लोकशाहीची खिल्ली उडवीणारे एकमेव तुम्हीच…
राजीवकुमार साहेब मुख्य निवडणूक आयुक्त, ..
अनंत केरबाजी भवरे
भारताच्या संविधानाने केवळ आणि केवळ तुम्हालाच 324 ते 329 या अनुच्छेदानुसार लोकशाहीचे संरक्षण करण्याची घटनात्मक आणि नैतिक जबाबदारी तुमच्यावर टाकली होती. त्यानुसार केवळ मतदार याद्या तयार करणे, मतदारसंघांची सीमा लोकसंख्येनुसार सूनिश्चित करणे, उमेदवारी अर्ज भरून घेणे, आचारसंहिता घोषित करणे, निवडणुकीच्या तारखा व निकाल घोषित करण्याच्या तारखा घोषित करणे, उमेदवारांचे शपथपत्र लिहून घेणे, निकाल घोषित करणे, उमेदवारांना जिंकल्याचे प्रमाणपत्र प्रदान करणे आणि कुणाच्या जर या दरम्यान तक्रारी जर आल्या तर त्याचे पारदर्शकतेने त्यांना न्याय देणे. नंतर आचारसंहिता उठवून सरकार निर्मिती होईपर्यंत लोकशाहीचे संरक्षण करणे. एवढीच घटनात्मक मुख्य निवडणूक आयुक्ताची जबाबदारी नसून, त्यांची नैतिक जबाबदारी पुढीलप्रमाणे आहे……..*
*कारण…..*
” घटनात्मक नितीचे पालन केल्याशिवाय आपल्या देशात लोकशाही नांदणार नाही. “
—-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
घटनाकाराच्या वरील आवाहनानुसार मुख्य निवडणूक आयुक्ताचे घटनात्मक नितीचे पालन पुढीलप्रमाणे आहे.
जेंव्हा एखादा उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तुमच्याकडे आला, तर तो संविधाननिष्ठ आहे का? तो न्यायालयाचा सन्मान करणारा आहे का? तो राष्ट्रध्वजाचा सन्मान करणारा आहे का? त्याच्यावर कुठल्याही न्यायालयात फौंजदारीचा खटला प्रलंबित आहे का? कोणत्याही न्यायालयाने त्याच्यावर ठपका ठेवला आहे का? कोणत्याही फौंजदारी गुन्ह्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष नाव आले आहे का? तोच उमेदवार जर पाच वर्षांपूर्वी निवडून आलेला होता, आणि त्याने आता पुन्हा दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आला असेल तर, पाच वर्षांपूर्वीचा त्याचा उमेदवारी अर्ज भरल्यासोबतचे शपथपत्र काढायचे त्यातील संपत्तीचा आकडा आणि आजच्या संपतीचा आकडा यामध्ये थोडीशी जरी तफावत असेल, तर त्याचे ऑडिट तपासावे. ते जर शंकास्पद असेल तर तो उमेदवारी अर्ज केवळ रद करुन न थांबता त्याच्यावर खोटा अर्ज दाखल केल्याच्या कारणावरून पोलिसात अजामीनपात्र गुन्हा दाखल करुन , त्याची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्याची शिफारस न्यायालायला करुन न्यायालयामार्फत तुरुंगात पाठवावे. ही वरील सर्व नैतिक जबाबदारी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका, इ. स्थानिक स्वराज्य संस्था, विधानमंडळ आणि संसद यासाठी घेण्यात येणाऱ्या सर्व निवडणुकासाठी बंधनकारक असलीच पाहिजेत……!*
*ही संविधानिक निष्ठा आणि नैतिक जबाबदारी केवळ आणि केवळ गेल्या 75 वर्षांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या इतिहासात…………*
आदरणीय लोकशाही आणि संविधाननिष्ठ मा. टी. एन. शेषन साहेब ( माजी मुख्य निवडणूक आयुक्त ) 1990 ते 1996)
याच आदर्शाने सांभाळली………….
*कारण……*
*सकाळच्या नाश्ट्यात ते राजकारण्यांना खात असत…….*
ते चार्ज घेण्याअगोदर त्यांच्या कार्यालयाचे नाव होते ” मुख्य निवडणूक आयोग भारत सरकार ” ताबडतोब त्यांनी भारत सरकार नाव त्यातून वगळून टाकले……..
आणि सांगितले की, मुख्यनिवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अख्त्यारीत असूच शकत नाही. कारण स्वतंत्र न्याययंत्रणेप्रमाणेच ही सरकारपासून अलिप्त असलेली संविधानिक संस्था आहे.
*जेंव्हा 1995 च्या लोकसभेचा कार्यकाळ संपत आला होता. तेंव्हा टी. एन. शेषण साहेबांनी तत्कालीन प्रधानमंत्री यांना सांगितले की, मतदार ओळखपत्रावर मतदाराचा फोटो आवश्यक आहे. तेंव्हा तत्कालीन प्रधानमंत्र्यांनी सांगितले की ही प्रोसेस फार खर्चिक आणि वेळखाऊ आहे. सध्या ती शक्य नाही. असे सांगताच मा. टी. एन. शेषन साहेबांनी केंद्रसरकारला ठणकावून सांगितले की, " जोपर्यंत मतदाराचा फोटो मतदान कार्डावर येत नाही. तोपर्यंत निवडणुका होणार नाहीत." तेंव्हा सरकारला मतदान कार्डावर मतदाराचा फोटो टाकल्याशिवाय गत्यनंतर राहीले नाही. ही देण आहे आम्हा भारतीयांना आदरणीय टी. एन. शेषन साहेबांची. त्याचा आम्हाला सार्थ स्वाभिमान आहे....... 🙏*
*कधीही भारत सरकारपुढे, प्रधानमंत्र्यापुढे न झुकता ताठ मानेने स्वाभिमानाने संविधाननिष्ठ एकमेव मुख्य निवडणूक आयुक्त म्हणजे मा. टी. एन. शेषन साहेब आहेत...... 🙏*
*आणि तुम्ही राजीव कुमार साहेब........*
जगात शरमेने आमच्या भारताची मान खाली घालण्याचे अर्थात लोकशाहीला कलंकित करण्याचे काम तुम्ही केले आहे…….!
*एक तर EVM च्या धांदलीचे हजारो पुरावे देऊन सुद्धा तुम्ही त्यांना कदाचित मोदी - शहाच्या* *सांगण्यावरून केराची टोपली* *दाखवली. EVM हटवून बॅलेट पेपरवर*
निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी सुप्रीमकोर्टातील वकिलांनी, जनतेने, देशातील इतर राज्यातील उच्च न्यायालयातील वकिलांनी धरणे, आंदोलने, मोर्चे, निदर्शने, आमरण उपोषण करुन सुद्धा तुम्ही त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केले……..!
*म्हणून आता जनता EVM हटविण्यासाठी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही.......!*
*कारण........*
हा मताचा मूलभूत अधिकार संविधानाने आम्हा प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेला आहे. त्याचे रक्षण करणे हे आम्हा भारतीयांचे मूलभूत कर्तव्य आहे…….
त्याचे रक्षण आम्ही करणारच ते सुद्धा EVM ला हटवूनच…….!!!
कारण……..
ज्या संपूर्ण जगाने या EVM ला अनुभव घेऊन लाथाडले. तर तुमचा EVM वरच निवडणुका घेण्याचा अट्टाहास…….?
*मारकडवाडी गावाचा प्रयोग करू न देण्यासाठी तुम्ही तिथे कर्फ्यू का लावला....?*
*ज्याप्रमाणे एखाद्या मुलाला मुलगी पसंद आहे. म्हणून तो, म्हणतो की माझ्याकडे बॅंकबॅलेन्स आहे, गाडी, आहे, बंगला, आईवडिलांचा त्रास नाही, भरपूर वडिलोपार्जित संपत्ती आहे दुसरा भाऊ किंवा बहीण नाही. तेंव्हा तू माझ्याशी लग्न कर........*
*तेंव्हा ती मुलगी म्हणते की, " अरे बाबा ते सर्व खरं आहे पण तुझ्याकडे चारित्र्य नाही त्याचे काय....?*
*म्हणून मी तुझ्याशी लग्न करणार नाही म्हणजे नाहीच......!!!*
*अगदी याप्रमाणेच........*
*तुमचे EVM तुमच्यासाठी पारदर्शक आहे. त्याच्यावर धांदली करणारा कोणी माईचा लाल जन्माला आला नाही असे तुम्हीच म्हणता. 2017 तुम्ही त्याला आमचा विश्वास बसावा म्हणून VVPAT जोडले. परंतू , त्याची सुद्धा 100% मोजणी करण्याची मागणी तुम्हीच हाणून पाडली...........!*
*अर्थात तुमचा EVM चा नवरा खूप चांगला आहे पण त्याच्यात चारित्र्यच नाही ना........*
*म्हणून आम्हाला EVM नको आणि नकोच......!*
*म्हणून सर्व व्यवस्थेच्या विरोधात संपूर्ण देशात आंदोलनाची तयारी. केवळ आणि केवळ या EVM ला घालविण्यासाठीच...... 🙏🙏🙏*
*ही वेळ आमच्यावर केवळ आणि केवळ राजीवकुमार साहेब तुम्हीच आणलेली आहे.......*
*म्हणून तुम्हीच या लोकशाही आणि संविधानाचे मारेकरी आहात......!!!!*
*त्यासाठीच जनआंदोलनाच्या तयारीत्त आम्ही ( भारतीय सर्वसामान्य जनता )*
सर्व संविधाननिष्ठ जनतेला सूचनावजा विनंती आहे की, या सर्व पोस्ट पोटतिडकीने तुमच्यासाठी आहेत, या जागृतीला मनोरंजनातून घेऊ नका. गांभीर्याने तन, मन, धनाने, आवाहनानुसार समर्पित होण्याची तयारी ठेवा…….. 🙏
रस्त्यावर उतरून लढायला आणि व्यवस्थेशी दोन हात करायला नेहमी तयार आहे. केवळ तुमचे सहकार्य अपेक्षित आहे…. 🙏
आवाहनकर्ता आणि जागृतीचा कृतिशील लेखक :- अनंत केरबाजी भवरे ( संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689 )
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत