ईव्हीएम विरोधात संघर्ष करणे म्हणजे हुकूमशाहीला विरोध

ईव्हीएम विरोधात संघर्ष करणे म्हणजे हुकूमशाहीला विरोध करीत, गुलामगिरी झिडकारून ख-या अर्थाने लोकशाही निर्माण करणे. म्हणूनच
ईव्हीएम विरोधात लढा देण्याची तुलना फक्त भिमा कोरेगावचा संघर्ष बरोबर होऊ शकते.
अशोक तुळशीराम भवरे
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
भिमा कोरेगावचा संघर्ष, लढा हा स्वकिया विरोधात होता म्हणून त्याला स्वातंत्र्यचा लढा म्हणता येणार नाही असे काही महाभाग,महाविद्वावान म्हणतात, भिमा कोरेगावचा संघर्ष का झाला,हा लढा पेशव्यांच्या विरोधात होता काय? मुळीच नाही पेशव्यांच्या विरोधात नव्हता तर या पेशव्या मध्ये दडलेल्या मनुस्मृती विरोधात होता, छत्रपती संभाजी महाराज यांची यांच्या सांगण्यावरून हत्या केली होती त्याविरोधात होता, संभाजी महाराज यांच्या तुकड्यांना एकत्रित करून त्यावेळी वडूचा बहादुर गणपत महार आणि गावातील महारांनी अग्नी दिला,यांचा बदला म्हणून पेशव्यांनी संपूर्ण महार जातीला गावात फिरायला बंदी घातली, गळ्यात गाडगे, कमरेला झाडाची फांदी तर हातात झाडू दिला, एवढेंच नव्हे तर जगणं मुश्कील करुन टाकले, एवढे होऊनही इंग्रजा विरोधात लढा देण्यासाठी व पेशव्यांना मदत करण्यासाठी शिदनाक महार दुसऱ्या बाजीरावाला भेटायला गेला आणि म्हणाला की आम्हाला तुमच्या बरोबर इंग्रजा विरोधात लढण्याची तयारी आहे, त्यांना हाकलून लावयाचे आहे या बदल्यात आमच्यावर होणारा अन्याय, अत्याचार थांबवणार आहात काय? तळ्यातील मडके, हातातील झाडू नष्ट करून माणूसकीची वागणूक देणार आहात का?
यावर उत्तर काय मिळाले सुईच्या टोकावरचया कणा एवढाही मान सन्मान तुम्हा महारांना माझ्या राज्यात मिळणार नाही, आमच्या बाजूने लढला तरी तुमची जागा तुमच्या पायरीवरच राहणार आहे, असे उन्मत्त उत्तर मिळाल्यावर शिदनाक महार यांनी काय करायला पाहिजे होते, हे चूक ठरवणारे काही महाविद्वावान महाभारतातील त्या प्रसंगाला मात्र मोठ्या चवीने सांगतात की पा़ंडव दुर्योधनाकडे जागा मागायला गेले तेव्हा दुर्योधन उन्मत्त उत्तर देतो आणि ते महायुद्ध सुरू होते हे महायुद्ध त्यांना मान्य आहे, परंतु भिमा कोरेगावचा संघर्ष मान्य नाही कारण हा संघर्ष महारांनी ब्राह्मण याविरोधात केला म्हणून?
दोन्ही ठिकाणी थोडीशी जागा माणुसकीच्या नात्याने मागितली, न्याय मागितला तर एक योग्य आणि एक अयोग्य कसे?
असेच एक युद्ध, संघर्ष, लढा भारत सरकार, निवडणूक आयोगा विरोधात भारतीय जनता असे चालू आहे,हा संघर्ष ईव्हीएम विरोधात बॅलेट पेपर निवडणू आहे, ईव्हीएम मध्ये घोटाळा करून सत्तेवर यायचे, विरोधकांना नामोहरम करायचे, हुकूमशाही पद्धतीने राज्य करुन नकळत पणे संविधानाची स्तुती करत, डोक्यावर घेत त्याच संविधानाला हटवायचे, शेतकरी, नोकरदार वर्गाला त्यास देणारे कायदे आणायचे,जगात फिरायला वेळच वेळ आहे परंतु देशातील मणीपूर येथे होत असलेल्या अन्याय, अत्याचार दुर करण्यासाठी वेळ मिळत नाही, जो विटंबना करतो त्याला मनोरुग्ण म्हणून संरक्षण करायचे आणि या विरोधात लढा देण्या-याला बेदम मारहाण करून मारुन टाकायचं एवढे नव्हे हा संघर्ष मिटवण्यासाठी घरा घरात घुसून निरापराधी लोकांना, महिलांना बेदम मारहाण करायला, संपूर्ण जनता, शेतकरी, कामगार, विद्यार्थी विरोधात असताना हे निवडणूक जिंकतात कसे काय? याचं उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे ईव्हीएम. या मशिनीत आपल्याला पाहिजे तसा बदल निवडणुकीत सहजपणे जिंकून येत आहे.
या ईव्हीएम च्या जोरावरच त्यांना विरोधाकांना संपूर्ण नेस्तनाबूत करावयाचे आहे, संविधान हटवून पुन्हा एकदा मनुस्मृतीचे पुनर्वसन करावयाचे आहे, यासाठी हा सर्व खटाटोप आहे, हे नेहमी म्हणतात रामाने सामान्य धोबीचे ऐकून गरोदर पत्नीचा त्याग केला,आज संपूर्ण जनता ईव्हीएम मशिन विरोधात लढा देत आहे, आंदोलन करीत आहे, आजच्या या रामाला ही हाक ऐकू जात नाही काय? खरोखरच हे सरकार न्यायी, सत्यवचनी असेल तर हे ऐकून सनदशीर मार्गाने बॅलेट पेपर वर निवडणूक घेईल अन्यथा जनतेचा रोष वाढत गेला तर यांचा हिटलर, मुसोलिनी कधी होईल याचा पत्ता लागणार नाही पुन्हा एकदा भिमा कोरेगावचा संघर्ष होवून आजची ही पेशवाई नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही.
अशोक तुळशीराम भवरे
संविधान प्रचारक/प्रसारक सिडको, नांदेड.
९५२७६७३१०९
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत