
समतेचे तत्व मांडणारे महान संत,योगी आणि परमज्ञानी संत शिरोमणी संत गुरू रविदास महाराज यांची आज १२ फेब्रुवारी रोजी जयंती.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संत रविदास महाराज यांची जयंती जंतर-मंतर दिल्ली येथे ऐतिहासिक जयंती केली होती बाबासाहेबांनी लिहिलेला त्यांचा ग्रंथ दि अनटचेबल हा ग्रंथ संत गुरू रविदासांना समर्पीत केला होता अशा त्या महान संतांचं आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातं आपण समजून घेतलं पाहिजे.
संत रविदासांचा कालखंड म्हणजे मध्ययुगीन कालखंड या कालखंडात उच्चनिच्चता भेदभाव अगदी शिखराला पोहचलेला समाज कर्मकांड व अंधश्रध्देत डुबलेला अशा घोर अंधारलेल्या काळांत संत गुरू रविदास यांनी विषमतेविरोधी स्वातंत्र-न्याय,बंधुता,मानवता आणि धर्मनिरपेक्षतेचे रणशिंग फुंकले व समतेचा ध्वज फडकावला म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपला दि अनटचेबल’ हा ग्रंथ संत गुरू रविदासांना समर्पीत केला. तर रविदासांच्या संदर्भात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे गुरू संत कबीर म्हणतात संतन मे रविदास संत है सुपुच ऋषी मानीया हिन्दु तुर्क दीने बने कछु नही पहचानीया,चौदाव्या-पंधराव्या शतकामध्ये उच्चनिच्च, स्पृश्य-अस्पृश्यता अगदी टोकाला पोहचलेली होती.अस्पृश्य-शुद्रांना कोणतेही समानतेचे अधिकार नव्हते,राजसत्ता जनतेची पिळवणूक करित होती.नि सामाजिक विषमता तर शिगेला पोचली होती.पाण्याचा,दर्शनाचा,शिक्षणाचा, अर्थाजनाचा कोणताही अधिकार नव्हता. गुलामीशिवाय काहीच नाही.गुरू रविदासांनी सर्व धार्मिक तत्त्वज्ञान समजून घेतले असता त्यांना कळले की एकिकडे म्हणायचे की सर्व जन ही एकाच प्रभुचे लेकरे आहेत,आणि प्रत्यक्षात उच्चनिच्च भेदभाव असे का.? कथनी आणि करणी मध्ये फरक का.?या प्रश्नाचे उत्तर सापडायला रविदासांना वेळ लागला नाही,हा कृत्रीम भेदभाव आहे हे त्यांच्या वास्तववादी बुध्दीला पटले आणि त्यांनी समाजात परिवर्तनवादी,पुरोगामी, समतेच्या,मानवतेच्या आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय विचारसरणीची पेरणी करण्यास सुखात केली,तेव्हा त्यांना प्रचंड विरोध झाला.परंतु त्यांनी त्या विरोधाला न जुमानता ते प्रतिगाम्यांच्या प्रत्येक असमानतेच्या गोष्टीचे खंडन करीत गेले व हा तत्त्वशुन्य विषमतेच्या ज्ञानातील फोलपणा उघडकीस आणला.त्यांच्या पुरोगामी विचारधारेला अनेकांची साथ लाभली,त्यामध्ये संत कबीर व इतर समविचारी संत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मानंतर ते विसाव्या शतकातील स्वातंत्र्यपुर्वीच्या कालखंडात किती भयानक विषमता होती ती आपल्या आधीच्या पिढ्यांनी प्रत्यक्षात अनुभवली व आपणास सांगितली.यावरून चौदाव्या-पंधराव्या शतकात किती विषमता असावी यांची कल्पना येते.अशा कालखंडामध्ये गुरू रविदासांना किती संघर्ष करावा लागला असेल हे कल्पनेपलिकडचेच आहे.बहुजनांना समतेचे तत्व सांगणारे महान संत संत शिरोमणी
संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
व त्यांच्या महान कर्तुत्वाला कोटी कोटी वंदन.!!
🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹🌹
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



