साहित्यिक लक्ष्मण अभंगे यांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली

( राहुल हंडोरे यांजकडून )
बाबासाहेबांच्या विचारांशी
तडजोड करणार नाही.-रामदास आठवले –
नेरळ दि. 12 जानेवारी 25
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीशी कधीही तडजोड करणार नाही असे उदगार केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले यांनी नेरळ भडवळ येथे कवी, साहित्यिक लक्ष्मण अभंगे यांच्या श्रद्धांजली सभेत प्रमुख अतिथी म्हणून बोलताना काढले. अध्यक्षस्थानी मिलिंद जाधव होते.
रायगड भूषण कवी, समाजसेवक कालकथित लक्ष्मण अभंगे यांच्या निधना निमित्य नेरळ जवळील भडवळ येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी ना. आठवले बोलत होते. दलित पॅन्थरच्या चळवळीत नोकरीला असणारे शासकीय कर्मचारी पॅन्थरला पाठिंबा देत होते. आज आम्ही रिपब्लिकन म्हणून काम करत आहोत . गट तट असले तरी आम्ही चळवळीत सक्रिय आहोत. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे मला मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. कालकथित लक्ष्मण अभंगे हे रिपब्लिकन ऐक्याचे पुरसकर्ते होते. लक्ष्मण अभंगे यांच्या आठवणी आपल्याला जिवन्त ठेवायच्या आहेत. असे ही आठवले म्हणाले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर ) पक्षाचे अध्यक्ष श्याम गायकवाड म्हणाले की, भडवळ येथे आम्ही बुद्धिस्ट फ्रंट नावाची संघटना स्थापन केली होती. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा घेऊन आपल्याला संघटन मजबूत करावं लागेल. असेही श्याम गायकवाड म्हणाले. प्रारंभी बौद्धचार्य शिंदे सर यांनी धार्मिक विधी कार्यक्रम आटोपला. या प्रसंगी माजी आमदार सुरेश भाऊ लाड, परिवर्तन एक लोक चळवळीचे प्रमुख, पत्रकार राजकुमार सुर्वे, आर. पी. आय रायगड अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, रिपाई नेते राहुल डाळिंबकर, बौध्द महासभेचे मोहन जाधव, समाजसेवक सिद्धार्थ सदावर्ते, रमेश गायकवाड, जी. के. कडलक, राहुल सूर्यवंशी, महेंद्र मोरे, बागुल गुरुजी, खैरे सर, प्रकाश कनोजे, कुंदा निळे, आदिची श्रद्धांजली पर भाषणे झाली.
डॉ प्रा विठ्ठल शिंदे, प्रा. एकनाथ जाधव, माजी नगरसेवक उमर इंजिनिअर, शरद मोरे, जी. बी. गायकवाड, पत्रकार विलास जाधव, ऍड. शेळके, मारुतीदादा गायकवाड, सम्यक सदावर्ते, सुरेश सोनावले, काशिनाथ कांबळे, अंनत वाघमारे आदी विविध संस्था संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन ऍड. क्रांती अभंगे, अमोल अभंगे यांनी केले होते. डॉ बी आर आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल हंडोरे यांनी सूत्रसंचालन केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत