ईव्हीएम ची चर्चा बंद करण्यामध्ये सरकार यशस्वी…!

1) 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम मध्ये गडबडी झाली अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती. भाजपा सरकार मताची चोरी करून किंवा लोकांच्या मतावर दिवसा दरोडा टाकून किंवा लोकशाहीवर बलात्कार करून निवडून आले होते. महाविकास आघाडी कडून ईव्हीएम संदर्भात चर्चा सुरू झाली होती. मारकडवाडी पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होत होता. सरकार अडचणीत येण्याची संकेत दिसत होते.
2) लोकांना जर म्हंटले EVM ची चर्चा बंद करा तर ते ती चर्चा बंद करणार नाहीत. त्यामुळे लोकांना नवीन चर्चेचा मुद्दा दिला पाहिजे, हे ओळखून सरकारनेच नवीन मुद्दे चर्चेला आणले, नवीन चर्चा घडवून आणली.
3) परभणी शहरांमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी बांगलादेशातील हिंदू वर अन्याय होतो म्हणून मोर्चा काढला होता, त्याच मोर्चा मधील एका व्यक्तीने संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केली. अर्थात हा मोर्चा सरकार प्रायोजित होता. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी… इत्यादी संघटनांचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
4) परभणी मधील आंबेडकरवादी नेत्यांनी समजदारीची भूमिका घेतल्यामुळे सरकारला पाहिजे तशी प्रतिक्रिया उमटली नव्हती. त्यामुळे पोलीस द्वारे दलित वस्त्यांमध्ये घुसून वाहनांचे तोडफोड सुरू झाली, महिलांना मारहाण सुरू झाली. हे सर्व महाराष्ट्र पोलीस करत होते. त्याचे व्हिडिओ समाज माध्यमावर उपलब्ध आहेत. तरीसुद्धा सरकारला जी पाहिजे ती प्रतिक्रिया म्हटली नाही.
5) आंबेडकरी तरुणांना बॉम्बिंग ऑपरेशन द्वारे पोलिसांनी अटक केली होती. त्यातील LLB चा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी बेदम मारहाण केली. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी चा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला. छत्रपती संभाजी नगर मधील घाटी रुग्णालयाद्वारे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये हे स्पष्ट झाले आहे की सोमनाथ सूर्यवंशी चा खून पोलिसांनीच केला आहे.
6) यानंतर मात्र आंबेडकरी समूहामध्ये जोरदार प्रतिक्रिया उमटली. सोमनाथ सूर्यवंशी अंतयात्रेनंतर आंबेडकरी चळवळीचे वरिष्ठ नेते वाकोडे दादा यांचे हार्ट अटॅक ने निधन झाले. अर्थात हा सर्व ताण त्यांना सहन झाला नाही. यानंतर मात्र चर्चा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या खुणाची सुरू झाली. आंबेडकरी चळवळीत EVM ची चर्चा बंद झाली.
7) महाराष्ट्र बंद करण्याची ताकद दोन समूहामध्ये आहे, एक आंबेडकरी समूह आणि दुसरा मराठा समाज. सोमनाथ सूर्यवंशी ची सरकारी पोलिसांनी हत्या केल्यानंतर आंबेडकरी समूहातील EVM ची चर्चा बंद झाली. त्याच दरम्यान बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावातील सरपंचाची हत्या करण्यात आली. सरपंच मराठा जातीचे होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली. जरांगे पाटलांनी आंदोलनात उडी घेतली. आरोपी वंजारी जातीचे असल्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले.
8) भाजपाचे आमदार सुरेश धस हे या आंदोलनाला लीड करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या पेक्षा जास्त कव्हरेज सुरेश धस यांना मिळत आहे. मराठा समाजात ईव्हीएम ची चर्चा बंद झालेली आहे. भाजपा आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून सरकारने ईव्हीएम ची चर्चा बंद केली. अर्थात मराठा समाजाला चर्चेसाठी दुसरा मुद्दा दिला गेला.
9) आंबेडकरी समूह आणि मराठा समूह यांना चर्चेसाठी वेगळे मुद्दे दिल्यानंतर, evm ची चर्चा बंद झाली. महाराष्ट्रामधील ओबीसी जाती मोठ्या प्रमाणावर भाजपसोबत गेले आहेत. जरा मी पाटलांची आणि मराठा समाजाची भीती दाखवून भाजपाने ओबीसींना जाळ्यात ओढले आहे. ओबीसींच्या कल्याणाची कोणतीही गोष्ट न करता, फक्त भीतीपोटी, ओबीसी भाजपसोबत गेला आहे. त्यामुळे ओबीसी लोक ईव्हीएम वर चर्चाच करत नाहीत.
10) मुस्लिमांनी भाजपच्या विरोधात बोलले पाहिजे, असे भाजपाला हमेशा वाटत राहते. कारण मुस्लिम नेते जेंव्हा भाजपाच्या विरोधात बोलतात, त्याचा फायदा भाजपलाच होतो. त्याची प्रतिक्रिया म्हणून हिंदू लोक एकत्र येतात.
सारांश: ईव्हीएम वर चर्चा करू नका असे म्हटल्याने चर्चा बंद होणार नाही, म्हणून चर्चेला दुसरे मुद्दे दिले जातात. न्यूज चैनल 24 तास सरकारला पाहिजे त्या चर्चा घडवून आणतात. मीडिया द्वारे नवीन नेते निर्माण केले जातात. सरकार अडचणीत येईल असे मुद्दे बाजूला केले जातात. प्लांटेड नेते समाजावर थोपवले जातात. सध्या तरी ईव्हीएम ची चर्चा बंद करण्यामध्ये भाजपा सरकार यशस्वी झाले आहे.
सिद्धार्थ शिनगारे
संस्थापक अध्यक्ष : भारतीय हितकारिणी संघ
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत