लोकशाहीचा…..

निवडणूक आली.उमेदवारी अर्ज भरला.बैनर लावले.रॅली काढली.पैसे वाटले.मते मिळवली.निवडून आला.भ्रष्टाचार केला.गब्बर झाला.लोकांना कळला.तक्रार केली.एफआयआर नोंदवली.खटला दाखल केला.वीस वर्षे निकाल नाही.याला लोकशाही म्हणत नाही.ही लोकशाहीची अनौरस उत्पत्ती आहे.पोलिस आणि न्यायाधीश कडून आता लोकशाहीची अपेक्षा उरलेली नाही.
सोलापूर जिल्ह्यातील एका गावात लोकांनी सरकारी यंत्रणेला दूर ठेवून मतदान घेण्याचे ठरवले.ही खरी लोकशाही.पण सरकारने ते होऊ दिले नाही.ही हुकुमशाही.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एका सरपंचने पाणीपुरवठा बाबत खोटे बोलून निवडणूक जिंकली.काम केले नाही . म्हणून गावकऱ्यांनी त्या लबाड आणि नाकाम सरपंच ला दोराने बांधून झेडपी सीईओ समोर आणले.ही खरी लोकशाही.
जर आमचा आमदार, खासदार, मंत्री जर असेच पैसे वाटून,खोटे बोलून किंवा मतदानात हेराफेरी करून निवडून आला असेल तर त्या मतदारांनी सुद्धा त्याला असेच दोराने बांधून चाबकाचे फटके मारले पाहिजे.अर्थात अशी शिक्षा करणारी सरकारी यंत्रणा आहे.पोलिस आणि न्यायाधीश.पण हेच नाकाम ठरलेले आहेत.म्हणून मतदारांनी मताचा हक्क बजावला तर शिक्षा देण्याचा हक्क सुद्धा बजावला पाहिजे.आता ती सुरुवात झाली आहे.
आम्ही निवडून दिलेल्या आमदारांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विकासाचा निधी प्रस्तावित करण्याचा अधिकार आहे.पण तो अशा ठिकाणी प्रस्ताव टाकतो कि ज्यात त्यांचे आणि त्यांच्या चेला चपाटे,संगे सोयऱ्यांचे हित असते.इतर लोकांची त्याला चिंता नसते.कारण अशा आमदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांची अनुमती लागते.अध्यक्ष आणि राज्यपाल देत नाही.हे चोरांचे समर्थक आहेत.मग काय करावे? कपाळावर हात मारून चुप बसावे का?मुळीच नाही.
अशा आमदाराला आपकी अदालत सारखे जनतेच्या दरबारात जखडून त्याची सुनावणी घेतली पाहिजे.कोर्ट मार्शल करतात तसे पब्लिक मार्शल केले पाहिजे.तेथेच त्यांचे पब्लिक ऑडिट केले पाहिजे.तेथेच शिक्षा सुनावली पाहिजे.तेथेच चोरीची,कमीशन ची वसुली केली पाहिजे.पदावरून हकालपट्टी केली पाहिजे.अजूनही राईट टू रिकॉल चा कायदा बनला नाही.म्हणून तेथेच राजीनामा घेतला पाहिजे.
जेंव्हा मतदार असा जागृत होईल तेंव्हाच आमदार खासदार मंत्री वर वचक बसू शकतो.तरच हे आमदार खासदार मंत्री प्रामाणिकपणे काम करतील.
जळगाव शहरातील अनेक ठिकाणी रस्ता डांबरीकरण,सिंमेटीकरण चे कार्यादेश दिले.पण कामच केले नाही.तरीही ठेकेदाराला पैसे दिले.त्यातून काही पैसे आमदाराने,काही नगरसेवकांनी,काही अभियंत्यांनी खाल्ले.आम्ही स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन केले तेंव्हा आमदारांनी ती कामे ठेकेदार कडून करवून घेतली.आम्ही महाराष्ट्र जागृत जनमंच ने किमान पांच कोटींची न झालेली पण बील पेमेंट दिलेली कामे करवून घेतली.शिवाय जेथे जेथे आम्ही असा आम जनतेत गौप्यस्फोट केला, आमदारांना, नगरसेवकांना बोलवले तर ते आलेच नाहीत.अभियंत्याला सुद्धा सुचना दिली होती कि, तुम्ही सुद्धा साईटवर जाऊ नये.तरीपण आमदारांनी लपवलेली आणि आम्ही उजागर केलेली कामे करावी लागली.हा जनतेचा दबाव आमदार आणि नगरसेवकांवर वचक ठेवतो.हिच खरी लोकशाही आहे.
जळगाव शहरातील एका नामांकित वकिलांनी रस्ता डांबरीकरण बाबत जळगाव कोर्टात खटला गुदरला होता.पण न्यायाधीशांनी थातुरमातुर कारवाई केली.सुनावणी घेतलीच नाही.यात भय असू शकते.शहराचे आयुक्त आणि अभियंता यांनी न्यायाधिशांना जुमानले नाही.हे न्यायव्यवस्थेचे अपयश आहे.
आम्ही या निष्कर्षाप्रत आलो आहोत कि,आपण मत देऊन आमदार निवडला तर आपणच त्याला कामाला जुंपले पाहिजे.पोलिस आणि न्यायाधीश ही जबाबदारी घेत नाहीत.
मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूल मंत्री बावनकुळे आता जामनेर ला येणार आहेत.कशासाठी?हा प्रश्न कोणीही आमदार खासदार किंवा विरोधी पक्ष विचारत नाही.ही माणसे फडणवीस आणि बावनकुळे जनतेची कामे करण्यासाठी येत नाहीत.ते त्यांचा राजकीय तमाशा दाखवण्यासाठी येणार आहेत.म्हणून मी या मंत्र्यांना कामाला जुंपण्याचा प्रयत्न करीत आहे.आधी जनतेची शासकीय, प्रशासकीय कामे करा मग स्वताचे कौतुक करून घ्या.
दुर्दैव असे कि जळगाव जिल्ह्यातील विरोधी नेते आणि विधानसभा, लोकसभा उमेदवार फक्त निवडणुक नाही हिंमत हारलेले आहेत.सत्ताधारी आमदार खासदार मंत्री चा तमाशा थांबवण्याचे बळ त्यांच्यात उरलेले नाही.डॉ सतीश पाटील, गुलाबराव देवकर,शिरीष चौधरी,दिलीप खोडपे,रोहिणी खडसे,उन्मेष पाटील, जयश्री महाजन याबाबत कोणताही आक्षेप घेत नाहीत.यांचे पानिपत झाले आहे.
... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव
१४/२/२०२५
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत