देशात अमृत कलश यात्रेच्या माध्यमातून देशभक्तीचं एक नवं पर्व सुरु – मंत्री नितीन गडकरी

देशात अमृत कलश यात्रेच्या माध्यमातून देशभक्तीचं एक नवं पर्व सुरु झालं असून पंचप्रण शपथेच्या माध्यमातून साऱ्या देशात उत्साह संचारला आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरजवळ कोराडी इथं केले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवांतर्गत कोराडी इथं मेरी माटी, मेरा देश कार्यक्रमांतर्गत अमृत कलश यात्रेचं आयोजन आज सकाळी करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते.
१ ते १३ ऑक्टोबर दरम्यान ग्रामपंचायतींकडून आलेले अमृत कलश पंचायत समिती कार्यालयात जमा करण्यात आले. तेथून तालुका कार्यालयात पाठविण्यात आले आहेत. २२ ते २७ ऑक्टोबर दरम्यान राज्यात सर्व तालुक्यातील कलश मुंबईत गोळा करण्यात येणार आहेत. यानंतर २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान दिल्लीत होणाऱ्या मुख्य कार्यक्रमासाठी हे अमृत कलश घेऊन युवक रवाना होतील.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत