सुदृढ आणि निरोगी पिढ्या निर्माण करायच्या असतील तर आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार करावाच लागेल.

गोत्राच्या बाहेर जर लग्न केले तर स्वयंभू खाप पंचायतींचे तर कामच आहे की त्यांना दंडित करणे, त्यांची हत्या करणे किंवा करवून घेणे.
जातीयवादाचे समर्थन करणारे लोक गोत्राची खूप चर्चा करीत आहे. लग्नासारख्या महत्त्वाच्या प्रसंगी गोत्राची मोठ्या गंभीरतेने चौकशी केली जाते. तीन किंवा सातच गोत्राच्या बाहेर लग्न केले पाहिजे.
स्वयंघोषित खाप पंचायतींचे तर कामच हे आहे की गोत्राचे रक्षण केल्या जावे आणि ‘ प्रतिबंधित ‘ गोत्रांमध्ये लग्न करणाऱ्यांना दंडित केल्या जावे, त्यांची हत्या केल्या जावी किंवा करवून घेण्यात यावी.
जर गोत्राच्या समर्थकांना असे करण्याचे कारण विचारले तर ते म्हणतात की गोत्राच्या नियमांचे पालन केल्याने ‘ हे होऊ शकते’, ‘ ते होऊ शकते’.- सर्व काही स्पष्ट पौराणिक, काल्पनिक किंवा परंपरांचे रक्षण करण्यासाठी हे केल्या जात आहे.
आता अनेक लोक विज्ञानाचा आधार घेऊन म्हणू लागले आहे की जर समान गोत्र किंवा जवळच्याच गोत्रामध्ये लग्न केले तर संतती निरोगी राहू शकणार नाही , इत्यादी.
गोत्राचे समर्थन करणारे लोक जरी गोत्राच्या बाहेर लग्न करण्याच्या गोष्टी करीत आहे, परंतु जातीच्या बाहेर लग्न करण्याची गोष्ट जरी त्यांनी ऐकली तरी त्यांना साप चावल्याचा सारखे वाटते. जातीच्या बाहेर लग्न करणे आजही हे लोक महापाप समजतात. आंतरजातीय विवाह झाल्याच्या कारणावरून दोन्ही कडील कुटुंबांमधील लोकांच्या हत्या झाल्याचे दिसून आलेले आहे. गोत्रवाद हा जातीयवादापेक्षाही संकुचित आणि विषारी आहे. जातीयवाद आणि गोत्रवाद हा केवळ सामाजिक दृष्ट्याच हानिकारक आहे असे नाही तर समाजाला विभाजित करीत आहे आणि सामाजिक समतेला नष्ट करीत आहे. इतकेच नव्हे तर या दोन्ही वादांचे समर्थक शारीरिक आरोग्याला सुद्धा नष्ट करीत आहे. यांच्या पिढ्यांमधील पिढ्या बरबाद होऊन जाते आणि होत सुद्धा आहे.
पूर्वी ज्या गंभीर आजारांचा शोध लागला नव्हता विज्ञानाने तो शोध सुद्धा लावला आणि ते कुठल्या कारणाने आजारी होतात याचा सुद्धा शोध लावला. यामधून धक्कादायक सत्य पुढे आले. ते सत्य असे आहे की आपल्या परंपरागत छोट्याशा परिवार, जाती, समुदाया मध्येच लग्न करणे (Endogamy) या परिणामामुळे उपचार न होऊ शकणाऱ्या गंभीर आजारांचा जन्म झाला आहे. काही आजार वडिलाकडून मुलांना होतात आणि पुढे त्यांच्या मुलांना होता.
आपल्या जातीमध्येच,आणि आपल्याच जाती समुदायांमध्ये ,परिवारा मध्ये लग्न केल्यामुळे अनेक गंभीर आजार (genetic diseases) निर्माण झाले आहे, पुढेही होत राहणार त्यामुळे पिढ्यांची पिढी रोगग्रस्त होत आहे.
ज्यांनी हा जातीयवाद निर्माण केला आणि टिकवून ठेवला त्यातून निर्माण केल्या गेलेल्या वर्ण व्यवस्थेचा हा घातक परिणाम आहे. आतापर्यंत हे गुपचूप चालत आलेले आहे आणि या गंभीर आजाराने ग्रस्त झालेले लोक हळूहळू मृत्यूच्या खाईमध्ये जात आहे.
परंतु आता जेव्हा विज्ञानाने सर्व काही आमच्या समोर ठेवलेले आहे आणि त्या गंभीर आजाराने ग्रस्त व्यक्ती दवाखान्यांमध्ये इलाज घेण्यासाठी पोहोचत आहे, तर आम्हाला सर्वांना जागे झाले पाहिजे आणि जातीयवादाच्या या जंजाळातून स्वतःला मुक्त करावे लागेल, जेणेकरून आमच्या येणाऱ्या पिढ्या आमच्या अंधविश्वासामुळे आणि आमची वर्ण कुव्यवस्थेमुळे बली जाण्यापासून वाचू शकेल किंवा समाज अनावश्यक आणि आमच्या मूर्खतापूर्ण हट्टीपणामुळे उत्पन्न झालेल्या या गंभीर आजारापासून मुक्तता मिळू शकेल.
प्रा. गंगाधर नाखले
01/01/2025
7972722081
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत