धार्मिक हिंदूराष्ट्र झाल्यास काय घडू शकेल..?

समाज माध्यमातून साभार
1) पुन्हा चातुर्वर्णाची स्थापना होईल. ब्राह्मण मुखातून अन् शूद्र पायातून निर्माण झाले यावर श्रद्धा ठेवावी लागेल.
2) ब्राह्मण वर्गाशिवाय कोणालाही शिक्षणाचा अधिकार मिळणार नाही. इतरांनी चुकून विद्याभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर त्याला चाबकाने फोडून काढलं जाईल.
3) जातीबाहेर विवाह केल्यास त्याला वाळीत टाकलं जाईल.
4) स्त्रीस नवऱ्याच्या चितेवर स्वतःला जिवंत जाळून घेत सती जावं लागेल.
5) विधवांचे केशवपन करण्यात येईल.
6) फक्त ब्राह्मण व्यक्तीच राज्यकर्ती होऊ शकेल. इतरांनी प्रयत्न केल्यास त्यांना शिवाजी राजाप्रमाणे शूद्र ठरवून बहिष्कृत केलं जाईल.
7) वेदातील ज्ञान सर्वश्रेष्ठ समजलं जाईल की जे आधुनिक काळात अत्यंत हास्यास्पद अन् काहीसे अश्लीलही आहे. त्यातील ऋचा, श्लोक पाठ्यपुस्तकात लावले जातील.
8) ब्राह्मणाच्या लग्न मंडपात अथवा मिरवणुकीत अब्राम्हण व्यक्ती सामील झाल्यास तिला जोतिबा फुल्यांप्रमाणे अपमानकरित्या बाहेर काढलं जाईल.
9) सर्व पूजाअर्चा, धार्मिक विधी फक्त ब्राह्मणाकरवीच करून घेता येईल. इतरांनी तसा प्रयत्न केल्यास त्याला उकळल्या तेलात टाकलं जाईल.
10) कुठल्याही गुन्ह्याची शिक्षा मनुस्मृतीनुसार ब्राह्मणाला शक्यतो केली जाणार नाही. तोच गुन्हा अब्राह्मणांनी केल्यास त्याला देहांत शासनही होऊ शकेल.
11) आत्मा प्रेतात्मा, भूतयोनी, जादूटोणा, शकुन अपशकुन, पत्रिका कुंडली, मुहूर्त, ग्रहशांती, गंडे दोरे, ताईत, रुद्राक्ष, दृष्ट लागणं, नरबळी, गुप्तधन असल्या सगळ्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवावा लागेल. जे ठेवणार नाहीत त्यांना धर्मद्रोही समजून भर चौकात फटक्याची शिक्षा केली जाईल.
12) गावागावात देवळं मंदिरं बांधली जातील. प्रतिशिर्डी, प्रतिबालाजी अशी नवीन तीर्थस्थानं बांधण्यासाठी अनुदान देण्यात येईल. ‘मोदी’ मंदिर, ‘शिवाजी’ मंदिर, ‘आंबेडकर’ मंदिर, ‘बुद्ध’ मंदिर, ‘राणाप्रताप’ मंदिर अशी मंदिरे उभारण्यात येतील
13) रस्त्यारस्त्यावर सर्व धार्मिक उत्सव साजरे केले जातील. सर्व धार्मिक सण सार्वजनिक केले जातील. मशिदी आणि चर्च समोर भोंगे लावून, रस्त्यात वाजत गाजत मिरवणुका काढून ध्वनी प्रदूषणात भर घातली जाईल.
14) श्रृतीस्मृतीत सांगितल्याप्रमाणे स्त्रियांना वागावं लागेल. कसलंही स्वातंत्र्य असणार नाही. पुरुष जे म्हणतील त्याला मम म्हणावं लागेल. स्त्री ही मुक्तीच्या, मोक्षाच्या मार्गातील धोंड आहे यावर विश्वास ठेवावा लागेल.
15) अध्यात्माऐवजी जे विज्ञानाची महती गातील त्यांना नास्तिक ठरवून शिक्षा होईल.
16) गल्लीबोळातल्या बुवा, बापू, महाराज, बाबा, स्वामी यांना जगद्गुरू, धर्माचार्य, धर्मसम्राट अशा पदव्या दिल्या जातील.
17) दैवीशक्ती, चमत्कार, सिद्धी या विषयी शंका घेणाऱ्यांना तुरुंगात टाकलं जाईल.
18) ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि पृथ्वी शेषाच्या फण्यावर उभी आहे असं मानावं लागेल.
19) देवालयाच्या आधी शौचालयं बांधली पाहिजे असं वक्तव्य करणाऱ्याची निर्भत्सना केली जाईल.
20) जो धर्माची चिकित्सा व्हावी, धर्मात सुधारणा व्हावी, अंधश्रद्धा नष्ट व्हाव्यात असं म्हणेल त्याला भर रस्त्यात फटके मारून शासन केलं जाईल.
21) उच्च वर्णीयांचा लैंगिक कंडू शमावण्याकरता देवदासी प्रथा पुन्हा सुरू करण्यात येईल.
22) हिंदूराष्ट्रात ख्रिश्चन, मुसलमान आणि इतर परधर्मीयांना हिंदूंच्या म्हणजेच ब्राह्मणांच्या मर्जीवर जगावे लागेल.
23) हिंदुराष्ट्रात परधर्मीयांना त्रास देण्यात, छळण्यात आनंद मानला जाईल आणि जो कोणी उच्च प्रतीचा असा त्रास देऊ शकेल त्याला राणे बंधूप्रमाणे सन्मानाने वागवण्यात येईल.
24) विद्यापीठातून ज्योतिष, वास्तूशास्त्र, यज्ञविधी, जारणतारण मंत्र, जप जाप्य, नामस्मरण, अनुष्टान, लघुरूद्र, महारूद्र, गूढ विद्या, शनिमहात्म्य, गुरू चरित्र असल्या भंगार अन् टाकाऊ गोष्टी शिकवल्या जातील.
25) विज्ञानाच्या जोरावर राष्ट्र सामर्थ्यवान न करता, परंपरा आणि अध्यात्म यांचा स्वीकार करून विज्ञानाच्या साहाय्याने प्रबळ झालेल्या राष्ट्राची हसत हसत गुलामगिरी स्वीकारली जाईल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत