छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यांची एम के सी एल यांच्या वतीने स्वच्छता अभियान

महाराष्ट्रात सर्वांत मोठा आसलेल्या किल्ल्याला घुसीने पोखरले पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष .पर्यटकानी ही पाठ फिरवली
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
छत्रपती शाहू महाराज संशोधन व मानव विकास संस्था ( सारथी ) पुणे व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित एम के सी एल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि एम के सी एल जिल्हा समन्वयक धनंजय जवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या शिवजयंतीच्या निमित्ताने नळदुर्ग येथील किल्ल्याची स्वच्छता करण्याचा मानस एम के सी एल होता याच अनुषंगाने या उपक्रमांमध्ये जिल्हाभरातील जवळपास २० संगणक प्रशिक्षण केंद्राचे २५० विद्यार्थी या अभियानामध्ये सहभागी झाले होते .
यूनिटी मल्टीकॉन्स कंपनीचे टेंडर बंद झाल्या पासुन किल्ल्याकडे प्रशासनाचे चक्क दुर्लक्ष झाले आहे अक्षरशः किल्यातील हुलमुख दरवाजाच्या बाजुला घुसीने पोखरले आसुन ज्या ठिकाणी घुसीने पोखरले आहे त्या ठिकाणी मातीचा ठीगारा देसुन येत आहे
ठिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले आहेत नळदुर्ग शहरातला महाराष्ट्रात सर्वांत मोठा किल्ला म्हणून ओळखला जातो हा ऐतिहासिक किल्ला पाहाण्यासाठी दर वर्षी लाखों पर्यटक येतात परंतू या वर्षी पर्यटनानी सुद्धा किल्ल्याकडे पाठ फिरवल्याचे दिसुन येत आहे .
कारण किल्यामध्ये यूनिटी मल्टीकॉन्स कंपनीचे कार्यकारी संचालक कपील मौलवी यांनी खुप चांगल्या पद्धतीने किल्ल्याचे संवर्धन व्यवस्थापन केले होते ती परिस्थिती आज राहीलेली नाही किल्ल्यात पाणी महाल , उपली बरुज , नवबुरून , हुलमुख दरवाजा , बारादरी , मुन्सीफ कोर्ट आदी ठिकानी कचरा दिसुन येत होता किल्ल्याचे संवर्धन व्हावे तात्काळ बि ओ टी तत्वावर देण्यात यावा आशा प्रकारची मागणी पर्यटक करत आहेत तरच किल्ला स्वच्छ व सुंदर राहील किल्ल्याच्या कडेवर उगवलेले गवत कचरा गोळा करत साफसफाई करण्यात आली एका पोत्यात भरून कचर कुंडीत जमा करण्यात आला किल्ला स्वच्छ करण्यात आला आपल्या नळदुर्गच्या ऐतिहासिकदृष्ट्या किल्ला खुप महत्वाचा आसुन इतिहासाची माहिती मिळावी किल्ल्याचे संवर्धन व्हावे किल्लाची . जबाबदारी त्यांना कळावी अशा उद्देशाने हा स्वच्छता अभियान राबविण्यात आले
या उपक्रमास शिवम् कम्प्युटर एज्युकेशन नळदुर्ग मधील सतीश पुदाले पूनम बिसेनी, सानिका महाबोले, प्रज्ञा मूर्टेकर , बेले अदिती भागवत, गायकवाड तृप्ती मल्लिकार्जुन, चव्हाण आकांक्षा अवधूत, सुरवसे ऐश्वर्या सुधीर, भोसले प्रणिता संदिपान, सुरवसे पंकज नागनाथ, टकले दीपक शरण इब्रामपूर, गायकवाड सुरज अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवला आहे धाराशिव जिल्ह्यातील आणखीन श्री साई कॉम्प्युटर,हरी इन्फोटेक उमरगा, समर्थ कम्प्युटर सेंटर बलसुर, समर्थ कम्प्युटर सेंटर नळदुर्ग, सुपर कम्प्युटर्स अणदूर, विशाल कम्प्युटर येणेगुर, अभिनव कम्प्युटर्स उपळे, राजीव कम्प्युटर्स, अष्टभुजा स्किल तुळजापूर, श्री समर्थ कम्प्युटर तुळजापूर, ग्लोबल इन्फोटेक जे. बी. कम्प्युटर तुळजापूर, आदी सेंटरच्या विद्यार्थी या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते
किल्ले स्वच्छता अभियानामध्ये शिवम् कॉम्प्युटर एज्युकेशनचे सतीश पूदाले यांनी खूप चांगल्या पद्धतीने स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या विद्यार्थांची व्यवस्था केली होती. आलेल्या विद्यार्थ्यांना दुपारचे भोजनदान देण्यात आले, यामध्ये नळदुर्ग नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष लक्ष्मण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यानी सहभाग नोंदवला
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत