प्रजासत्ताकाच्या ७५ वर्षात संविधानाचा ध्येयवाद साध्य झाला काय?

मानवतावादी बहुउद्देशीय संस्था नाशिक व मानव कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी नाशिक येथील मु. श. औरंगाबादकर सभागृह,( सावाना) नाशिक या ठिकाणी प्रा . डॉ. अनंत राऊत, नांदेड यांचे भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रजासत्ताकाच्या ७५ वर्षात संविधानाचा ध्येयवाद साध्य झाला काय? या विषयावर बहुमूल्य असे व्याख्यान संपन्न झाले. भारतीय संविधानाचे अनेक पैलूचा उलगडा करताना वर्तमानात संविधानाची आवश्यकता का आहे, केंद्रीय आणि राज्यसरकारच्या प्रशासनात भारतीय संविधानाच्या संविधनिक विविध मूल्यांचा (अर्टिकलचा)आधार कशा प्रकारे केला जातो, आणि करणे देखील आवश्यक आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले . भारतीय संविधानाचे प्रत्येक सांविधनिक मूल्ये(आर्टिकल) कसे उपयोगी आहे, याबाबत देखील विस्तृत माहिती, भारतीय संविधानाचे गाढे आंभ्यासक तथा जेष्ठ , विचारवंत प्राध्यापक डॉ. अनंत राऊत सर यांनी दिली,भविष्यात भारतीय संविधानाचे अभ्यासक वक्ते तयार होणं देखील काळाची गरज आणि आवश्यक असल्याचे डॉ. राऊत सर यांनी नमूद केले, वेळ प्रसंगी ते स्वतः नासिक येथे संविधान शिबिर आयोजित करण्यात आले तर सदर शिबिरास उपस्थित राहून मार्गदर्शन करण्याचे सूतोवाच केले, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून केंद्रप्रमुख आयु. शिवदास म्हसदे सर यांनी भूषविले, सदर कार्यक्रमाच्या विचार मंचावर, प्रमुख अतिथी म्हणून से. नी. मुख्याध्यापक आयु. रोहित गांगुर्डे सर, बौद्धाचार्य आयु. आर. आर. जगताप दादा, से. नी. गट विकास अधिकारी आयु. टी. वाय. जाधव साहेब होते, तसेच से. नी.केंद्र प्रमुख आयु. अशोक पवार सर, से. नी. लेखाधिकारी आयु रमेश जगताप, से. नी. अधीक्षक कृषी विभाग आयु. मिलिंद पवार साहेब ,आयु. सोनवणे साहेब. आयु. केदारे साहेब, बौद्धाचार्य आयु. नितीन मोरे साहेब यांची विशेष उपस्थिती प्रामुख्याने होती, प्रास्ताविक टी. वाय जाधव साहेब यांनी केले. कार्यक्रमाचे. सूत्र संचालन आयु.डॉ. नारायण गाडे सर यांनी केले, कार्यक्रमाची प्रस्तावना आयु. राजेंद्र दोंदे यांनी केली, तसेच आभार प्रदर्शन आयु. आर. आर. जगताप यांनी केले आणि कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली .वृत्त संकलन – रमेश जगताप से. नी. लेखाधिकारी कलेक्टर ऑफिस जळगाव, तथा कार्याध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ नासिक विभाग नासिक.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत