आरोग्यविषयकदिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपान

२१ जून : आंतरराष्ट्रीय योग दिन

योगसाधना हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली

योगविद्या ही भारताने जगाला दिलेली मोठी देणगी आहे.भारतीय योगसाधनेला सुमारे पाच हजार वर्षांची वैभवशाली परंपरा आहे.योग हा प्राचीन भारताचा अनमोल ठेवा आहे.शरीर व मन यांच्यातील आंतरिक
नात्याला योगाभ्यासात अनन्यसाधारण महत्व आहे.मानवी जीवनात मानसिक संतुलन,समग्रता,आत्मशांती,शारीरिक स्वास्थ्य लाभणे,ही योगाभ्यासाची मुख्य उद्दिष्टे आहेत.योग हा मूळ संस्कृत शब्द असून,त्याचा अर्थ जोडणे वा जुळविणे असा होतो.योग विद्येतून शरीर व मन या दोन घटकांना एका धाग्यात ओवून त्यांच्यात मेळ घातला जातो.थोडक्यात योग मार्गाचा अवलंब केल्याने निरोगी आरोग्य लाभून निरामय जीवनाची दृष्टी लाभते,हे त्रिकाल सत्य आहे.

सध्याच्या धावत्या जगात माणसात ताणतणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.तसेच आधुनिक विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मानवाच्या जीवनशैलीत (लाईफ स्टाईल) आमूलाग्र बदल होताहेत.त्यामुळे काही प्रमाणात युवकांमध्ये चंगळवाद वाढीस लागला आहे.जेवणाच्या ताटात चौरस आहाराची जागा आता पिझ्झा,बर्गर,चायनीज फूडने घेतली असल्याचे सर्वत्र आढळते.त्यात स्पर्धात्मक युगाची भर पडली आहे.परिणामी युवकांच्या स्वास्थ्यावर याचे विपरित परिणाम होत असल्याचे प्रकर्षाने दिसते.अशा ताणतणावाच्या कारणांमुळे भारत ही आता मधुमेह ची जगाची राजधानी झाली आहे.आजच्या युवा पिढीच्या आहारामधील जंकफूड चे वाढते प्रमाण बघता, मधुमेहसह रक्तदाब,लठ्ठपणा, एसिडीटी हे विकार जडत चालले आहेत.हे सर्व घालविण्यासाठी योग साधना करणं काळाची गरज बनली आहे.

स्पर्धेच्या युगात युवा वर्गात नोकरी,व्यवसायसंदर्भात मोठा ताणतणाव असतो. या पार्श्वभूमीवर मानवी जीवनातून ताणतणावाच्या गोष्टी कायमच्या हटविण्यासाठी योगसाधनेची कास धरणे आवश्यक आहे.कारण त्यातून मन स्थिर तर,शरीर चपळ व सुदृढ होण्यास बळ मिळते.

भारत हा साऱ्या जगात युवकांचा देश म्हणून ओळखला जातो.केवळ भारताच्या युवा पिढीचेच नव्हे तर,अन्य वयोगटातील व्यक्तींचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य निरोगी व सुदृढ रहावे,या प्रांजळ उद्देशाने,मा.पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत योगाभ्यासाचा प्रस्ताव मांडत त्याचे महत्त्व अन् उपयुक्तता विशद केली. योगाभ्यासामुळे मानवाच्या जीवनात लक्षणीय परिणाम होऊन त्यात आमूलाग्र परिवर्तन होते,हे जगाच्या प्रतिनिधींना त्यांनी पटवून दिले.त्याची परिणती म्हणजे त्यांच्या प्रस्तावास व्यापक प्रमाणात प्रतिसाद मिळून सुमारे १७० देशांनी त्यास मान्यता दिली.अंतत: २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यास युनोने मंजुरी दिली. ही गोष्ट भारताच्या दृष्टीने मोठ्या सन्मानाची आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे,
उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.राज्यातील सर्वधर्मीय नागरिकांनी नित्यनेमाने योगा -प्राणायाम करून आपली प्रकृती सुदृढ व निरोगी ठेवावी,असे उभयतांनी नागरिकांना आवाहन केलं आहे.

चला तर,योगाभ्यासाचा अंगिकार करूया अन् आपलं मन व शरीर सुदृढ व निरोगी बनवूया!

लेखक -✍️ रणवीर राजपूत
गवर्नमेंट मीडिया,(एक्रिडेशन-मावज/०४३७)माहिती व जनसंपर्क,मंत्रालय,महाराष्ट्र शासन
………………………………..

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!