापुरुषांनी ( शिवराय फुले शाहू आंबेडकर ) यांनी जवळपास भारतातल्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि बहुजनांना आधाराला ब्राह्मण नाव लागतं, ब्राह्मण मंत्र लागतात आणि ब्राह्मण शाही लागते, ब्राह्मणवाद लागतो, राम मंदिर लागतं आणि अब्दुल पंचर वाला शत्रू लागतो, त्या विचाऱ्याचा काही दोषच नाही. अरे मी इकडे कुठे आलो माझं काय चुकलं असं त्या अब्दुल च झालं असेल.
महा कुंभ मध्ये जेव्हा चेंगरा चेंगरी झाली,काही लोकं मेली तेव्हा त्यांनीच मशिदी उघडल्या, खायला दिलं. आणि ते जेवण बनवत होते तेव्हा माथे फिरलेले काही सरकारी कर्मचारी दगड आणून टाकत होते. ते अल्ला म्हणतं असतील, आपण देव, केशव म्हणत असू, कोणी येशू म्हणतं असेल त्याला काय बरं वाटतं असेल हे वागणं? मला असं सांगा जर ईश्वर असेल तर तो दुसऱ्याचा द्वेष करायला कसं शिकवत असेल? तिरस्कार करायला कसा शिकवेल? त्याला ते आवडेल का? आणि अब्दुल पंचर वाल्याने माझं काही वाईट केलंच नाहीये तरी तो माझा शत्रूच आहे.
बहुजनांना हे सगळं करायला कोण भाग पाडत आहे? का ते स्वतःच करतायेत? बहुजनांमधील जे सरंजामदार आहेत त्यांची संपत्ती आणि आय्याशी आणि कायद्यामध्ये नोंद नसलेली लग्न वाचवण्यासाठी ते हे सगळं करतायेत. पण गरीब बहुजन हे सर्व कशासाठी करतोय? त्याच्याकडे गमावण्यासारखं असं काय आहे?
सांस्कृतिक भान म्हणजे काय तर आपली संस्कृती काय आहे हे जाणून त्यानुसार जगणं.
एका माणसावर अन्याय होतो म्हणजे सगळ्या समाजावर अन्याय होतो. जर एका माणसाला मंदिरामध्ये घेतलं नाही तर मी ही जाणार नाही. अशी भूमिका असावी का नको?
माझं तुमचा एक नातं आहे आणि ते माणूस म्हणून आहे. ते माणूस म्हणूनच राहूदे.
जगामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यातील शारीरिक भेद वागळता कोणताही भेद नाही आणि कोणतीही गोष्ट अमंगळ नसते. हे तुकारामांपासून सगळ्यांनी लिहून झालेल आहे.
कुठल्याही ठिकाणी जाऊन रेडे कापल्याने सत्ता मिळत नाही किंवा टिकत नाही. कुठलीही पूजा घालून देव खुश होतं नाही. आणि कसलाही प्रकारे मंत्र म्हणून कोणाला मारता किंवा वाचवता येत नाही. यावर विश्वास ठेवा याचं कारण या सगळ्या गोष्टी या चार माणसांनी ( शिवराय फुले शाहू आंबेडकर ) आयुष्यात अनुभवून पाहिलेल्या आहेत. अभिजनांच्या अंध अनुकरणाने आणि राजकीय प्रचाराला बळी पडल्याने आणि आपली संपत्ती, आपलं छोटंसं जग वाचवण्याकरता आपला इतिहास आपलं वर्तमान आणि आपलं भविष्य खलनायकांच्या हातात देत आहोत हे भयानक आहे. आपण नाही म्हणायला शिकले पाहिजे आणि तस आपण शिकलो नाही तर आपली गाव कुसाबाहेर जाण्याची वेळ जवळ आली आहे.
आज उमर खलिद आत आहे म्हणून मी घोंगडी घेऊन स्वस्थ बसतो असं म्हणणं चूक आहे. एका माणसावर अन्याय झाला त्याचे उत्तर नाही मिळालं तर तुम्हाला झोप नाही आली पाहिजे.
मला जे दिसतं ते मी तुमच्यासमोर मांडलं, तुम्हाला जर वाटत असेल माझं काही चुकलं तर ते बाजूला काढा, त्यातलं जेवढं चांगलं आहे तेवढे घ्या. माझं बोलणं म्हणजे काही अथर्वशीर्ष नाही की तुम्ही सामूहिक पठण केलं पाहिजे.
स्वातंत्र्य दुसरा माणूस तुम्हाला कधीही देऊ शकत नाही. स्वातंत्र्य ही स्वतः मिळवायची गोष्ट आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत