मुंबईत केवळ दोन तास फटाके

आता रात्री ८ ते १० या दोन तासांमध्येच मुंबईकरांना फटाके फोडता येणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयानं मुंबईतील वायू प्रदूषणाची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन फटाक्यांच्या आतीषबाजीवरील निर्बंध अधिक कठोर केले आहेत. न्यायालयानं आपल्या याआधीच्या आदेशात बदल करत फटाके फोडण्याची वेळ तीन तासांवरून दोन तासांवर आणली आहे.
मुंबईतील वायू प्रदूषणाच्या प्रश्नावर दाखल झालेल्या वेगवेगळ्या याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती डीके उपाध्याय आणि न्यायमूर्ती जीएस कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढं सुनावणी सुरू आहे. याआधी ६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व महापालिका प्राधिकरणांच्या हद्दीत संध्याकाळी ७ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी न्यायालयानं दिली होती. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा सुनावणी झाली. ‘मुंबईत फटाके फोडण्याचं प्रमाण कमी झालं आहे. मात्र, शहराच्या काही भागांत अद्यापही हवेच्या गुणवत्तेची स्थिती (AQI) अत्यंत खराब आहे,’ असं निरीक्षण खंडपीठानं शुक्रवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी नोंदवलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत