मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने आढावा बैठक पार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय येथे माहिती व तंत्रज्ञान, नगर विकास -2, उद्योग, कामगार, मृद व जलसंधारण या विभागांच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली. यावेळी संबंधित वरीष्ठ अधिकाऱ्यांनी विभागांच्या प्रलंबित कामांचा आढावा दिला व मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्देश दिले.
नगर विकास विभाग
✅नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शहरांमध्ये दर्जेदार नागरी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे
✅शहरांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करताना घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन बंधनकारक करून त्याच्या पुनर्वापरासाठी पारदर्शक धोरण ठरवावे.
✅सर्व नगरपरिषदांमधील मालमत्तांचे जीआयएस प्रणाली आधारित कर निर्धारण सुधारित करून एकाच वेळी मोठी करवाढ होणार नाही, याची दक्षता घ्यावी
मृद व जलसंधारण विभाग
✅आगामी शंभर दिवसांत पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाशी संबंधित सर्व कामांना गती देणे.
✅जलयुक्त शिवार अभियान 3.0 आणि गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवावी.
✅प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, आदर्शगाव योजना, आणि माजी मालगुजरी तलावांचे पुनरुज्जीवन व दुरस्ती कार्यक्रम यासह सुरू असलेल्या कामांची गती वाढविण्यात यावी
✅पदभरती प्रक्रियेची जलद अंमलबजावणी करून उपलब्ध मनुष्यबळाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करणे.
कामगार विभाग
✅केंद्र शासनाच्या ई-श्रम पोर्टलवर नोंद असलेल्या विविध क्षेत्रातील कामगारांचे व्यवसायानुसार वर्गीकरण करावे.
✅राज्यातील सुमारे दीड कोटी नोंदणीकृत कामगार व इतर असंघटित कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात याव्यात
✅कामगारांसाठी उपलब्ध असलेल्या ईएसआय रुग्णालयांचे बळकटीकरण करण्यात यावी
उद्योग विभाग
✅ईज ऑफ डुइंग बिझनेस प्रक्रियेला अधिक उद्योगपूरक बनवण्यासाठी सुधारणा करावी
✅मैत्री पोर्टल व उद्योग आयुक्तालय पोर्टलवर एआय चॅटबॉट सुविधा कार्यान्वित करा
✅महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडील (MIDC) जागांचे वाटप 100 दिवसांत पूर्ण करा
✅उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, जेम्स अँड ज्वेलरी, वस्त्रोद्योग आणि एमएसएमई धोरणांमध्ये कालानुरूप बदल करण्यासाठी तातडीने आराखडा तयार करावा.
✅नवउद्योजक तयार करतानाच तरुणांना अप्रेंटीशिप मिळावी यासाठी विशेष कार्यक्रम तयार करावा.
✅प्रत्येक जिल्ह्यातील उद्योग सेवा केंद्रांची कार्यक्षमता वाढवून त्यांना अधिक सक्षम करावे
बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री संजय राठोड, मंत्री आशिष शेलार, मंत्री आकाश फुंडकर, राज्यमंत्री आशिष जैस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ, मुख्य सचिव सुजाता सौनिक, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत