ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर निषेध मोर्चा
परभणी येथील कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा 15 डिसेंबर 2024 रोजी पोलिसांनी पोलीस पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या अत्याचार आणि मारहाणीतून झालेल्या खूनच्या विरोधात ठाणे शहरात 30 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर निषेध मोर्चा
आम्ही ठाणे शहरातील शिव शाहू फुले डॉ आंबेडकर
अनुयायांद्वारे विराट मोर्चाद्वारे वरील प्रकाराचा तीव्र निषेध करीत आहोत तसेच आम्ही आमच्या मागण्याचे निवेदन सादर करीत आहोत, ते खालील प्रमाणे.
- दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची जाणीवपूर्वक मोडतोड करणारा श्री दत्ताराव पवार हा अत्यंत जातीवादी असून भरपूर शेती असणारा बागायतदार आहे. त्याला प्रशासनाने अत्यंत चालाखीने माथेफिरू संबोधने हा प्रशासनाचा खोडसाळपणा असून या कृतीचा आम्ही तीव्र विरोध करीत आहोत. संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या कृतीचा जाहीर निषेध करीत आहोत. भारतीय संविधान ही सर्व कायद्याची जननी असल्याने त्याच्या प्रतिकाची विटंबना करणे हा देशद्रोह आहे म्हणून त्याला देशद्रोहाचेही बी एम एस कलम 152 द्वारे कारवाई करण्यात याव
2.या प्रकरणात परभणीतील संविधान प्रेमी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी निषेध आंदोलन केले असल्याकारणाने परभणी पोलिसांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांना स्त्री पुरुष आणि तरुणांना मारझोड करतानाचे आणि वाहनांचे तोडफोड करतानाचे व्हिडिओ समाज माध्यमावर सुद्धा व्हायरल झाले आहेत याचे चित्रीकरण आपल्या मोबाईल मध्ये करीत असताना कायदा शाखेचा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी याला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी ताब्यात घेऊन बेदम मारहाण केली त्यास अटक करून पोलीस ठाण्यात नेऊन क्रूरपणे मरेपर्यंत मारहाण केली आहे हा पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी घडवून आणलेला खून आहे असे आम्ही मानतो सोमनाथ सूर्यवंशी हा विद्यार्थी परभणी येथे कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी आला होता त्याचा खून होणे या घटनेचा ठाणे शहरातील शिव शाहू फुले आंबेडकर अनुयायी तीव्र निषेध करीत आहेत सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे परभणीतील वैद्यकीय पथक त्याला दमयाने आजारी होता असे खोटे विधाने करीत आहेत अशा कृत्याचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करीत आहोत या विरुद्ध सोमनाथचे कुटुंबीय तो आजारी नसून सुदृढ निरोगी असल्याचे ग्वाही देत आहेत
तसेच संबंधित पोलीस स्टेशन ने सोमनाथ सूर्यवंशीच्या खुना संबंधी आपणास जी माहिती पुरवलेली आहे ती धादांत खोटी आणि चुकीची आहे आणि आपण त्यावरून सभागृहामध्ये जे विधान केले आहे त्यामुळे आंबेडकरी जनतेचा भ्रमनिरास तसेच गैरसमज झाला आहे त्यामुळे आम्ही खालील मागण्या करीत आहोत
आमच्या मागण्या
- शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या खुनास जबाबदार पोलीस अधिकारी अशोक घोरबांड, पोलीस निरीक्षक एलसीबी शरद मरे, पोलीस निरीक्षक नवामोंढा
पोलिस स्टेशन,कार्तिकेश्वर तुरणर, पोउपनि नवामोंढा पोलीस स्टेशन परभणी यांच्यावर भारतीय न्यायसंहिता 2023 कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करून यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे - श्री दत्तराव पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा
3.परभणीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर अनुयावर सरसकट दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे काढून टाकावेत आणि त्यांची निर्दोष मुक्तता करावी.
4.सूर्यवंशी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहता त्या कुटुंबास सरकारने एक कोटी रुपयांचे अर्थसहाय्य द्यावे व कुटुंबातील एका व्यक्तीस महाराष्ट् शासनाच्या नोकरीत सामावून घ्यावे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत