घटना समितीत निवडून येण्यासाठी बाबासाहेबाना मत देतील म्हणून काँग्रेसने ह्या दोघांना नजरबंद करून ठेवले होते,

काँग्रेसने कसं मायेच्या ममतेने बाबासाहेबाना संविधान सभेत पोहचवलं हे असं काही काँग्रेसी सांगतात की जणू,निरुपा रॉयचे आणि अलका कुबलचे ही डोळे पाणावतील, आता या शर्यतीत डॉ. संग्राम पाटील यांना ही धावायचा मोह आवरला नाही, हल्ली असे खोटे नॅरेटिव्ह पेरायला ज्या तथाकथित काँग्रेसी विचारवंत आणि आरएसएस उर्फ “जरी फटका मंडळ”यांना ऊत आला आहे, त्यांची ही हिम्मत आपल्यातील काही गांधींच्या लाडक्या हरिजनांमुळे होते, हे हरिजन अशा येणाऱ्या स्टेटमंटला विरोध करणार नाही, बाबासाहेबांच्या नावावर अशा खोट्या बातम्या आल्या की, हे हरिजन “काँग्रेसी गोधडी”अंगावर पांघरून घेतात.
मुळात काँग्रेसने बाबासाहेबांना संविधान सभेत घेण्यासाठी काही प्रयत्न केले नाहीत तर उलट पक्षी बाबासाहेब संविधान सभेत पोहचू नयेत म्हणून बरेच कारनामे केलेत, सरदार पटेलच म्हणाले होते की, डॉ. आंबेडकरांसाठी आम्ही संविधान सभेचे दारे खिडक्याच नव्हे तर तावदाने ही बंद केली आहेत.परंतु संग्राम पाटील हे सांगायला जाणीवपूर्वक विसरतात. काँग्रेसने तीनवेळा संविधान लिहिण्याचा प्रयत्न केला, मग तो का सफल झाला नाही? नेहरूंनी आपल्या बहिणीला म्हणजे विजयालक्ष्मी पंडित यांना संविधान लिहिण्याची विचारणा करण्यासाठी लंडनला सर आयव्हर जेनिंग यांच्याकडे का पाठवले? त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर का आठवले नाहीत? याचे उत्तर पाटील देतील का?
घटना समितीत जाण्याचा आधार हा प्रांतीय विधिमंडळ होता,त्यामुळे बाबासाहेबाना जनतेची नाही तर जनतेने निवडून दिलेल्या पाच आमदारांच्या व्होटिंगची गरज होती, पण बाबासाहेबांचे त्यावेळी फक्त दोन आमदार होते एक मद्रास येथील एन. शिवराज व दुसरे बंगालचे जोगेंद्रनाथ मंडल. बाबासाहेब बंगालला जोगेंद्रनाथ मंडल यांना भेटण्यासाठी आले, बाबासाहेब ज्या वस्तीत थांबले त्या वस्तीचे नाव “लकडी पूल क्रमांक ४” होते, बाबासाहेबानी जेव्हा नॉमिनी फॉर्म भरला तेव्हा काँग्रेसने त्या वस्तीला आग लावून पेटवले होते, एवढ्यावर थांबेल ती काँग्रेस कसली? बंगाल प्रांतीय विधीधिमंडळात ३० आमदार होते,बाबासाहेबांना निवडून यायला ५ आमदारांची गरज होती, त्यावेळी काँग्रेसने स्वतःच्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना १) गयाराम बिस्वास (तंजोर विधानसभा) व २) द्वारीकानाथ बरूही ( फरिदपूर विधानसभा) हे दोघे बाबासाहेबानी मत देतील म्हणून ह्या दोघांना नजरबंद करून ठेवले होते, म्हणजे ह्यांना किडनॅप केले होते, इतकंच नव्हे तर,बाबासाहेबांच्या विरुद्ध सुभाषचंद्र बोस यांचे जेष्ठ बंधू शरदचंद्र बोस जे बंगाल प्रांताचे अध्यक्ष होते त्यांना काँग्रेसने उभे केले होते, त्यामुळे बंगाल निवडणुकीत “बुद्ध सिंग” नावाच्या व्यक्तीने मतदान निकालात गोंधळ झाला आणि बाबासाहेब हरले तर काय होईल अशी केलेली घोषणा, (जालंधर जिल्ह्यातील ढिलवा गावचा रहिवासी बाबा बुद्धसिंह नावाचा एक दलित तरूण गर्दीतून वेगाने पुढे आला आणि आपले कृपाण (तलवार) आकाशात घुमवीत गर्जना करू लागला, “मी प्रतीक्षा (प्रण) करतो की, जर ‘डाकदार उम्मेदगार’ (पंजाबी उच्चारण डॉ. आंबेडकरांसाठी) यांना निवडणुकीत पराभूत केले गेले तर ही माझी तलवार त्या गद्दारांच्या रक्ताने लथपथ होऊन जाईल आणि मी आपल्या प्राणाची आहुती दिल्याशिवाय राहणार नाही.” बुद्धसिंहाच्या बरोबरच इतर अन्य दलितांनी अशीच प्रतीज्ञा केली. दलितांच्या या मोर्चाबंदीचा उल्लेख कलकत्याहून प्रकाशित होणाऱ्या दैनिकात करण्यात आला. दैनिक ‘स्टेटस् मॅन’मध्ये उपरोक्त ऐतिहासिक प्रसंगाचा वृत्तांत फोटोसहित १८ जुलै १९४६ च्या अंकात अशाप्रकारे प्रसिद्ध करण्यात आला.) बाबासाहेब निवडणूक जिंकल्यांनातर तो भाग काँग्रेसने पाकिस्तान मध्ये टाकला,( बहुल हिंदू भाग भारतात तर बहुल मुस्लिम भाग पाकिस्तानात जाईल असा ठराव असताना सुद्धा ) ज्यांनी बाबासाहेबाना मत दिले त्यांचे मंत्रिपद काढून घेण्यात आले तसेच तो भाग पाकिस्तान मध्ये टाकून जनतेला ही काँग्रेसने आपल्या रोषाने धडा शिकवला.
११जानेवारी १९५० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईतील नरे पार्कमध्ये झालेल्या सत्कार सभेत भाषण करतांना म्हटले, घटना समितीत डॉ. आंबेडकरांना आत घेणार नाही असे काँग्रेसने ठरविले होते. घटना समितीचे दरवाजे मला बंद होतेच, परंतु त्या बरोबर खिडक्याही बंद करुन घेण्यात आल्या होत्या व आजुबाजुंची छिद्रेही बुजविण्यात आली असे जाहीर करुन या प्रश्नाच्या श्रेया बाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कॉंग्रेसचे स्वरूप उघडे केले. घटना परिषदेत सदस्य म्हणून निवडून द्यावे व केंद्रिय मंत्रीमंडळात कॉंग्रेसने सहभागी करावे या आशयाचे गळ घालणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हस्ताक्षरातील व स्वाक्षरी असलेले एकही पत्र वा पुरावा उपलब्ध नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा घटना समिती मधील प्रवेश व केंद्रिय मंत्रीमंडळातील त्यांचा सहभाग या बाबतचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा कॉंग्रेसने नेहमी प्रयत्न केलेला आहे. काहिवर्षांपूर्वी प्रकाशित केलेल्या महाराष्ट्र प्रदेश कमिटिने कॉंग्रेस पक्षाचा गौरवशाली इतिहास पुस्तिकेमध्ये नमूद केले होते की,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मसुदा समितीचा अध्यक्षस्थानी नेमावे अशी गांधीजीची इच्छा होती. हे सर्व सत्य आहे काय ? याबाबतचा अधिकृत पुरावा उपलब्ध नसतांनाही या बाबत काँग्रेस श्रेयाचे सत्र सुरुच आहे. २६ नोव्हेंबर १९५१ रोजी मुंबईतील कावसजी जहाँगीर सभागृहात भरलेल्या सभेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस व त्यांच्या नेत्यांना याबाबतचे श्रेय दिलेले नाही. उलट अशा आरोपाचे त्यांनी खंडन केले असून २७ नोव्हेंबर १९५१ रोजी टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने त्यांच्या या भाषणाचा वृत्तात छापला आहे.
इथे एक फार मोठी आणि महत्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की, माउंट बेटन योजनेप्रमाणे जयकरांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या मुंबईच्या जागेवरून घटना समितीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची बिनविरोध निवड झाली त्या नंतरच ब्रिटिश लोकसभेने भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव 15 जुलै 1947 ला स्वीकृत केला.ही फार महत्वाची बाब आहे.
त्यामुळे संग्राम पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे बाबासाहेबांसाठी संविधान सभेचा पल्ला गाठणे सोप्पे नव्हते, उलट आपला नाकार्तेपणा आणि क्रूरतेचा चेहरा लपविण्यासाठी काँग्रेसचे तथाकथित विचारवंत खोट्या बातम्यांचा प्रसार करतात.
टिप:- संग्राम पाटील डॉक्टर असले तरी सुद्धा माणूसच आहेत, व माणूस वेळेवर औषध- गोळ्या घ्यायला विसरू शकतो.
महत्वाची टीप:- संदर्भासाठी बी.शिवराय यांचे घटना समितीवरील पुस्तक, एन.व्ही.गाडगीळ (समग्र काका, खंड 22) माईसाहेब यांचे आत्मकथन पुस्तक आणि संजय गजभिये यांचे संविधानिक भारत निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर और महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल तसेच जोगेंद्रनाथ मंडल यांचे सुपुत्र जगदीशचंद्र मंडल यांचे जोगेंद्रनाथ मंडल यांच्या जीवनावरील १ ते ७ खंड पुस्तकं वाचावीत…..
✍✍📙📙📚📚📘📘📚📚✍✍
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत